एग चाट बास्केट (Egg chat basket recipe in marathi)

Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
virar

#worldeggchallenge

हम्टी-डम्टी पासुन सुरु झालेली अंड्यासोबतची मैत्री स्पॅनिश ऑमलेट, चीज ऑमलेट पर्यंत वाढतच असते. संडे हो या मंडे रोज खाओ अंडे... अशी जाहिरात काही वर्षांपूर्वी सगळीकडे झळकली आणि पाकिटावर हिरवा ठिपका बघून पदार्थ विकत घेणाऱ्यांची पावलेही अंड्याच्या क्रेट कडे वळली. अंडे आहेच असे की त्याचे हवे तसे प्रयोग करता येतात.
'डेव्हिल्ड एग' ही रेसिपी माझ्या पहाण्यात आली, पण सारखे वाटत होते की या रेसिपीच्या स्टफिंग मधे इनोवेशनसाठी खूप स्कोप आहे. कुकपॅडची ही स्पर्धा घोषीत झाली आणि पुन्हा डेव्हिल्ड एग ने डोक्यात भुणभुण सुरु केली. शेवटी आपले पारंपारिक चाटचे इनग्रेडियंटस् आणि इतर घटक वापरून हि रेसिपी बनवली.
सादर आहे ती चटपटीत आणि पौष्टिक रेसिपी!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
३ जणांसाठी
  1. 3अंडी
  2. 1कांदा (बारीक चिरलेला)
  3. 1टोमॅटो (बारीक चिरलेला)
  4. 1हिरवी मिरची (बारीक चिरलेली)
  5. कोथिंबीर (बारीक चिरलेली)
  6. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  7. 1/2 टीस्पूनकाळी मिरी पूड
  8. 1-2लिंबाचा रस
  9. बारीक शेव
  10. चवीनुसारमीठ
  11. चटणी बनविण्यासाठी
  12. 1 वाटीकिसलेले ओले खोबर
  13. 1हिरव्या मिरच्या
  14. पुदिना
  15. कोथिंबीर
  16. 3-4लसूण पाकळ्या
  17. 1 टेबलस्पूनलिंबाचा रस
  18. 1 टीस्पूनसाखर
  19. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम चित्रात दाखविल्याप्रमाणे सगळे साहित्य घ्यावे. आता आधी अंडी उकडून घ्यावीत (अंडी उकडताना त्यात थोडे मीठ घालून उकडावीत). थंड झाल्यावर त्याची कवच काढून घ्यावीत.

  2. 2

    उकडलेली अंडी वरून थोडी कापून आतील पिवळा बलक काढून घ्यावा. चित्रात दाखविल्याप्रमाणे अंडी दिसतील. आता काढलेला पिवळा बलक व थोडा सफेद भाग व्यवस्थित mash करून घ्यावा.

  3. 3

    त्या बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची, काळीमिरी पूड, चाट मसाला व मीठ घालून मिक्स करून घ्यावे.

  4. 4

    चटणी बनविताना: प्रथम चित्रात दाखविल्याप्रमाणे सगळे साहित्य घ्यावे. मिक्सरच्या भांड्यात किसलेले ओले खोबरे, कोथिंबीर, मिरची, पुदिना, लसूण पाकळ्या, लिंबाचा रस, साखर व मीठ घालून बारीक वाटून घ्यावे. गरज वाटल्यास थोडे पाणी घालावे.

  5. 5

    अंड्याच्या तयार बास्केट मध्ये हे तयार केलेले चाट मिश्रण घालावे. वरून शेव आणि कोथिंबीर घालावी. एग चाट बास्केट तय्यार !!! चटणी सोबत किंवा सॉस सोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
रोजी
virar

Similar Recipes