अप्पम (appam recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#दक्षिण #आंध्रप्रदेश

अप्पम (appam recipe in marathi)

#दक्षिण #आंध्रप्रदेश

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिट
  1. १२५ ग्रॉम (१वाटी)तांदूळ
  2. १०० ग्रॉम नारळ चव
  3. 1 टीस्पूनमीठ
  4. 3/4 टीस्पूनपीठी साखर
  5. 3/4 टीस्पूनबेकिंग सोडा
  6. चटणी साठी
  7. २ टेबलस्पून शेंगदाणे
  8. 2 टेबलस्पूनडाळ्या (फुटाण्याच्या)
  9. 1हिरवी मिरची
  10. 1लाल मिरची
  11. 4-5पाकळ्या लसूण
  12. 1/2 इंचआलं
  13. फोडणीसाठी
  14. 2 टीस्पूनतेल
  15. 1/2 टीस्पूनजिरे
  16. 1/2 टीस्पूनमोहरी
  17. 1/4 टीस्पूनहिंग
  18. 7-8कढीपत्ता पाने
  19. १ टीस्पून लींबू रस
  20. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

२५ मिनिट
  1. 1

    प्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन सात-आठ तास भिजत घातले. नारळ किसून घेतले. आता भिजवलेले तांदूळ व नारळ मिक्सरमधून काढून घेतले.वाटलेले मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घेतले.

  2. 2

    वाटलेल्या मिश्रणातील दोन टेबल स्पून मिश्रण एका पॅनमध्ये घेवून त्यात सात-आठ टेबलस्पून पाणी घातले. व गॅसवर ठेवून सतत हलवत राहिले. ते मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घेतले.

  3. 3

    वरील मिश्रण घट्ट झाल्यावर ते बॅटरमध्ये मिक्स केले व
    सात-आठ तास उबदार जागी ठेवून दिले. नंतर त्यात मीठ पीठी साखर व सोडा मीक्स केले. ह्याला थोडे बॅटरच शिजवून घातल्यामुळे यीस्टची गरज पडत नाही.

  4. 4

    आता बॅटर इडलीच्या बॅटर सारखे बनवून घेतले.व गॅसवर पॅन गरम करून त्यावर बॅटर घालून थोडं जाड अप्पम बनवले.व एकाच बाजूने शेकून घेतले. त्याला खुप छान जाळी पडते.

  5. 5

    असे सर्व अप्पम बनवून डीश मधे काढून घेतले.

  6. 6

    चटणी बनवण्यासाठी भाजलेले शेंगदाणे,डाळ्या, मीठ, हिरवी व लाल मिरची, लसूण, आलं, थोडा लींबू रस घालून वाटून घेतले.व तेल गरम करून मोहोरी, जिरे, हिंग, कढीपत्ता ह्यांची फोडणी तयार करून चटणीत मीक्स केली.

  7. 7

    फोडणी मीक्स केलेली चटणी बाऊलमधे काढून डीशमधे अप्पम व चटणी ठेवून सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes