ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ (मराठवाडा स्पेशल) (jowarichya pithache thalipith recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ
मराठवाडा स्पेशल
मराठवाड्यात ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ करतात वते भाजलेले शेंगदाणे व हिरव्या मिरची सोबत खाल्ले जाते .
एका बाजूने लो फ्लेमवर खरपूस तेलावर भाजतात .आज मी त्यात मेथी व कांदा घालून बनवले आहे. व दोन्ही बाजूनी भाजले. बघूया कसे झालेय ते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
  1. 250 ग्रॅमज्वारिचे पीठ
  2. 3-4 टेबलस्पून बेसन पिठ
  3. 1 कपमेथीची भाजी धुवुन बारीक चीरून
  4. 1कांदा छोटा बारीक चीरून
  5. 1 1/2 टीस्पूनलाल तिखट (आवडीने तिखट कमी अधिक करू शकता)
  6. 3/4 टीस्पूनहळद
  7. 1/4 टीस्पूनहिंग
  8. 1 1/4 टीस्पूनमीठ
  9. 2-3 टेबलस्पून तेल
  10. 1हिरवी मिरची
  11. 2 टेबलस्पूनभाजलेले शेंगदाणे

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    ज्वारीच्या पिठात बेसन पिठ,तिखट,मीठ,हळद,हिंग घालून एकत्र करून घ्या.

  2. 2

    आता कांदा व मेथी घालून लागेल तसे पाणी घालून मऊसर गोळा भिजवून पाच मिनिट ठेवून द्या.नंतर गोळ्याचे दोन भाग करा.

  3. 3

    तव्यावर अर्धा टेबल स्पून तेल घालून तव्याला लावून घ्या. थंड तव्यावरच हाताने थापून थालिपीठ लावून घ्या. त्याला बोटाने छीद्रे पाडून घ्या.

  4. 4

    आता त्या छिद्रात एक-दोन थेंब तेल घालून घ्या.तवा गॅसवर लो मिडीयम फ्लेमवर खरपूस शेकून घ्या. एका बाजूने दोन-तिन मिनिट भाजा(थालीपीठ एका बाजूने भाजायचे म्हणजे वाफेचे तर गॅस फ्लेम स्वीम ठेवून पाच-सात मिनिट भाजावे) मला दोन्ही बाजूनी भाजून घेतलेले आवडते ते मी भाजले.तव्यावर झाकण ठेवून भाजावे.

  5. 5

    आता मिरची गॅसवर जाळी ठेवून किंवा चीमट्यात पकडून भाजून घ्या.थालीपीठ मिरची व शेंगदाणे सोबत सर्व्ह करा. हवे असल्यास थालिपीठावर कच्चे तेल लावून खाऊ शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes