संत्र्याचा मुरब्बा.. (santrachya murabba recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#CookpadTurns4
#Cookwithfruit
बाजारात बऱ्याच प्रमाणात संत्र्याची आवक वाढली आहे. आणि तसेही संत्रे हे सर्वांनाच्या आवडीचे... रोजच्या आहारात संत्र्याचा समावेश करणं, आरोग्यासाठी लाभदायी आहे..... चवीला आंबट गोड असे हे फळ.. त्यापासून मी आज संत्र्याचा मुरब्बा केला. आंबट गोड असा मुरब्बा चवीला खूप चविष्ट झालाय. हा मुरंबा करताना यात मी साखर आणि गुळ दोन्हीचाही वापर केला आहे. गुळ घातल्याने मुरब्बा हेल्दी होतो, आणि चव पण खूप छान लागतो.
तेव्हा नक्की ट्राय करा..*संत्र्याचा मुरब्बा *💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
चार व्यक्ती साठी
  1. 3-4हिरवी संत्री
  2. 5-6 टेबलस्पूनसाखर/ गुळ
  3. 1 टेबलस्पूनविलायची पावडर
  4. 1/2 टिस्पुनतिखट
  5. 7-8केशर काड्या
  6. एका लिंबाचा रस
  7. 1 पिंचमीठ

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    सर्व संत्री सोलुन घ्या. फोडी अलग करून घ्या. चाकूने फोडीला मधोमध चिरा देऊन त्यामधील बिया नीट काढून घ्या.

  2. 2

    सर्व संत्र्याची साल व्यवस्थित काढून, गर तयार करून ठेवा.

  3. 3

    नॉनस्टिक पॅनमध्ये संत्रा चा गर घेऊन त्यामध्ये साखर, गुळ घाला. झाकण लावून 10 ते 15 मिनिटे शिजवून घ्या. शिजवताना मध्ये मध्ये चमच्याने फिरवत रहा.

  4. 4

    आता यामध्ये केसर काड्या, लिंबूरस व वेलचीपूड घालून, चांगले मिक्स करून घ्या. परत पाच मिनिटे शिजवून गॅस बंद करा.

  5. 5

    तयार आहे आपला आंबट-गोड असा *संत्र्याचा मुरंबा*... 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

Similar Recipes