कॉन्सन्ट्रेट आवळा ड्रिंक (Concentrate awla drink recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#jdr
#आवळाड्रिंक
विटामिन सी ने परिपूर्ण असलेला आवळा आणि त्यापासून बनविलेला ज्युस शरीरातील बऱ्याच व्याधींना कमी करण्यास मदत करतो. आवळा थंड असल्याने उन्हाळ्यात यांचे सेवन शरीरासाठी खूप लाभदायी ठरते. हे तयार केलेला आवळ्याचा ज्यूस याचा वर्षभर वापर आपण करू शकतो.. सकाळी सकाळी उपाशीपोटी हे ड्रिंक आपल्या तब्येतीला खूप गुणकारी ठरते. तसेही आयुर्वेदातही आवळ्याला अधिक महत्त्व देण्यात आले आहे....
आवळा पाचक तर आहेच पण यामुळे रक्त सुद्धा शुद्ध होते... लघवीचा त्रास ज्यांना आहे, त्यांच्यासाठी आवळा सरबत अतिशय उत्तम...
भरपूर प्रमाणात प्रोटिन्स युक्त असलेला आवळ्यापासून कॉन्सन्ट्रेट आवळा ड्रिंक तयार केले आहे, कुठलेही प्रिव्हेंटिव्ह न वापरता..
हे आवळा ड्रिंक तुम्ही वर्षभर फ्रीजमध्ये ठेवून त्याचा आस्वाद जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊ शकता...
तयार केलेले हे ड्रिंक तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवून स्टोअर करू शकता. बर्फाच्या ट्रेमध्ये ज्युस भरून फ्रिज करावा. ज्युस फ्रीज झाला कि ट्रे मधून काढून हे क्युबस प्लास्टिकच्या झिपलॉक पिशवीत ठेवावे. आणि परत फ्रिजरमध्ये ठेवून जेव्हा लागेल तेव्हा एक दोन क्युबचा वापर करून तुम्ही सरबत बनवून शकता..
तेव्हा नक्की ट्राय करा *कॉन्सन्ट्रेट आवळा ड्रिंक*.. 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
चार व्यक्ती साठी
  1. 250 ग्रामआवळे
  2. 750 ग्रामसाखर
  3. 1/2 टीस्पूनअदरकचा रस
  4. 2 टेबलस्पूनहनी
  5. 5-6आईस क्यूब
  6. 6-7पुदिन्याची पाने
  7. 4-5लिंबाचा रस

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    आवळे स्वच्छ धुऊन पुसून घ्यावेत. व त्याचे सुरीने छोटे छोटे काप करून घ्यावेत.

  2. 2

    मिक्सरच्या पॉट मध्ये हे काप घालून त्याची बारीक सुम्द पेस्ट करून घ्यावी. नंतर ही पेस्ट चाळणीने किंवा स्वच्छ कपड्याने गाळून घ्यावी. आपला आवळ्याचा रस तयार.

  3. 3

    उरलेल्या आवळ्याचा चोथ्याला(किस) मीठ लावून उन्हात वाळवून घ्यावे. त्यापासून आवळा पावडर किंवा आवळ्याचा किस तयार करता येतो.

  4. 4

    स्टीलच्या जाड बुडाच्या पातेल्यात हा रस घालावा व त्यात साखर घालून गॅसवर ठेवून सिम वरती पाक होईस्तोवर शिजवून घ्यावा.

  5. 5

    सिरपला बुडबुडे आले की गॅस बंद कराव. नंतर त्यामध्ये लिंबाचा रस व अद्रकाचा रस घालून कॉन्सन्ट्रेट आवळा ज्युस थंड करावा. थंड झाल्यावर काचेच्या बाॅटल मध्ये भरुन ठेवावा.

  6. 6

    शरबत सर्व्ह करताना काचेच्या ग्लासमध्ये आधी लिंबू चे काप, हनी व पुदिन्याची पाने घालून किंचित त्याला क्रश करून घ्यावे व नंतर दोन चमचे कॉन्सन्ट्रेट आवळा ज्यूस घालावा. व आवश्यकतेनुसार पाणी घालून चांगले मिक्स करून घ्यावे.

  7. 7

    वरून आईस क्यूब घालावे. व रिफ्रेशिंग थंडा थंडा कुल कुल कॉन्सन्ट्रेट आवळा ड्रिंक सर्व्ह करावे... 💃 💕

  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes