अडाई डोसा.. अर्थात मिक्स डाळींचा झटपट डोसा

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#दक्षिण #दक्षिण भारत रेसिपीज #आंध्रप्रदेश

दक्षिण भारतातील इडली डोसा या पदार्थांवरच माझं प्रेम एव्हाना तुम्हाला चांगलीच ठाऊक झालं असेल. हे माझं कम्फर्ट फूड आहे .या गोष्टी मला मिळाल्या की मी खूप खुश असते. त्यामुळे दक्षिण भारत रेसिपीज ही थीम आल्यावर मै फुले नही समाई अशी काही माझी अवस्था झाली होती. काय करू आणि काय नाही असे झाले आहे मला.. त्यामुळे वेगवेगळे डोशांचे प्रकार करणे ही माझ्यासाठी आयतीच चालून आलेली संधी आहे. तर आजचा हा अडाई डोसा किंवा मिक्स डाळीचा डोसा म्हणजे प्रोटीन पॅक पौष्टिक ब्रेकफास्ट होय . यामध्ये तांदूळ वापरले नाहीये आणि फर्मेंटेशन करायची गरज नसते त्यामुळे अतिशय सोपे आणि झटपट होणारे हे डोसे.. तसेच हे पीठ आपण दोन-तीन दिवस फ्रीजमध्ये आरामात ठेवू शकतो. वाढत्या वयाच्या मुलांसाठी तर हा एक आदर्श ब्रेकफास्ट प्रकार आहे यामध्ये लोह प्रोटीन यांची भरपूर मात्रा असल्यामुळे अतिशय पौष्टिक आणि रुचकर असा हा प्रकार आहे. शिवाय ग्लुटेन फ्री आणि जर तेल वापरून केले तर Vegan superfood.. भारतीय खाद्यसंस्कृती ने आपल्या आहाराचा किती खोलवर विचार केलेला आहे हे आपल्याला दिसून येते..एकाच पदार्थापासून किती पोषणमूल्य मिळतात आपल्या शरीराला. शिवाय किती ते सगळे पदार्थ रुचकर चवीला.. म्हणूनच पुन्हा पुन्हा मी आपल्या भारतीय खाद्यसंस्कृती च्या प्रेमात पडते.. चला तर मग झटपट डोसा झटपट बनवूया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 ते 40 मिनिटे
5 जणांना
  1. 1 कपउडीद डाळ
  2. 1/2 कपपिवळी मुगडाळ
  3. 1/4 कपचणाडाळ
  4. 1/4 कपतूर डाळ
  5. मीठ चवीनुसार
  6. तेल

कुकिंग सूचना

30 ते 40 मिनिटे
  1. 1

    एका पातेल्यात वरील सर्व डाळी एकत्र करून व्यवस्थित स्वच्छ धुऊन घ्या आणि त्यात पाणी घालून सहा ते सात तास भिजत ठेवा.

  2. 2

    नंतर डाळीमधले पाणी उपसून थोडे पाणी थोडे-थोडे पाणी घालत मिक्सरमध्ये सर्व डाळी बारीक वाटून घ्या. तुम्हाला जर डोसे पातळ असे हवे असतील तर पीठ thick consistency च ठेवा.. आणि जर डोसे जाड हवे असतील तर पीठ थोडे पातळ ठेवा.

  3. 3

    आता तवा गरम झाल्यावर तव्यावर डोसा पीठ टाकून बाजूने तेल सोडून डोसे घाला.. एक मिनिट झाकण ठेवून डोसा सोनेरी रंगावर भाजून घ्या नंतर उलटून दुसऱ्या बाजूने पण भाजून घ्या. अशाप्रकारे सगळे डोसे करून घ्या.

  4. 4

    आता एका डिश मध्ये तयार झालेले अडाई डोसे खोबऱ्याची चटणी आणि सांबार बरोबर सर्व्ह करा.

  5. 5
  6. 6
  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes