मिश्र डाळींचा डोसा

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#goldenapron3
#week9
#डोसा
आजकाल बऱ्याच प्रकारचे डोसे सर्वजण करतात म्हणून म्हटलं आपणही आज मिश्र डाळींचे डोसे करून बघू या, हे मिश्र डाळींचे डोसे एकदम पौष्टिक असे मस्त अप्रतिम झालेत....मी मुगडाळ सालीची वापरली तुम्ही साधी पिवळी वापरू शकता.

मिश्र डाळींचा डोसा

#goldenapron3
#week9
#डोसा
आजकाल बऱ्याच प्रकारचे डोसे सर्वजण करतात म्हणून म्हटलं आपणही आज मिश्र डाळींचे डोसे करून बघू या, हे मिश्र डाळींचे डोसे एकदम पौष्टिक असे मस्त अप्रतिम झालेत....मी मुगडाळ सालीची वापरली तुम्ही साधी पिवळी वापरू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५ मिनिटे
४ जण
  1. १ कप जाडे तांदूळ
  2. १/४ कप चणाडाळ
  3. १/४ कप तूरडाळ
  4. १/४ कप उडीद डाळ
  5. १/४ कप सालीची मुगडाळ
  6. १/२ टिस्पून मेथी
  7. पाणी आवश्यकतेनुसार
  8. चटणी साठी:
  9. १ कप कोथिंबीर
  10. ४-५ हिरव्या मिरच्या
  11. ७-८ लसूण पाकळ्या
  12. १/२ " आलं
  13. १ कप ओले खोबरे
  14. चवीनुसार मीठ
  15. फोडणीसाठी
  16. १ टि स्पून तेल
  17. १ टिस्पून मोहरी
  18. ५-६ कढीपत्त्याची पाने

कुकिंग सूचना

५ मिनिटे
  1. 1

    सर्व डाळी व तांदूळ स्वच्छ धुवून पाणी घालून ५-६ तास भिजत ठेवले आणि रात्री मिक्सरवर बारीक वाटून आंबवण्यासाठी रात्रभर ठेवले.

  2. 2

    सकाळी पीठ फुगलेले दिसेल. भिड्यावर किंवा डोसा पॅनवर पीठ चमच्याने पसरवून घ्या. दोन्ही बाजूनी भाजा.

  3. 3

    चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, आलं, ओले खोबरे व पाणी घालून वाटून घेतले व चवीनुसार मीठ टाकले

  4. 4

    फोडणीसाठी तेलात मोहरी, कढीपत्ता घातला. मोहरी तडतडली की गॅस बंद करून ही फोडणी चटणीवर घाला.

  5. 5

    मस्त गरमागरम डोसा चटणी व सांबार बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes