शेव_कढी (sev kadhi recipe in marathi)

Rohini Kelapure
Rohini Kelapure @cook_25511830
पुणे

#GA4
#week12
#besan
आपण कढी अगदी आवडीने बनवतो. शेव नाष्ट्यामध्ये किंवा सहज तोंडात टाकायला म्हणून घेतो. पण इथे तळलेली शेव न वापरता कढीत डायरेक्ट पाडली आहे.
मला तर ही #शेव_कढी अतिशय आवडली. तुम्हालाही नक्कीच खूप आवडेल.

शेव_कढी (sev kadhi recipe in marathi)

#GA4
#week12
#besan
आपण कढी अगदी आवडीने बनवतो. शेव नाष्ट्यामध्ये किंवा सहज तोंडात टाकायला म्हणून घेतो. पण इथे तळलेली शेव न वापरता कढीत डायरेक्ट पाडली आहे.
मला तर ही #शेव_कढी अतिशय आवडली. तुम्हालाही नक्कीच खूप आवडेल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
४ माणसे
  1. 1/2 वाटीदही
  2. 1/2 वाटीबेसन
  3. 1/4 चमचाआले - लसूण पेस्ट
  4. 1/8 चमचाहिंग
  5. 3/4 चमचातिखट
  6. 1/2 चमचाहळद
  7. 1/4 चमचाजिरेपूड
  8. मीठ चवीनुसार
  9. 1/8 चमचाजीरे
  10. 2 चमचेतेल
  11. १½ वाटी पाणी

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    बेसनात जिरेपूड, ¼ चमचा हळद, ½ चमचा तिखट, चवीप्रमाणे मीठ आणि थोडेसे पाणी वापरून घट्टसर कालवावे.

  2. 2

    कढईत तेल घालून तापले की त्यात जीरे, हिंग, ¼ चमचा हळद आणि ½ चमचा तिखट घाला. लगेच गाळलेले दही आणि १½ वाटी पाणी घाला. सतत ढवळत रहा म्हणजे दही फाटणार नाही.

  3. 3

    उकळी फुटली की झारा कढईवर धरून बेसनाचे घट्ट मिश्रण झाऱ्यावर घासून शेव खाली कढईत पाडा.

  4. 4

    छान उकळ्या येऊ द्या. कढी सतत ढवळत रहा. शेव शिजली की आपोआप वर येईल. वरून गॅसवरून उतरवा आणि गरमागरम सर्व्ह करा. भाताबरोबर द्या किंवा पोळीबरोबर, अतिशय वेगळी आणि चविष्ट लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini Kelapure
Rohini Kelapure @cook_25511830
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes