रगडा पॅटीस (Ragda Pattice recipe in marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#ks8
मुंबई-पुण्यात ठिकठिकाणच्या रस्त्यांवर वडापाव,भजी,मूग भजी,दाबेली,दहीवडा,सामोसा,रगडापँटीस,मिसळ यांच्या खाऊगल्ल्या आहेत.एकदा का चव कळली की सुट्टीत किंवा एरवीही बदल म्हणून आपोआप पावलं वळतात.कित्येकांचे सकाळ संध्याकाळचे खाणे या ठिकाणी आरामात होते.कधीकधी हॉटेलींगपेक्षा इकडेही हे चाट आयटम्स खायला खूप गर्दी असते.स्ट्रीटफूड तसं सगळ्यांच्या आवडीचं आणि परवडणेबलही😂तरुणाई असो की वयस्कर,शाळा-कॉलेजवाले किंवा ऑफिसवाले सगळ्यांची भूक शमवणारे हे स्ट्रीटफूडवाले यांची मला नेहमीच उत्सुकता वाटते.किती तयारी करावी लागते हे आपण घरी केले की समजते!दररोज हेच करणं किती अवघड आणि किचकट काम आहे.सगळा कच्चामाल सतत तयार ठेवणं,कांदा,कोथिंबीर चिरण्यासाठी आणि हाताखाली कामगार मंडळी किंवा घरातलीच माणसं किती सज्ज असतात.खूप पेशन्सचा हा धंदा आहे.कधी चालला तर खूप नाहीतर कधी काही नाही...असं हातावरचं पोट असलेलं हे स्ट्रीटफूड!
हल्ली महापालिकांचे आणि आरोग्यविभागाचे सतत लक्ष असल्यामुळे स्वच्छता,पदार्थांची चव हे लोकही पाळतात...अर्थात खूप ठिकाणी असं नसतंच,त्यामुळे रस्त्यावरचे खाणे टाळले जाते.
मी पहिल्यांदा रगडापँटीस खाल्लं ते माझ्या मोठ्या चुलतबहिणीबरोबर गोरेगावला!!तिला खूप चाट आयटेम्स आवडायचे.सुट्टीत काकांकडे गेलो की ती नेहमी घेऊन जायची...मग भेळ,सामोसे,वडापाव,रगडापुरी,पाणी पुरी,रगडापॅटीसवर जेवणच व्हायचे!पुण्यात मनिषा,गणेश,कल्याण,कल्पना अशी चाट पदार्थांची माझी आवडती ठिकाणं आहेत.अधूनमधून इथे गेल्याशिवाय करमतच नाही.ज्या कोणी हे रगडापँटीस पहिल्यांदा केले असेल त्याला माझा प्रणाम...आज तमाम दुनिया इनके मुठ्ठीमें हैं।
चला....आपणही बनवू या स्ट्रीटफूड...जरा चंमतग😃😄👍😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
6व्यक्ती
  1. रगडा  साहित्य:
  2. 2 कपपांढरे वाटाणे 6-7 तास भिजवूूून
  3. 4 टेबलस्पूनतेल
  4. फोडणी साहित्य :
  5. 1 टीस्पूनजीरे,
  6. 1 टीस्पूनहिंग,
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 2-3मिरच्या पेस्ट करुन
  9. 2 टेबलस्पूनगरम मसाला
  10. 1.5 टीस्पूनमिरची पावडर
  11. 2 टीस्पूनधणेजीरे पूड
  12. 1 चिमूटभरबेकींग सोडा
  13. 2 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  14. 2-3 टीस्पूनमीठ
  15. पाणी गरजेनुसार
  16. 1 कपकोथिंबीर चिरुन
  17. पॅटीस :
  18. 5-6उकडलेले बटाटे
  19. 6ब्रेड स्लाईस
  20. 1/2 कपचिरलेली कोथिंबीर
  21. 3 टीस्पूनआलं लसूण पेस्ट
  22. 1 टीस्पूनचाट मसाला
  23. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  24. 2 टीस्पूनगरम मसाला
  25. 1 टीस्पूनकसूरी मेथी
  26. 2 टीस्पूनमीठ
  27. गार्निशींग :
  28. 1 कपचिरलेला
  29. 1/2 कपचिरलेली कोथिंबीर
  30. खजूर चिंच चटणी (रेडीमेड वापरली आहे)
  31. मिरची पुदिना चटणी (रेडीमेड वापरली आहे)
  32. 0नंबरची शेव

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    प्रथम रगडा तयार करुन घेऊ :
    पांढरे वाटाणे 6-7तास भिजवून घ्यावेत.
    रगडा तयार करायला लागणारे सर्व साहित्य "रगडा विभागात" दिल्याप्रमाणे ट्रे मध्ये काढून घ्यावे.

  2. 2

    रगडा मोठ्या कुकरमध्ये केला आहे.गँसवर कुकर तापत ठेवून त्यात तेल घालावे.जीरे,हिंग,हळद यांची फोडणी करावी. त्यात मिरची पेस्ट घालावी.
    त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालावी.

  3. 3

    आता गरम मसाला,तिखट घालून फोडणी हलवावी.

  4. 4

    फोडणीवर थोडे पाणी घालून 2मि.परतावे.आता भिजवलेले वाटाणे यात घालावेत.सर्व हलवून त्यावर बेकींग सोडा घालावा.याने वाटाणे अगदी मऊ शिजतात.

  5. 5

    मीठ व पाणी घालून कुकरचे झाकण लावावे.4-6शिट्ट्या करुन घ्याव्यात. रगडा करायची ही पद्धत मला सोपी वाटते.

  6. 6

    पॅटीस करायला घ्यावेत.तो पर्यंत एकीकडे कुकर होईल.पँटीस साठी "पॅटीस विभागात" दिल्यानुसार सर्व साहित्य परातीत तयार ठेवावे. चिरलेली कोथिंबीर घ्यावी.

  7. 7

    उकडलेले बटाटे हाताने मऊ कुस्करून घ्यावेत.
    मिक्सरमधून ब्रेड स्लाईस बारीक करून घ्यावेत.
    हा ब्रेड चुरा कुसकरलेल्या बटाट्यावर घालावा.
    आता सर्व मसाले,हळद,कोथिंबीर घालून घ्यावे.

  8. 8

    जरुर वाटल्यास पाणी थोडेसेच घालून मिश्रण भिजवून घ्यावे.
    त्याचे हव्या त्या आकाराचे पॅटीस बनवून ठेवावेत.
    मोठ्या नॉनस्टिक तव्यावर सर्व पॅटीस लावून घ्यावेत.

  9. 9

    त्यावर थोडे थोडे तेल सोडून शँलोफ्राय करावेत.

  10. 10

    कुकरचे प्रेशर पडून रगडा पूर्ण मऊ असा शिजला आहे. डीश तयार करण्यासाठी गार्निशींगचे साहित्य तयार ठेवावे.

  11. 11

    आता प्लेटींग करुन घ्यावे.
    प्रथम मध्यम आकाराच्या डीशमधे 2-3पॅटीस ठेवावेत.त्यावर शिजलेला रगडा घालावा.नंतर पुदिना मिरची चटणी,खजूर चिंच चटणी घालावी.चिरलेला कांदा घालावा.नंतर बारीक शेव व कोथिंबीर घालून डीश तयार करावी.

  12. 12

    चटकदार आणि लज्जतदार रगडा पॅटीस तयार आहे!!😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes