उकडहंडी (ukhandi recipe in marathi)

Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252

वाडवळ समाजामध्ये उकडहंडी हा पारंपरिक खाद्यपदार्थ बनवला जातो. कोनफळ, रताळे, शेवग्याच्या शेंगा, पापडी, वांगी, गाजर, वालगोळे, कोथिंबीर, नारळ, मटार, पातीचा कांदा, शेंगदाणे, तीळ आले लसूण पेस्ट मिरच्या मसाल्याचे मिश्रण करून वाफेवर ही भाजी अत्यंत कमी तेलावर शिजवली जाते.

उकडहंडी (ukhandi recipe in marathi)

वाडवळ समाजामध्ये उकडहंडी हा पारंपरिक खाद्यपदार्थ बनवला जातो. कोनफळ, रताळे, शेवग्याच्या शेंगा, पापडी, वांगी, गाजर, वालगोळे, कोथिंबीर, नारळ, मटार, पातीचा कांदा, शेंगदाणे, तीळ आले लसूण पेस्ट मिरच्या मसाल्याचे मिश्रण करून वाफेवर ही भाजी अत्यंत कमी तेलावर शिजवली जाते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 500 ग्रॅमवांगी चौकोनी फोडी करून
  2. ३०० ग्रॅम कोनफळ चौकोनी फोडी करून
  3. 2रताळी चौकोनी फोडी करून
  4. 1मोठा बटाटा चौकोनी फोडी करून
  5. 200 ग्रॅमवाल पापडी चे गोळे/दाणे
  6. २५० ग्रॅम पापडी/घेवडा मोडलेली
  7. 4 शेवग्याच्या शेंगाचे तुकडे
  8. 2गाजर चौकोनी फोडी करून
  9. 100 ग्रॅमभिजवलेले शेंगदाणे
  10. 200 ग्रॅममटारचे दाणे
  11. 2अटकोल(नवलकोल) चौकोनी फोडी करून
  12. 2कांदे बारीक चिरलेेलेे
  13. 2-3 पातीचे कांदे(उळपात) बारीक चीरून
  14. 2टोमॅटो चौकोनी फोडी करून
  15. 1 टीस्पूनहिंग
  16. 1 वाटीबारीक चिरलेला गुळ
  17. 2 टेबलस्पूनपांढरे तीळ (unpolished)
  18. 3-4 टेबलस्पून घरगुती मसाला
  19. 2 टेबलस्पूनगरम मसाला
  20. 2 टीस्पूनहळद
  21. मीठ चवीनुसार
  22. 1मोठी वाटी खोवलेला नारळ
  23. कोथिंबीर बारीक चीरलेली
  24. 1 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  25. 4-5 पोपटी मिरच्या
  26. 200 ग्रॅमतेल

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व भाज्या स्वच्छ धुवून घ्या. भाज्या चिरून म्हणजेच जरा मोठे तुकडे (फोडी)करुन घ्या.

  2. 2

    एका मोठ्या जाड बुडाच्या पातेल्यामधे चिरलेल्या सर्व भाज्या, चवीनुसार नुसार मीठ, हळद, घरघूती मसाला, गरम मसाला, तेल टाका.सगळ्या भाज्या व मसाले वरखाली करत मिक्स करा. मग खोवलेला नारळ,गुळ आणि तीळ घालून परत सारे वरखाली करा. हे मिश्रण हाताने चांगले एकजीव करून घ्यायचे.(राळून घ्या)

  3. 3

    पारंपरिक पद्धतीनुसार ही भाजी आपण चुलीवर करणार आहोत.मध्यम आचेवर भांड्या वर झाकण ठेऊन ही भाजी पुर्णपणे वाफेवरच शिजवायची आहे. पाणी अजीबात टाकु नये. 10 मिनिटांनी भाजी फक्त विस्तवावर शिजवावी. भाजी बुडाला लागत नाही किंवा करपत नाही.

  4. 4

    सतत भाजीत चमचा फिरवू नये. 20 मिनिटांनंतर झाकण काढुन कोनफळ शिजले की नाही ते बघावे.
    कोनफळ शिजल की भाजी चुलीवरून उतरवून घ्यावी. थोडासा नारळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वरून भुरभुरावी.गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत सर्व्ह करावी.वाफळती उकडहंडी भाजी नुसतीच देखील खाल्ली जाते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252
रोजी

Similar Recipes