शेवग्याच्या शेंगांची आमटी (shevgyachya bhaji chi amti recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#GA4 #week25 #drumstick
#शेवग्याच्या_शेंगांची_आमटी
शेवग्याच्या शेंगांमधे कॅल्शिअम असते. शेंगा आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. चविला जराशी तुरट चव असली तरी त्यातील जराशा मीठ, मसाल्यामुळे चवदार चविष्ट बनते.

शेवग्याच्या शेंगांची आमटी (shevgyachya bhaji chi amti recipe in marathi)

#GA4 #week25 #drumstick
#शेवग्याच्या_शेंगांची_आमटी
शेवग्याच्या शेंगांमधे कॅल्शिअम असते. शेंगा आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. चविला जराशी तुरट चव असली तरी त्यातील जराशा मीठ, मसाल्यामुळे चवदार चविष्ट बनते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
४ जणांसाठी
  1. ४०० ग्रॅम शेवग्याच्या शेंगा
  2. 1/4 वाटीकिसलेलं सुकं खोबरं
  3. 2 टीस्पूनशेंगदाणे कुट
  4. 2 टीस्पूनतिखट पूड
  5. 2 टीस्पूनगोडा मसाला
  6. 1 टीस्पूनहळद
  7. 2 टीस्पूनमीठ
  8. 1 टीस्पूनगूळ
  9. 1 टीस्पूनचिंच
  10. 2 टीस्पूनतेल
  11. 1 टीस्पूनजीरे
  12. 1 टीस्पूनमोहरी
  13. 1/2 टीस्पूनहिंग

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    शेवग्याच्या शेंगा धुवून त्याचे तुकडे करुन घ्यावे

  2. 2

    सुकं खोबरं किसून घ्यावे. गूळ बारीक चिरुन घ्यावा. सगळे मसाले काढून घ्यावे.

  3. 3

    कुकर मधे तेल घालून त्यात फोडणीसाठी मोहरी, जीरे, कडिपत्ता घालून तो तडतडल्यावर हिंग, हळद घालून मग शेंगांचे तूकडे घालून परतावे मग त्यावर तिखट पूड, गोडा मसाला, मीठ, गूळ आणि सुकं खोबरं घालून मिक्स करावे. नंतर त्यात चिंच किंवा चिंचेचा कोळ घालून थोडे पाणी घालून मिक्स करावे व झाकण लावून कुकरची एक शिटी होऊ द्यावी.

  4. 4

    मस्त चमचमीत गरमागरम वाफाळती शेवग्याच्या शेंगांची आमटी सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

Similar Recipes