तिळाची वडी (teeladchi vadi recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#मकर संक्रांतीला तिळाचे अनेक पदार्थ केले जातात. मी आज संक्रातीसाठी तिळाच्या वड्या केल्या. झटपट होणारी ही वडी आहे. साहित्य ही कमी लागते.

तिळाची वडी (teeladchi vadi recipe in marathi)

#मकर संक्रांतीला तिळाचे अनेक पदार्थ केले जातात. मी आज संक्रातीसाठी तिळाच्या वड्या केल्या. झटपट होणारी ही वडी आहे. साहित्य ही कमी लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
50 ते 60 ग्रॅम
  1. 1/2 कपतीळ व शेंगदाणा कूट. दोन्ही मिळून
  2. 1/2 कपसाखर
  3. 1 टीस्पूनतूप

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    गॅसवर पॅन गरम करत ठेवावा. तीळ मंद आचेवर भाजून घ्यावे. 1 मिनिट परतवून घेणे. तीळ ताटलीत काढून घेणे व थंड होऊ द्यावे.

  2. 2

    त्याच पॅनमध्ये तूप घालून घेणे. साखर घालून सतत हलवत राहावे. गॅस मंद आचेवर ठेवावा. साखर पूर्ण विरघळून घेणे.

  3. 3

    त्यात तीळ व शेंगदाणा कूट घालून मिक्स करून घेणे व गॅस बंद करावा. मिश्रण सतत हलवत राहून ओटयावर काढून घेणे.

  4. 4

    किचन ओटा स्वच्छ पुसून घेणे. त्याला व लाटण्याला तेल किंवा तूप लावून घ्यावे.हे आधीच करून घेणे.

  5. 5

    ओटयावर काढून घेतलेले मिश्रण चमच्याने गोलाकार करून घेणे. तेल लावलेल्या लाटण्याने पोळी लाटून घेणे. लगेच सुरीने काप देणे किंवा हाताने तुकडे केले चालतील.

  6. 6

    तीळ पापडी/पोळी व वड्या तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes