भोगीची भाजी (bhogi chi bhaji recipe in marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#मकर
#मकर संक्रांत स्पेशल भोगीची भाजी
मकर संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी. या दिवशी सर्व भाज्या, शेंगा, वांगी घालून भोगीची भाजी बनवली जाते. ही भाजी बाजरीची तीळ लावून केलेली भाकरीबरोबर खाल्ली जाते.

भोगीची भाजी (bhogi chi bhaji recipe in marathi)

#मकर
#मकर संक्रांत स्पेशल भोगीची भाजी
मकर संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी. या दिवशी सर्व भाज्या, शेंगा, वांगी घालून भोगीची भाजी बनवली जाते. ही भाजी बाजरीची तीळ लावून केलेली भाकरीबरोबर खाल्ली जाते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
८ जण
  1. वाटणासाठी :
  2. 2 वाट्याओलं खोबरं
  3. 2कांदे
  4. कोथिंबीर
  5. भाजी बनविण्यासाठी
  6. तेल
  7. 1 टीस्पूनमोहरी
  8. 1/2 टीस्पूनजीरे
  9. हिंग
  10. 1 टीस्पूनआलं लसूण पेस्ट
  11. 3 टीस्पूनमालवणी मसाला
  12. 1/2 टीस्पूनहळद
  13. 1 टीस्पूनधनेजिरे पावडर
  14. 1 वाटीमटार
  15. 1 वाटीपावटे शेंगा
  16. 1 वाटीपापडी
  17. 1छोट्या गाजराचे तुकडे
  18. 1बटाट्याचे तुकडे
  19. 1 वाटीहिरवा हरबरा
  20. 4वांगी
  21. 1/2 वाटीशेंगदाणे भिजवलेले
  22. 2शेवगाच्या शेंगा
  23. 1टोमॅटो
  24. 1कांदा उभा चिरलेला
  25. पाणी आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    कांदा व ओलं खोबरं चांगलं लालसर भाजुन घ्या. मिक्सरमध्ये घालून त्यात कोथिंबीर घालून वाटून घ्या. हे झाले वाटण तयार.

  2. 2

    सर्व भाज्या धुवून चिरून घ्या. कढईत तेल तापवून मोहरी, जीरे, हिंग, कांदा, टोमॅटो घालून चांगलं परता. त्यात सर्व मसाले, आलं लसूण पेस्ट घालून परता.

  3. 3

    भिजवलेले शेंगदाणे, हिरवा हरबरा, शेवग्याची शेंग घालून झाकण ठेवून एक वाफ काढा. नंतर क्रमाक्रमाने बटाटा, गाजर, मटार, पावट्याच्या शेंगा, पापडी, टोमॅटो व थोडं पाणी घालून झाकण ठेवून १०-१५ मिनिटे मंद आचेवर शिजवा.

  4. 4

    थोडी शिजली की त्यात वांग्याचे तुकडे टाका व वाटण टाकून झाकण ठेवून १० मिनिटे शिजवा.

  5. 5

    तयार आहे भोगीची भाजी, ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खायची सोबत कांदा टोमॅटो, अहाहा, मस्तच लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes