दुधी भोपळ्याचे मंच्युरियन (dudhi bhopche manchurian recipe in marathi)

Archana Gajbhiye
Archana Gajbhiye @cook_26553233

#GA4 #Week21
#Bottle guard हा कीवर्ड घेऊन मी दुधी भोपळ्याचे ड्राय मंच्युरियन बनविले आहे. दुधी भोपळ्याची भाजी खाण्यासाठी मुलांना आवडत नाही पण जर दुधी भोपळ्याचे मंच्युरियन बनविले तर मुलं आवडीने खातील.

दुधी भोपळ्याचे मंच्युरियन (dudhi bhopche manchurian recipe in marathi)

#GA4 #Week21
#Bottle guard हा कीवर्ड घेऊन मी दुधी भोपळ्याचे ड्राय मंच्युरियन बनविले आहे. दुधी भोपळ्याची भाजी खाण्यासाठी मुलांना आवडत नाही पण जर दुधी भोपळ्याचे मंच्युरियन बनविले तर मुलं आवडीने खातील.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ ते २० मिनिटे
२ जणांसाठी
  1. 1 कपदुधीचा किस
  2. मीठ चवीनुसार
  3. 1 1/2 टीस्पूनकॉर्नफ्लोर
  4. 1 टीस्पूनमैदा
  5. तेल तळण्यासाठी
  6. 1/2 टीस्पूनलसूण काप
  7. 1/2 टीस्पूनआल्याचे काप
  8. 1/2 कपकांदा बारीक चिरून
  9. 1/2 टीस्पूनहिरवी मिरची चिरलेली
  10. 1 टीस्पूनसोयासॉस
  11. 1/4 कपव्हिनेगर
  12. 1 टेबलस्पूनटोमॅटो सॉस
  13. 1 कपहिरव्या पातीचा कांदा
  14. 1/2 कपसिमला मिरची बारीक चिरून

कुकिंग सूचना

१५ ते २० मिनिटे
  1. 1

    प्रथम एका बाउल मध्ये दुधीचा किस घेऊन त्यात मैदा, कॉर्नफ्लोर, आणि मीठ घालून मिक्स करून घ्यावे. यात तुम्ही मिरेपूड पण टाकू शकता. नंतर या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यावे आणि तेलात तळून घ्यावेत.

  2. 2

    नंतर एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात लसूण आणि आल्याचे काप टाकावे आणि नंतर त्यात चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे, नंतर त्यात हिरवी मिरचीचे काप घालून मिक्स करावे आणि त्यात सिमला मिरची टाकून मिक्स करावे.

  3. 3

    नंतर त्यामध्ये सोयासॉस, व्हिनेगर, आणि टोमॅटो सॉस टाकून लागेल तसे थोडे पाणी टाकून मिक्स करावे आणि तयार झालेले मंच्युरियन बाॅल्स त्यात टाकावे.

  4. 4

    आता त्यामध्ये हिरव्या पातीचा कांदा घालून मिक्स करावे आणि एका प्लेटमध्ये काढून सजावटीसाठी हिरवा पातीचा कांदा टाकून सर्व्ह करावे तयार आहे दुधी भोपळ्याचे मंच्युरियन.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Gajbhiye
Archana Gajbhiye @cook_26553233
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes