दुधीचे वडे (dudhi che wade recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#GA4 #week21#Bottle Guard दुधी भोपळा हा पौष्टीक आहे आपल्या जेवणात त्याचा नेहमी वापर केला पाहिजे दुधीच्या वेगवेगळ्या रेसिपी बनवल्या जातात सगळ्यांचा आवडता दुधी हलवा तसेच दुधीची डाळ घालुन भाजी पण मी आज तुम्हाला दुधीची तिखट रेसिपी दाखवणार आहे ती सुद्धा सगळ्यांना आवडेल चला तर बघुया आपण

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०-२० मिनिटे
२-४ जणांसाठी
  1. 1-2बारीक चिरलेले कांदे
  2. 1-2 टेबलस्पुनभिजलेली चनाडाळ
  3. चविनुसारमीठ
  4. २०० ग्रॅम तेल
  5. १०० ग्रॅम तांदुळाचे पिठ
  6. 1-2 टेबलस्पुनतिळ
  7. 1 टिस्पुनमिरची लसुण जीरे पेस्ट
  8. 1/2 टिस्पुनहळद
  9. 5-6कडिपत्याची पाने
  10. १५० ग्रॅम दुधी भोपळ्याचा किस
  11. 1 टेबलस्पुनतिखट
  12. 2 टेबलस्पुनबारीक चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

१०-२० मिनिटे
  1. 1

    दुधीचे वडे बनवण्याचे साहित्य काढुन ठेवा

  2. 2

    बाउलमध्ये सर्वसाहित्य पाणी न घालता मळुन घ्या त्यात मीठ टाका (दुधीच्या किसातील अंगच्या पाण्यामुळे वेगळे पाणी टाकण्याची गरज नाही)

  3. 3

    कढईत तेल गरम करायला ठेवा व मळलेल्या पिठातील लिंबा ऐवढा गोळा घेऊन पोळपाटावर प्लॉस्टिक पेपरला तेल लावुन गोळा थापुन वडे करा वड्याला मध्ये होल करा

  4. 4

    गरम तेलात मिडियम फ्लेमवर वडे दोन्ही बाजुने कुरकुरीत तळा

  5. 5

    तयार कुरकुरीत दुधीचे वडे डिशमध्ये केचप सोबत सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes