मोतीचूर बूंदी लाडू (motichur boondi ladoo recipe in marathi)

#SWEET
मोतीचूर बूंदी लाडू आज मी बनवले आहेत. काही काही पदार्थ असे असतात जे आपण घरी बनवायला बघतो पण ते जमत नाही पण एकदा तरी करून बघायचेच असतात. बुंदीचे लाडू ही त्या प्रकारातलेच..... बुंदी पाडणे झंझट चे काम वाटते, बुंदी जाड पडली तरी त्यापासून बारीक कळीची मोतीचूर बूंदी लाडू कसा बनवायचा ते बघूया.
😋टेस्ट में बेस्ट मोतीचूर बुंदी लाडू😋
मोतीचूर बूंदी लाडू (motichur boondi ladoo recipe in marathi)
#SWEET
मोतीचूर बूंदी लाडू आज मी बनवले आहेत. काही काही पदार्थ असे असतात जे आपण घरी बनवायला बघतो पण ते जमत नाही पण एकदा तरी करून बघायचेच असतात. बुंदीचे लाडू ही त्या प्रकारातलेच..... बुंदी पाडणे झंझट चे काम वाटते, बुंदी जाड पडली तरी त्यापासून बारीक कळीची मोतीचूर बूंदी लाडू कसा बनवायचा ते बघूया.
😋टेस्ट में बेस्ट मोतीचूर बुंदी लाडू😋
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र जमा करणे बेसन पीठ कॉर्न फ्लोअर नीट मिक्स करून घेणे त्यामध्ये पाणी घालून पातळ बॅटर तयार करणे
- 2
तयार केलेले बॅटर मध्ये 1-2 थेंब केसरी रंग घालून केशरी रंगाचे बॅटर नीट मिक्स करून घेणे. गरम तेलामध्ये तळण काढणाऱ्या झाऱ्याने बुंदी पाडून घ्यावे (किंवा बारीक भोक असलेल्या बुंदी पाडायच्या झाऱ्याने बुंदी पाडून घ्यावी.) बुंदी तीन ते चार मिनिट तेलात तळून घ्यावी. त्यानंतर टिश्यू पेपर वर बुंदी काढून घ्यावी त्यामुळे त्यातील जास्तीचे तेल निघून जाते.
- 3
तळण काढायच्या झाऱ्याने बुंदी पाडल्याने बुंदी थोडी जाडसर होते तिला एकदा मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायची त्यामुळे बुंदी बारीक होते. साखरेचा एकतारी पाक तयार करून घ्यायचा.
- 4
एका पॅनमध्ये साखर आणि पाणी घेऊन त्याचा एक तारी पाक तयार केल्यावर त्यामध्ये वेलची पावडर आणि 1-2 थेंब खाण्याचा केशरी रंग घालावा.
- 5
आता गरम पाकात बुंदी घालून ते नीट मिक्स करून त्यामध्ये भाजलेल्या खरबूज बिया आणि एक चमचा तूप घालावे. सर्व नीट मिक्स करून मिश्रण अर्धा तास झाकण लावून सुकायला ठेवावे त्यानंतर त्याचे गोल गोल मोतीचुर बुंदी लाडू बांधून घ्यावे 😋
- 6
Similar Recipes
-
बुंदी लाडू (bundi ladoo recipe in marathi)
#SWEETकोणत्याही शुभकार्यात आवर्जून आणणारा गोडाचा पदार्थ म्हणजे बुंदी लाडू..आज मी पहिल्यांदाच बुंदीचे लाडू ट्राय केलेत ते ही शुद्ध तुपातले... पहिल्याच प्रयत्नात लाडू खूप छान झालेत. Sanskruti Gaonkar -
बुंदी लाडू (bundi ladoo recipe in marathi)
#SWEET#बुंदी लाडूआज मी बुंदी लाडू बनविण्याचा पहिलाच प्रयत्न केला आणि बुंदी जरी मला हवी तशी आकारात नाही मिळाली तरी चव बाकी एकदम मिठाईवल्याकडे मिळते तीच आली म्हणून अतिशय आनंद झाला. साईबाबांच्या मंदिरात गेलं की बुंदी प्रसाद म्हणून मिळते ती खात खात आज प्रत्यक्ष करून पाहिली. कुठलीही नवीन रेसिपी स्वतः करून बघण्यात माझा तसा हातखंडा आहेच, मला असे प्रयोग करून बघायला खूप आवडते. आज cookpad नेच ही संधी दिली त्याबद्दल खुप आभारी आहे. Deepa Gad -
बुंदी लाडू (boondi ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णासेलिब्रेशन म्हणजे लाडू आणि बुंदी लाडू हे खास प्रसंगी आणि सण-उत्सवांसाठी बनविलेले एक स्वादिष्ट भारतीय गोड पदार्थ आहे आणि ते दिवाळी सणामध्ये तर हमखास बनवले जातात. खूप जणांना बुंदीचे लाडू बनवायला अवघड वाटतात पण अशा पद्धतीने बुंदीचे लाडू झटपट घरी करू शकता बनवायला खूपच सोपे जाते. चला तर मग बघुया..... बुंदी लाडू 😘 Vandana Shelar -
बुंदीचे लाडू (BOONDICHE LADOO RECIPE IN MARATHI)
#SWEETमी आज पहिल्यांदाच बुंदीचे लाडू बनविण्याचा प्रयत्न केला. मी बुंदी तळून घेतली. पण मला ते बरोबर आहेत असे वाटले नाही. म्हणून मी तळलेली बुंदी मिक्सर मधुन फिरवून घेतली. आणि मग एकदम सुंदर, मुलायम असे लाडू बनविले. Mrs. Sayali S. Sawant. -
मोतीचूर लाडू (motichoor ladoo recipe in marathi)
#wd#cooksnapआज जागतिक महिला दिनानिमित्त ,माझी मैत्रीण, ताई,अत्यंत प्रेमळ ,सुंदर आणि अन्नपूर्णेचा वरदहस्त लाभलेली मास्टर शेफ हीची मोतीचूर लाडू ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.आजची ही स्पेशल रेसिपी मी माझ्या आयुष्यातील एक जीवलग मैत्रिण 'भाग्यश्री ' ताईला dedicate करतेय.ताईच्या रेसिपी प्रमाणे , खूपच अप्रतिम , सुंदर ,टेस्टी झाले लाडू ..👌👌😋😋घरी सर्वांनी ताव मारला या लाडवांवर ...😍यापूर्वी हे लाडू कधीच घरी करून पाहिले नाहीत . पण आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हे लाडू करून पाहिले..☺️बाप्पाच्या आशिर्वादामुळे,पहिल्यांदाच करून पाहिल्यामुळे, छान वाटतयं ...😇😇 Deepti Padiyar -
बुंदीचे लाडू (BOONDICHE LADOO RECIPE IN MARATHI)
#SWEET मध्ये मी बुंदीचे लाडू बनवले आहे. बुंदीचे लाडू अनेक आनंदी प्रसंगात बनविल्या जातात. जसे की लग्नामध्ये बुंदीचे लाडू बनवल्या जाते, दिवाळीमध्ये सुद्धा बुंदीचे लाडू बनवले जातात, मंदिरामध्ये प्रसाद म्हणून बुंदीचे लाडू बनविला जाते, भेट म्हणून देण्यासाठी बुंदीचे लाडू पॅक करून देता येतात, अशाप्रकारे अनेक प्रसंगात बुंदीचे लाडू बनविल्या जातात. बुंदीचे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. ज्याप्रमाणे बाहेर मिठाईवाल्यां जवळ मिळतात तसे बुंदीचे लाडू जरी होत नसेल तरी आपण घरी बनवलेल्या बुंदीचे लाडू खाण्याचे वेगळे समाधान असते. घरी बनवले असल्यामुळे कोणी बनवले असेल कसे बनवले असेल याची काळजी नसते. बुंदीचे लाडू घरी बनवायचे म्हणजे प्रश्न निर्माण होतात आपल्याजवळ बुंदीचा झारा असेलच असे नाही. म्हणून मी येथे घरच्या घरीच असलेल्या साहित्यात बुंदीचे लाडू बनविले आहे. बुंदीचे लाडू बनविण्यासाठी किसनी आणि झारा चा वापर केलेला आहे. बुंदीचे लाडू छान होतात आणि आपल्या हाताने बनवून घरच्यांना खाऊ घालण्याचे समाधान मिळते. Archana Gajbhiye -
मोतीचुर लाडू (Motichoor laddu recipe in marathi)
#MWK#माझा Weekend किचन रेसिपी चॅलेंज "मोतीचुर लाडू"हे लाडू मी बुंदी न पाडता केले आहेत.आणि पहिल्यांदा ट्राय केले पण खुप छान झाले आहेत.. मस्त पाकात मुरलेले रसाळ लाडू झाले आहेत. लता धानापुने -
"रसभरीत बुंदीचे लाडू" (rasbarit boondiche ladoo recipe in marathi)
#SWEET " रसभरीत बुंदीचे लाडू" रसभरीत हे नाव मी दिले आहे बुंदी लाडू ला..पण खरंच एवढे सुंदर पाकाने रसरशीत भिजलेले मस्त गोड गोड लाडू झाले आहेत.. मी आज पहिल्यांदाच बनवले आहेत.. तशी थोडी माहिती होती, म्हणजे भावाच्या लग्नात करताना बघीतले होते... एक कप बेसन पीठामध्ये एवढी बुंदी तयार होईल, असं वाटलच नाही...मी जरा मोठेच लाडू वळले आहेत त्यामुळे बारा लाडू झाले आहेत.. अजून जरा लहान साईज चे केले तर पंधरा होतील.. मला खुप अवघड वाटत होते म्हणून मी कधी बनवले नाहीत..आज पहिल्यांदाच ट्राय केले,पण अतिशय सुंदर, मस्त झाले आहेत...ही रेसिपी मी स्वतः बनवली माझ्या हाताने या गोष्टीचा मला खुप खुप आनंद झाला आहे... त्यामुळे Thank you Cookpad India ❤️ चला तर एकदम सोप्या पद्धतीने मी रेसिपी दाखवते.. लता धानापुने -
बुंदी न पाडता मोतीचूरचे लाडू (Motichoor Ladoo Recipe In Marathi
#diwali21#मोतीचूरचेलाडू#लाडू#बुंदीलाडू#दिवाळीस्पेशलरेसिपीया दिवाळीत तुम्ही हे लाडू तयार करून बघातेल न वापरता कमी तुपात तयार होतातकोणतेही फेस्टिवल म्हटले म्हणजे गोड थोडं हे घरात तयार होणारच त्यात दिवाळी हा सर्वात मोठा सण साजरा करण्यासाठी आपण जवळपास सगळेच पदार्थ घरात तयार करतो त्यातला एक प्रमुख प्रकार बुंदीचे लाडू हे आपल्याला जास्त तर हलवाईच्या दुकानातून आणून खायला आवडतात पण अगदी सोप्या पद्धतीने आपण हे लाडू घरात तयार करू शकतो हे कशाप्रकारे या रेसिपी तून नक्कीच बघा कारण बुंदी न पाडता सोप्या पद्धतीने लाडू आपण तयार करू शकतो आणि खुप कमी वस्तू पासून जास्त लाडू तयार होतातअगदी कमी वेळेत आपण हे लाडू तयार करू शकतोमला अशा प्रकारचे लाडू तयार करायची आयडिया वाटली डाळ करताना आले होती मी वाटली डाळ करत होते तेव्हा मला ही आयडिया आली की आपण अशाप्रकारे जर लाडू केले तर आणि हा प्रयोग सक्सेस सही झाला लाडू खूप छान तयार झाले आणि मीडियम साईज चे भरपुर लाडू तयार झालेअशाप्रकारे लाडू तयार करून बघाच Chetana Bhojak -
मोतिचुर लाडू (Motichoor Ladoo Recipe In Marathi)
#DDRदिवाळी म्हटला की विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ लाडू, चकली, शेव ,हे बनतातच नेहमी बनलं जात हि रेसिपी खास लेकि साठी. माझ्या पोरीला मोतीचूरचा लाडू खूप आवडतो नेहमी विकत आणला जातो म्हणून स्पेशल यावेळेस तिच्यासाठी खास मी हा लाडू घरीच ट्राय केला अगदी सोप्या पद्धतीने केलेला आहे. खूप छान झालेला बिना बुंदी पाडून हा लाडू झटपट तयार होतो. Deepali dake Kulkarni -
दामट्याचे लाडू नगर स्पेशल माझ्या आईची स्पेशल रेसिपी (damtyache ladoo recipe in marathi)
Savita Totare Metrewar -
बुंदीचे लाडू (Boondiche ladoo Recipe In Marathi)
#GSR#बाप्पासाठी नैवेद्यबुंदीचे लाडू(बुंदी न पाडता) Hema Wane -
रवा लाडू (rava ladoo recipe in marathi)
#लाडूमाझा आई ची speciality आहे, तिच्या सारखे आम्हाला जमत नाही. घटक सुधा तेच घेऊन सुधा किती वेळा प्रयत्न केले तरी तिच्या हाताची चव काय येत नाही. कायम 12 महिने हे लाडू काचेच्या बरणीत भरून असतात. बरणी सुधा & जागा सुधा कधी change kele nahi तिने. माझा म्हणजे टी बरणी सुधा कधी फुटली नाही..😊लग्नात आमच्यकडे आलेले सर्व्ह पाव्हण्याना जाताना चिवडा व लाडू द्यायची पद्धत. दळ बेसन चे लाडू देतो.दळ म्हणजे रवा लाडू आता बुंदी चे लाडू ची प्रथा चालू झाले. Sonali Shah -
मोतीचूर लाडू (motichoor laddu recipe in marathi)
#dfr#दिवाळी स्पेशल#दिवाळी फराळहे लाडू मी बुंदी न तळता केलेले आहे अगदी मोतीचूर सारखेच लागतात😋 घरात सर्वांनाच आवडली खूप सोपे आहे करायला या मापाने केले की चाचणी पण बिघडत नाही😀तर बघूया कसे केले Sapna Sawaji -
कुरकुरीत इमरती
##गुढी इमरती हि आपण हॉटेल मध्ये वगैरे बघतो, डिसाइन पाहून वाटतं किती कठीण असेल करायला .. पण नाही आज च्या रेसिपी ने तुम्ही घरच्या घरी खूपच सोप्प्या पद्धतीने करू शकता Monal Bhoyar -
-
-
डाळीचे लाडू किंवा दामट्याचे लाडू (damtyache ladoo recipe in marathi)
#लाडूलाडू म्हटले की अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ.... लग्नसमारंभ असो की वाढदिवस हा एक पदार्थ हमखास ताटात पाहिजेच. आजीच्या हातचे लाडू आणि ती चव अजूनही जिभेवर रेंगाळते तशीच बनवण्याचा छोटासा प्रयत्न.... Ashwini's Cakes N Classes Ashwini's Cakes N Classes -
-
राघवदास लाडू
#EB14#W14कोणत्याही मंगल प्रसंगी ,सणावाराला,भगवंताला नैवेद्यासाठी राघवदास लाडू बनविले जातात. चविला अप्रतिम असे लाडू. Arya Paradkar -
कुरकुरीत इमरती
##गुढी इमरती हि आपण हॉटेल मध्ये वगैरे बघतो, डिसाइन पाहून वाटतं किती कठीण असेल करायला .. पण नाही आज च्या रेसिपी ने तुम्ही घरच्या घरी खूपच सोप्प्या पद्धतीने करू शकता .. Monal Bhoyar -
-
बेसन रव्याचे लाडू (besan ravyache ladoo recipe in marathi)
#md# बेसनरव्याचेलाडूआईचे हाताचे तर सगळेच पदार्थ आवडते पण हे जे लाडू आहे ना ते मला हि नाही तर सगळ्यांनाच म्हणजे ज्यांनी हे खाल्ला आहे ते दहा वर्षे पूर्वीही का नाही खाल्ले असेल पण ते आता ही ते चव विसरले नाही, ते आज हे कधीही फोन केल्यावर आठवण काढतात हे तुमच्या हाताचे लाडु खूप अप्रतिम बनतात। माझी आई बेसन चे लाडू खूप अप्रतिम बनवते आणि आता मी पण त्यांच्याकडून शिकली आहे त्यांच्या हाताची चव तर वेगळीच असते। Mamta Bhandakkar -
"डिंकाचे पौष्टिक लाडू" (dinkache ladoo recipe in marathi)
#SWEET "थंडीसाठी पौष्टिक डिंकाचे लाडू" थंडीमध्ये खाण्यासाठी मस्त आणि पौष्टिक असतात डिंकाचे लाडू..बाळंतीण बाईला खाणे तर गरजेचे असते.त्यामुळे शरिराची झालेली झीज भरून येते.. लहान मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी खावे असे हे पौष्टिक लाडू आहेत.. पुर्वी खारीक फोडण्यापासुन ते खलबत्त्यात कुटण्या पर्यंत सगळे घरीच केले जायचे..पण आता खारीक, खोबरे कुटण्याच्या मशीन उपलब्ध आहेत.. नाहीतर आपला रोजचा वाटप करुन देणारा सोबती आहेच मिक्सर दादा..नाही का..तर मी हे लाडू पारंपारिक पद्धतीने च केले आहेत पण मिक्सर दादांची मदत घेऊनच.. चला तर रेसिपी कडे वळुया.. लता धानापुने -
अल्टिमेट बुंदी मोदक केक (boondi modak cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य 2 असं अचानकच सुचलं की केक मध्ये प्रसाद , नैवेद्याचा काही व्हेरिएशन होऊ शकते का?तीन चार दिवसापासून डोक्यामध्ये हेच आहे की काय व्हेरिएशन करू शकतो,आणि चक्क हा मोदकाचा केक बुंदीचा माझ्या स्वप्नात आला,सेम टू सेम केक बनवण्याचा प्रयत्न केला,,आणि स्वप्नात आलेली गोष्ट ही मी साकारली आहे,,विश्वास नाही तुमचा बसणार की असं पण काही होऊ शकत...स्वप्नात आलेली गोष्ट आपण कशी काय साकार करू शकतो,, पण हे माझ्या सोबत झालेला आहे..आणि बुंदी मी फर्स्ट टाइम केलेली आहे..ट्रॅडिशनल आणि पाश्चात्य याचा संयोग इथे घडवून आणलेला आहे,,आधी गावोगावी गोड पदार्थ म्हणून बुंदी आणि बुंदीचे लाडू फक्त असायचे,,बुंदे ही खरंच चवीला अतिशय सुंदर लागते,,मला कधी वाटलं नव्हतं की बुंदी घरची ताजी इतकी सुंदर चवीला लागेलं...पण कूक पॅड च्या निमित्ताने खुप वेगवेगळे व्हेरिएशन्स मी करायला लागली आहे,हा बुंदी चा केक माझ्या डोक्यातली कल्पना आहे,,, मी अजूनही असला केक युट्युब आणि कुठेही बघितलेला नाही आहे...खुप खुप धन्यवाद कूक पॅड टीम ♥️🌹 Sonal Isal Kolhe -
बुंदी लाडू (boondi ladoo recipe in marathi)
हे लाडू मी पहिल्यांदा केले एकदम मस्त झालेत. #GA4 #week14 Anjali Tendulkar -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET रवा बेसन लाडू अगदी सर्वाना आवडणारा गोड पदार्थ 😋😋माझ्या घरी तर नेहमीच डब्बामधे हा लाडु असतोच.😋😜 Archana Ingale -
-
-
गाजराचे लाडू (gajrache laddu recipe in marathi)
गाजराचा हलवा नेहमी खातो. पण लाडू पण छान लागतात. Chhaya Chatterjee
More Recipes
टिप्पण्या (4)