कढी गोळे (kadi gode recipe in marathi)

Archana Gajbhiye
Archana Gajbhiye @cook_26553233

#GR कढी गोळे ही चवदार विदर्भाची खास पाककृती आहे. कढी गोळे हे आंबट दही किंवा ताक आणि हरभरा पिठाचे किंवा चना डाळ , तुरदाळ पकोडा आणि काही मसाले घालून ही पाककृती बनवली जाते. कढी गोळे हे भाकरी चपाती किंवा भाताबरोबर खूप छान लागते. कढीगोळे ही रेसिपी महाराष्ट्रातील मराठवाडा तसेच विदर्भ भागातील पारंपारिक रेसिपी आहे. घरच्या साहित्यात, पुरेशा साहित्यात, सहज व सोपी पाककृती, लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी चविष्ट लागते आणि कमी वेळात तयार होते. कधी भाजीला काही नसेल तर सहज आणि सोप्या पद्धतीने कढी गोळे बनविता येईल. विदर्भामध्ये ही रेसिपी विशेष आहे आणि खेडेगावात विशेष करून ही रेसिपी बनविली जाते. कढी गोळे असेल तर आणखी कुठल्याही भाजीची आवश्यकता नसते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ ते २० मिनिटे
४ जणांसाठी
  1. 1 कपदही (कढी बनविण्यासाठी)
  2. 2 टीस्पूनबेसन
  3. 1 टेबलस्पूनतेल
  4. 4-5लसून पाकळ्या काप करून
  5. 1/2 टीस्पूनटिस्पून जीरे
  6. 8-9कढीपत्त्याची पाने
  7. 2हिरवी मिरची
  8. मीठ चवीनुसार
  9. 1 टीस्पूनटिस्पून मोहरी
  10. 1/2 टीस्पूनटिस्पून हळद आणि कोथिंबीर आवडीप्रमाणे
  11. गोळे बनविण्यासाठी घटक
  12. 1/4 कपचनादाळ
  13. 1/4 कपतूरदाळ
  14. 5-6लसून पाकळ्या
  15. 1/2 इंचआलं
  16. 1 टीस्पूनजीरे
  17. 10कढीपत्त्याची पाने
  18. 1/2 टीस्पूनमीठ
  19. 1 टीस्पूनतेल
  20. कोथिंबीर आवडीनुसार
  21. तडका देण्यासाठी घटक
  22. 1 टीस्पूनतेल
  23. 1/2 टीस्पूनमोहरी
  24. 1/2 टीस्पूनजीरे
  25. 2लाल सुक्या मिरच्या
  26. 1/4 टीस्पूनहळद
  27. चिमुटभरहिंग

कुकिंग सूचना

१५ ते २० मिनिटे
  1. 1

    चना डाळ व तूर डाळ स्वच्छ धुऊन पाच ते सहा तास पाण्यात भिजवावी. डाळी भिजल्यानंतर त्यातील पाणी पूर्णपणे काढून त्यात डाळी, आलं, दोन तीन हिरव्या मिरच्या कोथिंबीर, थोडे मीठ, कढीपत्त्याची पाने हे सर्व घालून मिक्सर मध्ये वाटून घ्यावे. (पाणी न घालता)

  2. 2

    कढी बनवण्यासाठी एका भांड्यात दही, बेसन चांगले घुसळावे. दही बेसन एकजीव झाल्यावर त्यात हळद मीठ घालून चांगले घुसळावे. फोडणीसाठी कढईत तेल तापवावे त्यात जीरे मोहरी कढीपत्ता चे तुकडे घालावे आणि परतावं.

  3. 3

    नंतर त्यात दह्याचे मिश्रण घालावे आणि मध्यम आचेवर चमच्याने सतत ढवळत राहावे आणि शिजवावे.

  4. 4

    दहा मिनिटानंतर छान उघडल्यावर त्यात तयार गाडी च्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून सोडावेत. मग दहा ते पंधरा मिनिटे झाकण ठेवून मंद येते मध्यम आचेवर कढी गोळे शिजवावे.

  5. 5

    गोळी छान शिजले की एका तडका कढईमध्ये तेल, जीरे, मोहरी, कडी पत्ता,हिंग, सुक्या लाल मिरच्या घालून फोडणी तयार करून कढी गोळ्यावर घालून, वरून कोथिंबीर घालावी, कढी गोळे भाकर चपाती सोबत छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Gajbhiye
Archana Gajbhiye @cook_26553233
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes