पौष्टिक मुंग डाळ आणि तूर डाळीची कोफ्ता करी (कढी गोळे) (kadhigole recipe in marathi)

कढी गोळे ही महाराष्ट्रातील चविष्ट, पौष्टिक ,पारंपरिक फेमस डिश आहे. पण आधुनिक भाषेत कढी गोळ्यांना कोफ्ता करी म्हणता येईल.
नेहमीच्या जेवणातील वरण भात भजीचा कंटाळा आला की, घरोघरच्या गृहिणींना हमखास आठवण येते ती कढी गोळ्याची. कढी गोळे ही चविष्ट डिश महाराष्ट्रात विदर्भ, खान्देश , मराठवाड़ा आणि इतर ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. विदर्भात हरभरा डाळ, तूर किंवा मुंग डाळ किंचित जाडसर वाटून घेऊन, त्यात हळद-मीठ-मिरची, जिरे, लसुन, कोथिंबीर टाकून त्याचे गोळे करुन ते वाफवून किंवा तळून घेतात आणि मग कढीला उकळी आल्यावर त्यात सोडतात. कढी आत मुरत असल्यामुळे या कढी-गोळे कढी-पकोडे ची चव एकदम खतरा असते.
मी आज विदर्भातील पौष्टिक मुंग डाळ आणि तूर डाळीची स्वादिष्ट ,चविष्ट कोफ्ता करी( कढी गोळे) बनविण्याची पद्धत सांगणार आहे.
पौष्टिक मुंग डाळ आणि तूर डाळीची कोफ्ता करी (कढी गोळे) (kadhigole recipe in marathi)
कढी गोळे ही महाराष्ट्रातील चविष्ट, पौष्टिक ,पारंपरिक फेमस डिश आहे. पण आधुनिक भाषेत कढी गोळ्यांना कोफ्ता करी म्हणता येईल.
नेहमीच्या जेवणातील वरण भात भजीचा कंटाळा आला की, घरोघरच्या गृहिणींना हमखास आठवण येते ती कढी गोळ्याची. कढी गोळे ही चविष्ट डिश महाराष्ट्रात विदर्भ, खान्देश , मराठवाड़ा आणि इतर ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. विदर्भात हरभरा डाळ, तूर किंवा मुंग डाळ किंचित जाडसर वाटून घेऊन, त्यात हळद-मीठ-मिरची, जिरे, लसुन, कोथिंबीर टाकून त्याचे गोळे करुन ते वाफवून किंवा तळून घेतात आणि मग कढीला उकळी आल्यावर त्यात सोडतात. कढी आत मुरत असल्यामुळे या कढी-गोळे कढी-पकोडे ची चव एकदम खतरा असते.
मी आज विदर्भातील पौष्टिक मुंग डाळ आणि तूर डाळीची स्वादिष्ट ,चविष्ट कोफ्ता करी( कढी गोळे) बनविण्याची पद्धत सांगणार आहे.
कुकिंग सूचना
- 1
पद्धत १ :-
१) मूंग डाळ आणि तूर डाळ एकत्र ५-६ तास भिजत घालावी. मूंग डाळ आणि तूर डाळ भिजली कि थोडावेळ ती निथळत ठेवावी. त्यातील पाणी निघून गेले कि त्यात आले लसूण पेस्ट, मिरचीपेस्ट, हिंग, हळद, जिरे, मीठ, कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. मिक्सरमध्ये मिश्रण वाटताना पाणी घालू नये नाहीतर गोळे एकसंध राहणार नाहीत. या मिश्रणाचे एक इंचाचे घट्टा गोळे करून घ्यावे. आवश्यक तेवढा जोर देऊन गोळे घट्ट करावेत जेणेकरून ते कढीत फुटणार नाहीत. - 2
२)दह्याचे पातळसर ताक करून घ्यावे. त्यात चणापिठ गुठळी न राहता मिक्स करावे. पातेल्यात तूप किंवा तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता, मेथी दाना घालून फोडणी करावी. मिरच्यांचे तुकडे घालावे. जर लसूण आवडत असेल तर ५ लसूण पाकळ्या ठेचून घालाव्यात. त्यात ताक घालावे. आणि मध्यम आचेवर उकळी येईस्तोवर ढवळत राहावे. चवीपुरते मिठ घाला.
- 3
३) कढीला उकळी आली कि आधी एक गोळा कढीत घालून बघावा जर तो फुटला नाही तर एक एक करून हळू हळू गोळे आत सोडावेत. शेवटचा गोळा घातल्यानंतर ५ मिनीटे कढीत शिजू द्यावेत. गरम गरम खायला घ्यावेत.
- 4
विदर्भात काही ठिकाणी कढीत भजी टाकण्याचीही पध्दत आहे, मात्र कढी उकळताना त्यात भजी टाकण्याऐवजी ती ताटात कढी वाढल्यावर गरमागरम भजी करुन कढीच्या वाटीत सोडली जातात. यामुळे कढीची चव मिळतेच, पण भज्यांचा कुरकुरीत पणाही कायम राहातो.हे गोळे किंवा पकोडे भातासोबत, पोळी किंवा भाकरीसोबत फारच छान लागतात.
- 5
पद्धत २:-
कृती : भिजलेली डाळ मिक्सरवर जाडसर वाटावी. त्यामध्ये वाटतानाच आले, लसूण, मिरची, मीठ, जिरे घालावे. आपल्या चवीनुसार वरून हळद घालावी. वाटलेल्या डाळीचे छोटे छोटे गोळे वळावेत. तयार गोळे चाळणीला तेल लावून अथवा कुकरच्या डब्याला तेल लावून त्यात ठेवून वाफवावे अथवा प्रेशरकुक करावेत. जेवणापूर्वी गोळे कढीत सोडावे व गरम करावे. वरून चिरून कोथिंबिरीने सजवावे. - 6
टीप:
कढी बनवताना थोडी जास्त बनवावी कारण गोळे घातल्यावर गोळे कढी शोषून घेतात. गोळे जर बनत नसतील तर त्यात बेसन घालावे.
Similar Recipes
-
राजस्थानी फेमस मारवाड़ी मुंग कढी आणि मुंग पकोडे (moong kadhi /moong pakoda recipe in marathi)
#पश्चिमराजस्थान#मुंगकढीमुंगपकोडेकढी चे नाव काढल्यावर आपल्या तोंडाला पाणी सुटते. हल्की आंबट आंबट कढी खाण्याची मजा काही वेगळीच आहे.आज पर्यंत आपण बेसन ताकात घालून बनविलेली कढी खाल्ली असेल. आज आपण राजस्थान मध्ये मुंग डाळीची कढी आणि मुंग डाळीचे पकोडे बनवितात. हे राजस्थानचे पारंपरिक व्यंजन आहे . तर चला मग आज बनवुयात राजस्थानी फेमस मारवाड़ी मुंग कढ़ी आणि मुंग पकोडे. Swati Pote -
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR कढी गोळे ही चवदार विदर्भाची खास पाककृती आहे. कढी गोळे हे आंबट दही किंवा ताक आणि हरभरा पिठाचे किंवा चना डाळ , तुरदाळ पकोडा आणि काही मसाले घालून ही पाककृती बनवली जाते. कढी गोळे हे भाकरी चपाती किंवा भाताबरोबर खूप छान लागते. कढीगोळे ही रेसिपी महाराष्ट्रातील मराठवाडा तसेच विदर्भ भागातील पारंपारिक रेसिपी आहे. घरच्या साहित्यात, पुरेशा साहित्यात, सहज व सोपी पाककृती, लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी चविष्ट लागते आणि कमी वेळात तयार होते. कधी भाजीला काही नसेल तर सहज आणि सोप्या पद्धतीने कढी गोळे बनविता येईल. विदर्भामध्ये ही रेसिपी विशेष आहे आणि खेडेगावात विशेष करून ही रेसिपी बनविली जाते. कढी गोळे असेल तर आणखी कुठल्याही भाजीची आवश्यकता नसते. Archana Gajbhiye -
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#KS4#कढी गोळेखानदेश मध्ये कढी गोळे म्हणजे स्पेशल डिश समजतात.खास लोकांची फर माईश असते आम्ही येतो कढी गोळे चां च बेत करा.अतिशय स्वादिष्ट अशी ही खानदेशी डिश आमच्या कडे पण सर्वांना आवडते. Rohini Deshkar -
कढी गोळे (kadi gole recipe in marathi)
#KS3 थीम ३ : विदर्भ, रेसिपी ४"कढी " ही रेसिपी तर सर्वच बनवितात. पण खास"कढी गोळे " ही रेसिपी विदर्भाची खासियत. तर मग ही खासियत आपण अनुभवलीच पाहिजे हा माझा अट्टाहास. म्हणून ही रेसिपी करण्याचा प्रयत्न.. आणि ती आवडलीही..🥰 म्हणून तुमच्याशी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
कढी गोळे (kadhi gode recipe in marathi)
#GR#गावरान#कढीगोळेगावरान म्हटलं की आपल्याला गावाकडचेपारंपारिक जेवण आठवतं. त्यातलाच हा एक प्रकार कढी गोळे.... गावागावात हा पदार्थ खूपच लोकप्रिय आहे. भाज्याचे दुर्भिक्ष्य असेल तेव्हा कढी गोळे बनवले जातात. करायला खूपच सोपी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे, कढी गोळ्या बरोबर मी चपाती, भात, मेथीची भाजी आणि तळलेल्या हिरव्या मिरच्यानी ताट सजवले आहे, तर मग अजून काय पाहिजे,चला कढी गोळे ची रेसिपी बघूया.😋 Vandana Shelar -
कढी गोळे रेसिपी (kadi goda recipe in marathi)
#लंच #कढी गोळे रेसिपी तुरीच्या हिरव्या दाण्याची चे गोळे करण्यात आले व कडी बनवून त्यात सोडण्यात आले रेसिपी छान टेस्टी आहे Prabha Shambharkar -
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR जेव्हा घरात ताजी भाजी उपलब्ध नसेल तेव्हा करता येण्या जोगा अगदी सोपा आणि चविष्ट पदार्थ म्हणजे कढी गोळे गरम गरम भाकरी बरोबर किंवा भाता बरोबर छानच लागतात Sushama Potdar -
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR#Kadhigoleप्रोटीन आणि व्हीटॅमीन सी चा स्त्रोत असलेले कढी गोळे , नाव जरी निघाले तरी जिभाई चटकावते अशी हि डिश कशी झालीय बघूया. Jyoti Chandratre -
-
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR#गावरान रेसिपी कॉन्टेस्ट#कढी गोळेगावरान म्हटलं की,गाव आठवत चुलीवरचा मस्त जेवणाचा बेत आठवतो.त्या वातावरणात अस्सल गावची मज्जाच वेगळी असते.विदर्भात काही पदार्थ ही खास असतात जसे की, कढी गोळे चुलीवर केलेले...अहहा....तोंडाला पाणी सुटले हो ना....काही हरकत नाही सध्या गावात जरी नसलो तरीही त्याच पद्धतीने मातीच्या भांड्यात केलेले अतिशय पौष्टिक असा पदार्थ उपावस असला की, आई नेहमी कढी गोळे करायची त्यावर वरून लाल मिरचीच्या फोडणी ची धार घातलेले तेल.... कांदा,लसूण विरहित पण तितकेच चविष्ट... कढी गोळेही रेसिपी माझ्या आईची आहे.नेहमी केली की, माझा तिला फोन जातो....अगदी तुझ्याच सारखे झालेत.....तुम्हीही नक्की करून पहा... मातीच्या भांड्यात त्याची चव काही वेगळीच..गावाच्या मायेची... Shweta Khode Thengadi -
फिश कोफ्ता करी (fish kofta curry recipe in marathi)
#कोफ्ताकोफ्ता या मुळच्या पर्शियन आणि आता भारतीय उपखंडात सर्वत्र प्रसिद्धी पावलेल्या रेसिपी बद्दल अनेकांनी या थिमच्या निमित्ताने लिहिले आहे. विशेषतः सुप्रिया वर्तक मोहिते यांनी या रेसिपीचा इतिहास थोडक्यात पण फार सुंदर पद्धतीने सांगितला आहे. त्यामुळे इतिहास फार न रेंगाळता लगेचच आपल्या मुळ मुद्दयाकडे येऊ.मी ही 'फिश कोफ्ता करी' बनविण्यासाठी खाजरी (Asian Sea Bass) या माशाचा उपयोग केला आहे (यात रावस किंवा सुरमई सुध्दा छान लागते). पावसाळा सुरू होऊनही खाडीच्या पाण्यातील ताजा मासा मिळाला. आणि या माशामुळे माझी रेसिपी परिपूर्ण झाली. माशाची कोणतीही डिश चविष्ट असतेच, त्यात त्याची कोफ्ता करी म्हणजे सोने पे सुहागा!!! Ashwini Vaibhav Raut -
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR विदर्भ मराठवाडा भागातील विशेष खमंग व चविष्ट असा प्रकार म्हणजे कढीगोळे हे भाकरी पोळी भाता सोबतही खाता येतो बऱ्याच वेळी गोळे हे फक्त चनाडाळी पासुन बनवले जातात पण ते पचनाला जड जातात म्हणुन चनाडाळ व तुरीच्या डाळीपासुन बनवलेले गोळे चविष्ट होतात चलातर ही कढी गोळ्याची रेसिपी मि कशी बनवली ते तुम्हाला सांगते Chhaya Paradhi -
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR घरात लहानपणी आजी कढी गोळे करायची मला आजही आठवते गरम वरण भात आणि कढी गोळे झक्कास चव यायची..तीच रेसिपी आणि काही टिप्स शेअर करत आहे. साधं वरण आणि कढी गोळे एकत्र करून पोळी भाताबरोबर खायची मज्जा काही औरच असते.... Rajashri Deodhar -
गाजर आणि मुंग डाळ कोशिंबीर (gajar moong dal koshimbir recipe in marathi)
#GA4 #week3 गोल्डन ऍप्रॉन ४ वीक ३ मध्ये मी गाजर हा की वर्ड घेऊन गाजर आणि मुंग डाळ कोशिंबीर केलीय. करायला सोप्पी आणि चविष्ट अशी कोशिम्बीर नक्की करून बघा. Monal Bhoyar -
कढी गोळे (kadhi gole recipe in marathi)
#GA4करीता मी कढी गोळे ही रेसिपी शेयर करते आहे. अतिशय स्वादिष्ट अशी ही डिश आहे. Pritibala Shyamkuwar Borkar -
डाळ कांदा
#करीरोजच्या जेवणात भाजीचा प्रश्न मिटवणारा डाळ कांदा चविष्ट आणि घरात उपलब्ध पदार्थांपासून बनणारा ! Spruha Bari -
तूर डाळ वडी (toor daal vadi recipe in marathi)
#GA4 #week13 #Tuvar म्हणजे तूर डाळ.गोल्डन एप्रन 4 - आठवडा 13 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड तुवर शोधून मी तूर डाळ वडी तयार करून बनवले.मी तुवर डाळ वडी ची कृती थोडी वेगळी केली आहे. कोथिंबीर वडी कृती प्रमाणेच तुवर डाळ मिक्सरमध्ये पीसल्यानंतर, आधी वाफवून आणि मग तळून घेतले.चवीला कोथिंबीर वडी सारखी चव लागते. Pranjal Kotkar -
डाळ खिचडी आणि कढी (dal khichdi and kadhi recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#डाळ खिचडी आणि कढी Rupali Atre - deshpande -
खमंग गोळा भात आणि कढी (khamang gola bhaat ani kadhi recipe in marathi)
#KS3#विदर्भ स्पेशल - नागपूर#खमंग गोळा भात आणि कढी Rupali Atre - deshpande -
खान्देशी फुनके कढी (phunke kadhi recipe in marathi)
#ks4 खान्देश फुनके कढी हा पदार्थ खान्देशातील जळगावचा फेमस आहे. ही रेसिपी थोडी वेगळी आणि टेस्टी आहे. मी माझ्या भाचीकडे जळगावला तिच्या घराच्या वास्तूशांती साठी गेले होते तेव्हा तिथे फुनके कढी खाल्ली हॊती. तर पाहू कशी बनवतात. Shama Mangale -
मेथी कोफ्ता कढी
#पालेभाजीया रेसिपी मध्ये मेथी या पालेभाजीचा वापर केला आहे. मस्त क्रिस्पी पौष्टिक कोफ्ते मस्त आंबट गोड कढी सोबत भन्नाट लागतात. तर ही इंनोवाटीव्ह रेसिपी नक्की करून पहा. Varsha Pandit -
कढी गोळे (kadhi gole recipe in marathi)
Prachi Manerikae कढी गोळे रेसिपी बघितली या आधी पणी कडी गोळे केले होते ते पण माझी ती रेसिपी फसली मजा म्हणजे कढि उकळायला लागली कि गोळी टाकायचे तर उळण्या आधीच त्याच्यात गोळे टाकले तर ते सगळे माझे विरघळले पण आता तुम्ही सांगितलं त्यामुळे कढीगोळे खूप छान झाले सर्वाना खूप आवडले फक्त मी त्याच्यात एक बदल केला की मी बेसन भिजवून गोळे प्रथम एक मिनिट मायक्रोवेव केले केले. Deepali dake Kulkarni -
लौकी कोफ्ता करी (lauki kofta curry recipe in marathi)
#GA4 #week10#kofta कोफ्ता हा की वर्ड घेउन मी ही लौकी कोफ्ता करी ची रेसिपी केली आहे.हि कोफ्ता करी फूलके किंवा पराठ्यासोबत छान लागते. Supriya Thengadi -
-
-
पौष्टिक - पंचडाळ / मिश्र डाळ कोथिंबीर डोसा (Mix Dal Kothimbir Dosa Recipe In Marathi)
#JLRलंच रेसीपी#मिश्र डाळ#तूर डाळ#मूग डाळ#उडीद डाळ#मसूर डाळ#चणा डाळ Sampada Shrungarpure -
दुधी कोफ्ता करी(Dudhi Kofta Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory#इंडियनकरी#indiancurry#chefsmithsagarप्रत्येक भारतीयाच्या घरातून तयार होणारी प्रमुख अशी करी म्हणजे दुधी कोफ्ता करी हे तुम्हाला बाहेर क्वचितच मिळेल.दुधी कोफ्ता करी जवळपास घरातच तयार होणारी डिश आहे खूप कमी रेस्टॉरंट मेनू मध्ये आपल्यालाही डिश बघायला मिळेल त्यामुळे घरात खूप चांगल्या पद्धतीने हे डिश तयार करता येते त्यानिमित्ताने दुधी पण आहारातून घेता येते माझ्याकडे दुधी खाण्यासाठी कोफ्ता केला तरच दूधी आहारातून घेतली जाते. दुधीचा रायता कोफ्ता करी, थेपले अशाप्रकारे आहारातून दुधी घेतली जाते.इथे मी दुधीचे कप्ता करताना उकडलेला बटाटा वापरल्यामुळे कोफ्ते खूप छान तयार होतात. Chetana Bhojak -
पालक डाळभाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#डाळभाजी# पालक आणि तूर डाळ व मुगाची डाळ टाकून केलेली...पौष्टिक आणि चविष्ट.....गरमागरम भाकरी किंवा भातासोबत खाण्यात मजा.... Varsha Ingole Bele -
कढीगोळे(kadhigole recipe in marathi)
#फोटोग्राफी#कोफ्ता.कोफ्ता हा विषय जेव्हा समोर आला तेव्हा चटकन लक्षात आली ती कढीगोळेची रेसिपी.माझी हि रेसिपी शेफ विष्णू मनोहर यांच्या रसोई या मासिकात प्रकाशित झाली आहे.हि विदर्भातील स्पेशल रेसिपी आहे.या रेसिपीत तुम्ही विविधता आनू शकता जसे कि ओल्या तुरीचे दाणे मिक्सरमध्ये वाटून त्याचा वापर करून ही गोळे बनवले जातात. Supriya Devkar -
पिवळी मुंग डाळ खिचडी (pivdi moong dal Khichdi recipe in marathi)
#kr# पिवळी( फिकि) मुंग डाळ खिचडीमाझ्या लहान मुलांसाठी खिचडी बनवली आहे... त्याची सर्वात जास्त फेवरेट आणि त्याला आवडणारी खिचडी..... झटपट, कमी वेळात आणि कमी इन्ग्रेडियंट मध्ये होणारी... Gitalharia
More Recipes
टिप्पण्या