टिक्का पनीर मॅगी विद शेजवान सॉस (tikka paneer maggi with schezwan sauce recipe in marathi)

Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793

#MaggiMagicInMinutes
#Collab "बस दोन मिनिट " म्हणून मॅगी नूडल्स लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना खूप पसंत आहे . अत्यंत सोपी आणि झटपट बनणारी मॅगी आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. टिक्का पनीर मॅगी माझ्या मुलीला खूप आवडते, पनीर आणि भाज्यांमध्ये खूप प्रमाणात प्रोटीन ,विटामिन्स ,आणि मिनरल्स असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिटे
दोन व्यक्तींसाठी
  1. 2पॅकेट मॅगी नूडल्स
  2. 1/2 कपचिरलेला कोबी
  3. 1/2 कपचिरलेला टोमॅटो
  4. 1/2 कपचिरलेली सिमला मिरची
  5. 1बारीक चिरलेला कांदा
  6. 1/2 कपचिरलेली कोथिंबीर
  7. 100 ग्रॅमपनीर
  8. 4 टेबलस्पूनतेल
  9. आवश्यकतेनुसार मीठ
  10. 1/2 टीस्पून हळदी पावडर
  11. 1/2 टीस्पूनलाल मिरची पावडर
  12. 1 टीस्पूनचिरलेले आले लसूण
  13. 1 टेबलस्पूनटोमॅटो सॉस
  14. 1 टेबलस्पूनशेजवान सॉस
  15. 1 टेबलस्पूनटिक्का मसाला

कुकिंग सूचना

तीस मिनिटे
  1. 1

    सर्वात प्रथम आपण एका कढईमध्ये पाणी घेऊन. त्यात मॅगी टाकून शिजवून घेऊन.

  2. 2

    आपण पनीरचे बारीक चौकोनी तुकडे कापून घेऊ.नंतर त्यावर थोडेसे आले लसूण पेस्ट,लाल मिरची पावडर, मीठ आणि टिक्का मसाला घालून मॅरिनेट करून घेऊ.

  3. 3

    आता कढईमध्ये थोडे तेल घालून आपण पनीरचे पीसेस तळून घेऊ. आणि बाजूला काढून ठेवू.

  4. 4

    आता त्याच कढईमध्ये चिरलेले आले -लसूण,आणि कांदा घालून परतून घेऊ. नंतर त्यात चिरलेली कोबी,सिमला मिरची,टोमॅटो टाकून 1 मिनिटापर्यंत सॅाटे करून घेऊ.भाज्या जास्त शिजू देऊ नका त्या क्रंची लागल्या पाहिजेत.

  5. 5

    आता त्यात थोडीशी लाल मिरची पावडर, हळद पावडर,टोमॅटो सॉस,आणि शेजवान सॉस टाकून मिक्स करून घेऊ. आता त्यात शिजवलेली मॅगी घालून छान मिक्स करून घेऊ. नंतर वरून पनीर टिक्का घालून पुन्हा छान मिक्स करून घेऊ.

  6. 6

    तयार आहे आपल्या टेस्टी टिक्का पनीर मॅगी मसाला. वरुन कोथिंबीरणे गार्निश करा. पनीर आणि सर्व भाज्या आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत यामध्ये आपण शिजलेला भात टाकून मॅगी पुलाव सुद्धा बनवू शकतो.अत्यंत सोपी आणि झटपट बनणारी ही रेसिपी मुलांना नक्की आवडणार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes