उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)

Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320

#उकडीचे मोदक ,अंगारीका संकष्टी म्हणुन आज मी बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवले .

उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)

#उकडीचे मोदक ,अंगारीका संकष्टी म्हणुन आज मी बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवले .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 टीस्पूनवेलची पावडर
  2. 1/4 किलोगुळ(खोबर्याच्या निम्मा)
  3. 2-3 टेबलस्पूनतूप
  4. 2 टेबलस्पूनखसखस
  5. 2-3 टेबलस्पूनबदामाची जाडसर पूड
  6. 1/2 टीस्पूनटीस्पून मीठ
  7. मोदक वाफवण्यासाठी पाणी
  8. 2 कपपाणी
  9. 2 कपतांदळाचे पिठ
  10. 1नारळाचे खवलेले खोबरे

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एक कढई गॅसवर ठेवावी, त्यात चमचाभर तूप घालून किसलेला गूळ घालावा व थोडा पातळ झाला की त्यात किसलेले खोबरे घालावे तसेच त्याच्यात भाजलेली खसखस व बदामाची पावडर घालावी व मिश्रण एकजीव करून त्यात मीठ थोडा गूळ आटवावा हो मिश्रणात वेलची पावडर घालावी व गॅस बंद करावा.

  2. 2

    एक पातेले गॅसवर ठेवून त्यात 2 कप पाणी ठेवावे त्यातच एक चमचा तूप व चिमुटभर मीठ घालावे व पाण्याला उकळी आली की त्या दोन कप तांदळाचे पीठ घालावे व चांगले ढवळून झाकण ठेवून दोन मिनिटं मंद आचेवर ठेवावे नंतर गॅस बंद करावा

  3. 3

    आता उकडलेले पीठ एका भांड्यात घेऊन थंड पाण्याचा हात घेऊन मळून घ्यावे. आता या पीठाचे गोळे करून त्याच्या वाट्या करून त्याचा सारण भरून मोदकाचा आकार द्यावा.

  4. 4

    आता गॅस वर एक भांडे ठेवून त्यात पाणी ओतून उकळू द्यावे व त्यावर मोदकाची चाळणी ठेवून व त्यावर झाकण ठेवून मोदक दहा मिनिटे वाफवून घ्यावे व गॅस बंद करुन दहा मिनिटे तसेच ठेवावे.

  5. 5

    दहा मिनिटाने मोदक काढून घ्यावे. तयार झाले आपले उकडीचे मोदक

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes