उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)

माधवी नाफडे देशपांडे
माधवी नाफडे देशपांडे @cook_25748619
बोरिवली पश्चिम

#मोदक
आज corona मुळे आम्हाला आमच्या घराच्या गणपतीला पुण्याला जायला नाही मिळाले. म्हणून या वेळेस घरच्या बाप्पासाठी मोदक करून छान नैवेद्य केला.. म्हणजे बापानेच करून घेतला माझ्या कडून.. 🙏

उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)

#मोदक
आज corona मुळे आम्हाला आमच्या घराच्या गणपतीला पुण्याला जायला नाही मिळाले. म्हणून या वेळेस घरच्या बाप्पासाठी मोदक करून छान नैवेद्य केला.. म्हणजे बापानेच करून घेतला माझ्या कडून.. 🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 2मोठी भांडी मोदक पिठी
  2. 2मोठी भांडी पाणी
  3. चिमुटभरमीठ
  4. 1 चमचासाजूक तूप
  5. 2खवलेले नारळ
  6. 3/4 पटनारळाच्या गूळ
  7. 1 चमचावेलची पूड
  8. 1 चमचाचारोळी

कुकिंग सूचना

2 तास
  1. 1

    आधी खवलेले खोबरे, गूळ एकत्र करून तूप घातलेल्या जाड बुडाच्या पातेल्यात घेऊन त्याचे छान म्हणजे ना एकदम कोरडे ना ओले असे सारण करून घ्यावे. मी डायरेक्ट सारणाचा फोटो काढला कारण सकाळी गडबडीत फोटो काढायचे राहून गेले 🙃🙃

  2. 2

    मोदकाच्या पारी साठी उकड तयार करायला घेऊया आता.. प्रथम 2 भांडी पाणी जाड बुडाच्या पातेल्यात गरम करायला ठेवायचे. त्यात एक चमचा तूप टाकायचे.. पाणी छान उकळले की गॅस बारीक करून त्यात 2 भांडी मोदक पिठी घालून सगळे पाणी पिठीत मुरले की गॅस बंद करून 5 मिनिटे पातेले झाकून ठेवायचे.

  3. 3

    मग ही उकड परती मध्ये काढून घेऊन पाण्याचा हात लावून चांगली मळून घ्यायची.. गरम असतानाच.. हाताला चटके बसतात.. पण त्याशिवाय मोदक कसे मिळणार खायला.. म्हंटले आहेच ना.. आधी हाताला चटके.. तेव्हा मिळती मोदक.. 😀😀

  4. 4

    छान मळून झाली की त्याचे मध्यम गोळे करून घ्यायचे आणि झाकून ठेवायचे.. आता एक गोळा घ्यायचा आणि त्याची वाटी तयार करायची. त्याला बोटांनी चिमटे देऊन कळ्या करायच्या.. त्यात सारण भरून हलक्या हाताने वरतून एकत्र करून मोदकाचा आकार तयार करायचा..

  5. 5

    माझा पहिलाच मोदक एकदम सुबक नाही झाला. पण नंतर चे चांगले झाले. वर सांगितल्या प्रमाणे सगळे मोदक तयार करून ओल्या फडक्यात झाकून ठेवले.

  6. 6

    मग गॅस वर कूकर ठेऊन त्यात कूकर चे भांडे ठेवले त्यात स्टील ची चाळणी ठेवली. त्याला थोडे तेल लावून घेतले. मग त्यात हे मोदक अगदी हलक्या हाताने जेवढे राहतील तेवढेच ठेवले. कुकरची शिटी काढून ठेवली. आणि मध्यम गॅस वर 15 ते 20 मिनिटे चांगले वाफवून घेतले. आणि मग पंख्याखाली गार करायला ठेवले. राहीलेले मोदक पण असेच वाफवून घ्यायचे.

  7. 7

    बाकी सगळा स्वैपाक आणि मोदक झाले की बाप्पाला छान नैवेद्य दाखवायचा आणि सगळ्यांनी मिळून एकत्र जेवायला बसून सगळ्याचा फडशा पाडायचा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
माधवी नाफडे देशपांडे
रोजी
बोरिवली पश्चिम

टिप्पण्या

Similar Recipes