मटकी रस्सा (matki rassa recipe in marathi)

Archana Gajbhiye
Archana Gajbhiye @cook_26553233

#cf मी मोड आलेल्या मटकीचा रस्सा भाजी बनवलेली आहे. मोड आलेली मटकी ही प्रोटीन चा मोठा स्त्रोत आहे. यासोबतच मोड आलेली मटकी खाण्यामुळे सौंदर्य वाढते, मलावरोध दूर होतो शुगर नियंत्रणात राहतो, रक्तदाब कमी होतो. मोड आलेल्या मटकीचा फायदा म्हणजे ॲनिमिया पासून संरक्षण मिळते. मोड आलेल्या मटकी मुळे रोगप्रतिकारशक्ती व प्रचंड वाढते. रोजच्या आहारात एक मूठभर कच्ची मटकी नियमित खा शरीर तंदुरुस्त होईल, अनेक रोगांपासून सुटका आणि योग्य वाढ बुद्धीचाही होईल विकास. मटकी पासून सलाद बनविता येते, त्याची उसळ पण बनवता येते किंवा रस्सा भाजी पण बनवता येते. लॉकडाउनच्या काळात जेव्हा सर्व बंद होते तेव्हा भाज्यांचा मोठा प्रश्न समोर असायचा तेव्हा घरीच जे उपलब्ध असेल तेच उपयोगात आणण्यात येत असत, अशा वेळेस मटकीचा रस्सा भाजी म्हणून फार उपयोग व्हायचा मटकीचा रस्सा बनविला की इतर कुठल्याही भाजीची आवश्यकता नव्हती. इतकीही उपयुक्त आणि पौष्टिक अशी मटकी खाण्याचे अनेक फायदे होतात. म्हणून मी खास रस्सा भाजी म्हणून मटकीचा रस्सा बनविलेला आहे खूप छान होते ही भाजी तुम्ही पण नक्की करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
६ जणांसाठी
  1. 3 कपमोड आलेली मटकी
  2. 2 टीस्पूनआलं, लसूण, कोथिंबीर, जीरे पेस्ट
  3. 1कांदा चिरलेला
  4. 1 टीस्पूनधने पूड
  5. 1 टीस्पूनगरम मसाला
  6. 1 टीस्पूनतिखट
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. मीठ चवीनुसार
  9. 1/4 टीस्पूनमोहरी
  10. 1/4 टीस्पूनजीरे
  11. 1 चिमूटभरहिंग
  12. 8-10 कढिपत्ता पानं
  13. कोथिंबीर आवडीनुसार
  14. तेल गरजेनुसार

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम एका कढईमध्ये एक टीस्पून तेल टाकून त्यात हळद आणि मटकी टाकून मिक्स करावे नंतर त्यात थोडे पाणी टाकून मीठ टाकावे आणि एक वाफ काढून घ्यावी.

  2. 2

    नंतर एका दुसऱ्या कढई मध्ये तीन टेबलस्पून तेल टाकून तापवून घ्यावे आणि त्यात हिंग, मोहरी, जीरे टाकून कढीपत्ता टाकावा आता मोहरी, जीरे चांगले तडतडले की त्यात कांदा टाकावा आणि कांदा छान गुलाबी सर झाला की त्यात तयार केलेले वाटण घालावे आणि मिक्स करावे आणि चांगले परतून घ्यावे.

  3. 3

    नंतर त्यामध्ये हळद, तिखट, धने पूड, गरम मसाला हे सर्व टाकून मिक्स करावे आणि थोडे पाणी टाकून मसाला छान शिजवून घ्यावा आता त्यात वाफवून घेतलेली मटकी टाकावी.

  4. 4

    नंतर त्यामध्ये आपल्याला हवे तसे पाणी टाकून त्यात मीठ घालून कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे. आता थोड्यावेळाने मटकी चांगली शिजली की हाताने दाबून बघावे तयार आहे मटकी रस्सा भाजी.

  5. 5

    आता एका प्लेटमध्ये मटकी रस्सा काढून घ्यावा वरून कोथिंबीर घालावी आणि लिंबू ठेवून चपाती किंवा भाकरी सोबत खाण्यास द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Gajbhiye
Archana Gajbhiye @cook_26553233
रोजी

टिप्पण्या

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
अर्चनाजी तुमची मटकी रस्सा रेसिपी मी बनवली ( कुकस्नॅप) खुप छान टेस्टी झाली😋👌
धन्यवाद अर्चनाजी🙏

Similar Recipes