झणझणीत मिसळ

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#कडधान्य
मटकीची उसळ करून झाली तेव्हा १ वाटी मोड आलेली मटकी बाजूला ठेवली होती त्याचीच आज मी मटकीची झणझणीत मिसळ केली म्हणून मग मिसळ पाव करून घरच्यांना खाऊ घातले. जे आजच्या लॉकडाउन च्या काळात एकवेळचे जेवण म्हणून उपयोगी पडले.

झणझणीत मिसळ

#कडधान्य
मटकीची उसळ करून झाली तेव्हा १ वाटी मोड आलेली मटकी बाजूला ठेवली होती त्याचीच आज मी मटकीची झणझणीत मिसळ केली म्हणून मग मिसळ पाव करून घरच्यांना खाऊ घातले. जे आजच्या लॉकडाउन च्या काळात एकवेळचे जेवण म्हणून उपयोगी पडले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५ जण
  1. १ वाटी मोड आलेली मटकी
  2. उकडलेला बटाटा
  3. २ टि स्पून मालवणी मसाला
  4. १ टि स्पून धनेजिरे पावडर
  5. १/४ टि स्पून हळद
  6. १ टि स्पून आलं लसूण पेस्ट
  7. चवीनुसार मीठ
  8. तेल
  9. १ टि स्पून मोहरी
  10. हिंग
  11. १/२ कांदा उभा चिरलेला
  12. टोमॅटो चिरलेला
  13. वाटणासाठी: कांदे उभे चिरलेले
  14. १ वाटी ओले खोबरे
  15. १ वाटी सुके खोबरे
  16. १ टि स्पून धने
  17. १/२ टि स्पून खसखस
  18. १/२ टि स्पून मिरी
  19. २-३ लवंगा
  20. १ तुकडादालचिनीचा
  21. ४-५ लसूण पाकळ्या
  22. १" आलं

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम वाटण करण्यासाठी तव्यावर कांदा उभा चिरलेला थोडं तेल घालून भाजून घ्या नंतर त्यात सर्व खडा गरम मसाले, सुके खोबरे घालून भाजा आता ओले खोबरे त्यात टाकून सर्व खरपूस भाजा व मिक्सरवर वाटून घ्या.

  2. 2

    कढईत तेलावर मोहरी, हिंग घालून कांदा, टोमॅटो, मालवणी मसाला, धनेजिरेपूड, हळद, आलं लसूण पेस्ट, मीठ घालुन तेल सुटेपर्यंत परता.

  3. 3

    मटकी कुकरमध्ये पाणी घालून २ शिट्ट्या करून शिजवा व त्यात घाला, उकडलेला बटाटा छोटे पातळ तुकडे करून घाला, वाटण घाला आणि मस्त उकळी येवू द्या.

  4. 4

    ही झाली मस्त तर्रीदार झणझणीत मटकीची मिसळ. ही मिसळ फरसाण व बटर लावलेल्या पावाबरोबर खायची, सोबत कांदा, लिंबु पण हवेच.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes