मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#cpm3 पौष्टिक अशी मटकी, कोणत्याही रुपात खाण्यासाठी चांगली.. त्यातही मोड आलेली असेल तर उत्तमच... अशा या मोड आलेल्या मटकीची भाजी ...

मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)

#cpm3 पौष्टिक अशी मटकी, कोणत्याही रुपात खाण्यासाठी चांगली.. त्यातही मोड आलेली असेल तर उत्तमच... अशा या मोड आलेल्या मटकीची भाजी ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमटकी
  2. 2 टेबलस्पूनतेल
  3. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  4. 1कांदा चिरून
  5. 1टोमॅटो चिरून
  6. 1 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  7. कढीपत्ता
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 1 टेबलस्पूनतिखट
  10. 1 टीस्पूनधणे पूड
  11. 1/2 टीस्पूनजीरे पूड
  12. 1 टीस्पूनमसाला
  13. चवीनुसारमीठ
  14. 1/2 टीस्पूनसाखर
  15. कोथिंबीर
  16. पाणी

कुकिंग सूचना

15-20 मिनिट
  1. 1

    मटकी धुवून, 7*8 तास पाण्यात भिजत घालावी. त्यानंतर, त्याला स्वच्छ कपड्यात बांधून मोड आणावी. आता मोड आलेली मटकी धुवून घ्यावी. कांदा, टोमॅटो चिरून घ्यावे.

  2. 2

    एका कढईत तेल टाकून गरम झाल्यावर त्यात जीरे मोहरी टाकावी. तडतडल्यावर कांदा, कढीपत्ता आणि आले लसूण पेस्ट टाकावी. कांदा सोनेरी झाल्यावर त्यात टोमॅटो टाकावे.

  3. 3

    टोमॅटो थोडे सॉफ्ट झाल्यावर त्यात हळद तिखट धणे पूड, जीरे पूड घालून मिक्स करून घ्यावे. आता त्यात मटकी टाकून मिक्स करावे. मसाला आणि चवीनुसार मीठ घालावे.

  4. 4

    गरजेप्रमाणे पाणी टाकून चांगले मिक्स करून घ्यावे. झाकण ठेवून शिजू द्यावे. मटकी शिजल्यावर, कोथिंबीर टाकावी.

  5. 5

    मटकीची भाजी जेवणासाठी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes