पुरणपोळी (puran poli recipe in marathi)

Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320

#hr होळीनिमित्त आज मी पुरणपोळी बनवली आहे

पुरणपोळी (puran poli recipe in marathi)

#hr होळीनिमित्त आज मी पुरणपोळी बनवली आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 किलोचणा डाळ
  2. 1/2 किलोगव्हाचे पीठ
  3. 1.5 कपकिसलेला गुळ
  4. 1 टीस्पूनवेलची पावडर
  5. तूप

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम डाळ स्वच्छ धुऊन ती कुकर मध्ये घालून त्यात पाणी चिमुटभर मीठ घालून गॅस वरती कुकर ठेवावा हो मिडीयमहिटवर ठेवून तीन शिट्ट्या काढाव्यात व डाळ शिजल्यानंतर त्यातील पाणी गाळून डाळ निचरत ठेवावी. आता ही डाळ गरम असताना स्मॅशरने चांगली स्मॅश करून घ्यावी.

  2. 2

    आता कढई गॅसवर ठेवून त्यात चमचाभर तूप घालावे व त्यात स्मॅश केलेली डाळ घालून त्यात किसलेला गूळ घालावा व ते दोन्ही मिश्रण एकजीव करावे

  3. 3

    आता मिश्रण पातळ होईल म्हणून हे मिश्रण सतत हलवत रहावे जोपर्यंत ते घट्ट होत नाही तोपर्यंत आता गॅस बंद करून ते मिश्रण थंड होऊ द्यावे

  4. 4

    गव्हाच्या पिठामध्ये पाणी घालून आणि चवीपुरते मीठ घालून पीठ आधीच मिळून ठेवावे आता या मळलेल्या पिठाची एक गोळी करून व त्याची पारी तयार करून त्यात वरील डाळीच सारण घालून ती गोळी बंद करून त्याची पोळी बनवून घ्यावी

  5. 5

    आता गॅसवर एक पण ठेवून तो थोडा गरम करून घ्यावा व नंतर त्यावर ही लाटलेली पोळी घालावी व दोन्ही बाजूने छान शेकून घ्यावे सर्वात शेवटी त्यावर तूप लावावे

  6. 6

    तयार झाली आपली पुरणपोळी व त्याबरोबर कटाची आमटी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes