पुरण पोळी (तेल पोळी) (puran poli recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#hr होळी म्हणजे पुरणपोळी घरोघरी होळी सणाला पुरणपोळी हि केली जातेच हि आपली पारंपारीक रेसिपी आहे त्या सोबत तुप दुध व झणझणीत कटाची आमटी हा बेत म्हणजे स्वर्ग सुखच हो ना चला तर आज मी होळीच्या नैवेदया ला तेलपोळ्या केल्या कशा विचारता चला तर पाहुया

पुरण पोळी (तेल पोळी) (puran poli recipe in marathi)

#hr होळी म्हणजे पुरणपोळी घरोघरी होळी सणाला पुरणपोळी हि केली जातेच हि आपली पारंपारीक रेसिपी आहे त्या सोबत तुप दुध व झणझणीत कटाची आमटी हा बेत म्हणजे स्वर्ग सुखच हो ना चला तर आज मी होळीच्या नैवेदया ला तेलपोळ्या केल्या कशा विचारता चला तर पाहुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
२-४ जणांसाठी
  1. ७० ग्रॅम साखर
  2. ७० ग्रॅम किसलेला गुळ
  3. 1-2 टीस्पूनवेलची, जायफळ, सुंठेची पावडर
  4. ५० ग्रॅम कटाची आमटी
  5. 1/2 टीस्पून हळद
  6. २०० ग्रॅम मैदा
  7. 5 टेबलस्पुनतेल
  8. 2-3 टेबलस्पुनसाजुक तुप
  9. २० ग्रॅम गरम दुध
  10. १०० ग्रॅम चनाडाळ
  11. चविनुसारमीठ

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    चणा डाळ स्वच्छ धुवुन ३-४ तास भिजत घाला

  2. 2

    भिजलेली डाळ लहान कुकर मध्ये घेऊन त्यात हळद, तेल, डाळीच्या ३ पट पाणी मिक्स करा व कुकरच्या ४-५ शिट्टया काढा

  3. 3

    बाऊलमध्ये मैदा, मीठ, तेल, हळद मिक्स करून पाण्याने पिठ सैलसर भिजवा

  4. 4

    भिजवलेल्या पिठात परत २-३ टेबलस्पुन तेल मिक्स करून मळुन घ्या व २ तास पिठाचा गोळा झाकुन ठेवा

  5. 5

    शिजलेल्या डाळीतील पाणी गाळून बाजुला ठेवा(त्याची कटाची आमटी बनवा) पॅनमध्ये शिजलेली डाळ, साखर, किसलेला गुळ मिक्स करून परतत शिजवा

  6. 6

    मिक्सर च्या जारमध्ये वेलची, जायफळ, सुंठ थोड़ी साखर टाकुन पावडर करून घ्या

  7. 7

    पॅनमधील मिश्रण शिजतानाच मॅशरने बारीक करून घ्या त्यात वर तयार केलेली पावडर थोड मीठ मिक्स करून घट्ट सारण शिजवा

  8. 8

    घट्ट शिजवलेले सारण चाळणीने बारीक करून घ्या व पोळी करण्याची तयारी करा

  9. 9

    पिठाचा लहानसा गोळा घेऊन हाताला तेल लावुन हातावर गोळा चपटा करून त्यात पुरणाचा गोळा भरून बंद करा हातानेच थोड़ा चपटा करत आतील पुरण सर्व बाजुला पसरवा व पोलपाटावर तुप लावलेल्या बटर पेपरवर लाटण्याला तेल लावुन पोळी लाटा

  10. 10

    तवा गरम करा थोड तेल पसरवुन बटर पेपर सकट पोळी तव्यावर टाकुन बटरपेपर सोडवुन घ्या

  11. 11

    तेलपोळी दोन्ही बाजुने खरपुस भाजुन घ्या

  12. 12

    अशा प्रकारे सर्व तेलपोळ्या भाजुन वरून साजुक तुप लावा

  13. 13

    तयार तेलपोळ्या प्लेटमध्ये सर्व्ह करा सोबत गरम दुध, साजुकतुप, कटाची आमटी, भजी, कुरडई होळीच्या रंगानी डेकोरेट करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes