डाळव्याची पुरणपोळी (Dalvyachi Puran Poli Recipe In Marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#CHOOSETOCOOK
#माझी आवडती रेसिपी

पुरणपोळी मला खुप आवडते..आज दसरा आहे आणि आमच्याकडे पुरणपोळी चा नैवेद्य असतो..
आज मी वेगळ्या पद्धतीने पुरणपोळी बनवली आहे.. डाळ न शिजवता डाळव्याची पुरणपोळी बनवली आहे.. मस्त मऊ लुसलुशीत होते..

डाळव्याची पुरणपोळी (Dalvyachi Puran Poli Recipe In Marathi)

#CHOOSETOCOOK
#माझी आवडती रेसिपी

पुरणपोळी मला खुप आवडते..आज दसरा आहे आणि आमच्याकडे पुरणपोळी चा नैवेद्य असतो..
आज मी वेगळ्या पद्धतीने पुरणपोळी बनवली आहे.. डाळ न शिजवता डाळव्याची पुरणपोळी बनवली आहे.. मस्त मऊ लुसलुशीत होते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

एक तास
चार
  1. 1 कपडाळव
  2. 1 कपगुळ बारीक कापून
  3. दिड कप गव्हाचे पीठ
  4. 1/2 कपमैदा
  5. 2 टेबलस्पूनतूप
  6. 1/2 टीस्पूनवेलचीपूड
  7. 1/2 टीस्पूनमीठ
  8. आवडीनुसार तेल किंवा तूप वरून लावण्यासाठी

कुकिंग सूचना

एक तास
  1. 1

    गॅसवर कढईत डाळव घालून दोन तीन मिनिटे गरम करून घ्या. म्हणजे छान बारीक वाटले जाते. मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

  2. 2

    परात मध्ये गव्हाचे पीठ,मैदा पाव टीस्पून मीठ घालून मिक्स करा व लागेल तसे पाणी घालून सैलसर भिजवून घ्या.व तेल लावून मऊ करून झाकून ठेवा..

  3. 3

    वाटलेल डाळव चाळणीने चाळून घ्या म्हणजे जाडसर राहीले ते बाजूला काढता येते. गुळ बारीक चिरून घ्या..

  4. 4

    कढईत एक टेबलस्पून तूप घालून त्यात चाळलेले डाळव्याचे पीठ घालून पाच सहा मिनिटे भाजून घ्या.. दुसरीकडे पाणी उकळत ठेवा.

  5. 5

    अर्धा कप पाणी घालून पीठ हलवून मिक्स करा व गुळ घालून मिक्स करा.. आता अर्धा कप पाणी घालून पूरण मस्त घट्ट होईपर्यंत हलवत रहा.

  6. 6

    एक टेबलस्पून तूप घालून हलवून घ्या. वेलचीपूड घालून मिक्स करा..

  7. 7

    पुरण प्लेटमध्ये काढून घ्या.. कोमट असताना एका वाटीने सारख करून घ्या किंवा पुरण वाटण्याची चाळणीने गाळून घ्या.. व त्याचे हव्या त्या आकारात गोळे बनवून घ्या.

  8. 8

    गॅसवर तवा तापत ठेवा व पुरणपोळी बनवण्यासाठी पीठाचा गोळा घेऊन त्याची पुरी लाटून घ्या व पुरण घालून छान गोळा बनवून हलक्या हाताने थोडा सपाट करून पुरणपोळी लाटून घ्या..

  9. 9

    तव्यावर पोळी दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या..

  10. 10
  11. 11

    प्लेटमध्ये पुरणपोळी तूप,गुळवणी, दूध सोबत सर्व्ह करा.. सोबत भात आणि कटाची आमटी चा फुरका मारा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या (2)

Similar Recipes