फोडणीचा भात (phodhni bhaat recipe in marathi)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
Boisar, Palghar

#KS3
#विदर्भ स्पेशल फोडणीचा भात
भंडारा,चंद्रपूर,गडचिरोली भागात भरपुर प्रमाणात तांदुळाची लागवड होत असते.जेवणात देखील भाताचे भरपुर प्रकार असतात आलटून पालटून वेगवेगळे प्रकार भाताचे केल्या जातात.... शिळा भात उरला की हा पदार्थ केल्याचं जातो...आणि 1 वाटी भात जरी असला तर बहीण भावात भांडणं देखील होतात... 😀याची चवच मस्त असते आणि झटपट होतो देखील... मी तर खास भात लावूनही हा फोडणीचा भात करते.तुम्हालाही नक्कीच आवडेल....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मी.
2 सर्व्हिंग
  1. 2 वाट्याशिजवलेला भात
  2. 1कांदा
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. 5कढीपत्त्याची पान
  5. 1/2 टीस्पूनजिर/मोहरी
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  8. 1/2 टीस्पूनसाखर
  9. 1/2लिंबाचा रस
  10. चिमुटभरहिंग
  11. 1 टेबलस्पूनतेल
  12. बारीक चिरलेली कोथिंबीर अंदाजे
  13. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

15 मी.
  1. 1

    सर्वप्रथम कढई गरम करून त्यात तेल घाला तेल गरम झाले की जिर मोहरी घालून फोडणी करा त्यात हिंग,मिरची,कांदा,कढीपत्त्याची पान घाला आणि छान परतवा.

  2. 2

    त्यात हळद,तिखट घालून मिक्स करा मग भात घालून छान परतून घ्या आणि साखर,मीठ लिंबाचा रस घाला मिक्स करा आणि झाकण ठेवून वाफ येवू दया.मग वरून बारीक चिरलेली घाला.आणि सर्व्ह करा.

  3. 3

    तयार फोडणीचा भात घरी केलेल्या लिंबाच्या लोणचे सोबत सर्व्ह करा...मस्त लागतो.

  4. 4

    फोडणीचा भात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
रोजी
Boisar, Palghar

Similar Recipes