मिक्स डाळीचे वळे (mix daliche vade recipe in marathi)

Ashvini bansod
Ashvini bansod @AshviniBansod
Nagpur

मिक्स डाळीचे वळे (mix daliche vade recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीमूंग डाळ (छिलटेवाली)
  2. 1 वाटीचना डाळ
  3. 1 वाटीमोट डाळ
  4. 1/2 वाटीबरबटी डाळ
  5. 4मोठे कांदे
  6. 10-12हिरवी मिरची
  7. 1 चमचजीरे
  8. 1 चमचआल लसून पेस्ट
  9. 1/2 चमचहळद
  10. 2 चमच लाल तिखट
  11. चवीप्रमाणे मीठ
  12. 1 चमचखाकस
  13. 1/2 वाटीकढीपत्ता,
  14. 1 वाटी बारिक चिरलेली कोथिंबीर
  15. 1/2 चमचगरम मसाला
  16. वळे तळायला आवश्यकतेनुसार तेल

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम सगळ्या डाळी एकत्र करून 7 ते 8 तास भिजत घालाव्यात

  2. 2

    8 तासानंतर सगळ्या डाळी पूर्ण भिजल्यावर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणे नंतर ऐका कापडावर पसरवून 15,20मिनिटे सुकवायला ठेवने (डाळ ऊनात किंवा फॅनच्या हवेखाली सुकवायला ठेवने)

  3. 3

    डाळ सोकल्यावर मिक्सर मधून दरदरी बारीक करून घ्यायची (पूर्ण बारीक नाही) नंतर त्यात लांब पातळ चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर बारीक चिरून टाकावी आणि नंतर तिखट मीठ आणि हळद, जीरे, खाकस, आल लसून पेस्ट आणि थोडा गरम मसाला घालावा

  4. 4

    नंतर सगळे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आणि 10 मिनिटे झाकून ठेवायचे

  5. 5

    10 मिनिटे झाल्यावर कढाई मध्ये वळे तळायला (deep fry) आवश्यकतेनुसार तेल घालून तापवत ठेवायचे

  6. 6

    नंतर हातावर तेल पाणी लावून मिश्रणाचे छोटे गोळे करून ते गोल असे थापवून घ्यायचे आणि तेल तापल्यावर तेलात सोडायचे व तपकिरी लालसर होई पर्यंत तळून घ्यायचे

  7. 7

    गरमागरम मिक्स डाळीचे वळे तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashvini bansod
Ashvini bansod @AshviniBansod
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes