मिक्स डाळीचे वडे विथ चटणी स्टफींग (mix daliche vada with chutney stuffing)

Pallavi Gogte
Pallavi Gogte @Pallavi08

सगळ्या डाळी तब्येतीला चांगल्या, त्यामुळे त्या खाणे गरजेचे आहे. नेहमीपेक्षा काही वेगळे करता आले तर तेवढाच चवबदल.
#cpm5

मिक्स डाळीचे वडे विथ चटणी स्टफींग (mix daliche vada with chutney stuffing)

सगळ्या डाळी तब्येतीला चांगल्या, त्यामुळे त्या खाणे गरजेचे आहे. नेहमीपेक्षा काही वेगळे करता आले तर तेवढाच चवबदल.
#cpm5

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/4 वाटीप्रत्येकी मसूर डाळ, पिवळी मूग डाळ, उडीद डाळ
  2. 2हिरव्या मिरच्या
  3. 1/2 इंचआले
  4. 4-5लसूण पाकळ्या
  5. पुदिना
  6. कोथिंबीर
  7. हिरवी मिरची
  8. आले
  9. मीठ चवीप्रमाणे

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम रात्री एका भांड्यात सर्व डाळी धुवून घ्याव्यात. मग रात्रभर पाण्यात त्या भिजत ठेवाव्यात. सकाळी त्यातले पाणी काढून टाकावे. मग ते मिक्सरमधून वाटावे. वाटताना त्यात मिरची, आले, लसूण व मीठ घालावे. मग एक बाउल मध्ये काढून घ्यावे.

  2. 2

    पुदिना, कोथिंबीर, मिरची व आले वाटून चटणी करून घ्यावी. त्यात चवीप्रमाणे मीठ घालावे.

  3. 3

    आता पॅन ला थोडे तेल सगळीकडे लावून घ्यावे. आधी थोडे वडेमिश्रण घालावे. मग त्यावर चटणी घालावी. वरून परत वडे मिश्रण घालून बंद करावे. मध्यम आचेवर ते शॅलोफ्राय करून घ्यावेत. गरम वडे चटणीबरोबर खायला तयार!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavi Gogte
Pallavi Gogte @Pallavi08
रोजी

Similar Recipes