हिरव्या वाटाण्याची उसळ (hirvya vatanyachi usal recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

मी सुमेधा जोशी मॅडम ची हिरव्या वाटाण्याची उसळ ही रेसिपी कुकस्नॅप केली.खूप मस्त झाली उसळ .एकदम चविष्ट..गरमगरम फुलक्यांसोबत एकदम मस्त लागली.

हिरव्या वाटाण्याची उसळ (hirvya vatanyachi usal recipe in marathi)

मी सुमेधा जोशी मॅडम ची हिरव्या वाटाण्याची उसळ ही रेसिपी कुकस्नॅप केली.खूप मस्त झाली उसळ .एकदम चविष्ट..गरमगरम फुलक्यांसोबत एकदम मस्त लागली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० -१२ मिनिटे
३-४
  1. 1/2 कपहिरवे वाटाणे
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 1/4 कपओल खोबर
  5. 1 टेबलस्पूनतेल
  6. 1/2 टीस्पूनजीरे मोहरी
  7. 1/4 टीस्पूनहळद
  8. १/८ टीस्पून हिंग
  9. 1/2 टीस्पूनतिखट
  10. 1/2 टीस्पूनगोडा मसाला
  11. 1/2 इंचआलं
  12. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  13. 1/4 टीस्पूनमीठ
  14. 1 कपपाणी...आवश्यकतेनुसार
  15. 5-6कडीपत्ता पाने

कुकिंग सूचना

१० -१२ मिनिटे
  1. 1

    साहित्य घेतले. वाटाणे रात्रभर भिजवून सकाळी कुकरमधून शिजवून घेतले.

  2. 2

    कढईत तेल घालून त्यात जीरे मोहरी हिंग,कडीपत्ता यांची फोडणी केली.त्यात कांदा घालून छान परतले.

  3. 3

    टोमॅटो आलं,खोबर मिक्सर मधून फिरवून घेतल.कांदा परतून झाल्यावर हे मिश्रण कढईत घालून छान शिजवले,त्यात हळद,तिखट,गोडा मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतले.

  4. 4

    थोडे पाणी घालून उकळले.शिजवलेले वाटाणे,मीठ थोडा गूळ घालून छान उकळी आणली.

  5. 5

    तयार उसळ बाउल मध्ये काढून घेतली.कोथिंबिरीने सजवली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes