जत्रा स्पेशल आग्र्याचा पेठा (agryacha petha recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#ks6
#आग्र्याचापेठा
#पेठा

जत्रा म्हंटली तर मला माझी आजी खूप आठवते माझ्या आईची आई आम्ही तिच्याकडे राहायला जायचो तेव्हा आमच्याकडे सप्तशृंगी देवीची जत्रा चैत्र अश्विन ची जत्रा भरते त्या जत्रात संध्याकाळी आजीबरोबर आम्ही जायचो तेव्हा आजी देवीच्या दर्शनानंतर गुडीशेव, पेठा आणि मातीची भांडी आम्हाला द्यायची फक्त ती गुडीशेव पेठा आणि भांडी मुळे आम्ही तिच्याबरोबर आवर्जून जायचो गुडीशेव ,पेठा, रेवडी आणि ती मातीची भांडी यासाठी जत्रेची खूप वाट बघायचो वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्याच्या भांडी जत्रा असल्यामुळे मिळायच्या
आजही खुप आठवण येते त्या जत्रेची तो आनंद घेतला आहे हे आठवून पण आनंद होत आहे.
अनुभवलेले असल्यामुळे जास्त गोष्टींचे आकर्षण होते आणि त्या गोष्टी आठवतात ते चित्रासारखे डोळ्यासमोर फिरायला लागतात जत्रा ही अशीच आहे नाव घेते तरी डोळ्यासमोर सगळं फिरायला लागते आपण पोहोचल्या सारखे वाटते.
जत्रेतील महत्त्वाचा एक पदार्थ ज्याने आपली जागा मांडून ठेवली आहे तो म्हणजे आग्र्याचा पेठा आग्र्याचा पेठा पहिले आग्र्याला कोणी जाऊन आले तरच आपल्याला मिळायचा पण आता हा आग्र्याचा पेठा भारताच्या प्रत्येक भागात प्रत्येक ठिकाणी आपल्याला मिळेल जत्रेत याची खास असा स्टॉल ,गाडी, रेडी तुम्हाला दिसणारच जत्रा म्हटल्यावर माझ्या डोक्यात सर्वात आधी हा पेठा आला आणि तो तयार करायला घेतला पहिल्यांदाच तयार केला त्यामुळे खूप उत्साह वाटत होते आणि खूप छान तयार झाला त्याचे आनंद होत आहे
रेसिपी तू नक्कीच बघा आग्र्याचा पेठा जो आपल्याला जत्रेत मिळतो तो कशाप्रकारे तयार केला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 तास
2 व्यक्ती
  1. 500 ग्रामपांढरा कोहळा/ भोपळा
  2. 200 ग्रामसाखर
  3. 1/4 टीस्पूनइलायची पावडर
  4. चुना

कुकिंग सूचना

2 तास
  1. 1

    बाजारातून आणलेला कोहळा स्वच्छ करून घेऊ मग त्यातला आतला मऊ भाग बीयासकट काढून घेऊ

  2. 2

    कोहळ्याचे मोठे मोठे पेठा असतो तसे तूकडे करून घेऊ वरचा मउ असा भाग व्यवस्थित चाकूने काढून घेऊ

  3. 3

    आता पेठा चा मागचा हिरवा भाग कट करून घेऊ
    पूर्ण तुकडे कट केल्यावर पाण्यातून व्यवस्थित घेऊन घेऊ

  4. 4

    बाजारात मिळते ती चुन्याची पुड घेऊन पाण्यात विरघळून घेऊ

  5. 5

    आता धुतलेल्या कोहळ्याच्या तुकड्यांवर काटा चमच्याने टोचे मारून घेऊन सगळ्या बाजूने वरून, खालून, आजूबाजू,मागच्या साईडने टोचे मारून घेऊ

  6. 6

    आता टोचे मारलेले तुकडे चुन्याच्या पाण्यात टाकून 10 ते 12 तास भिजत टाकून देऊ मी रात्रभर भिजत ठेवले आहे

  7. 7

    सकाळी चुन्याच्या पाण्यातून तुकडे काढून स्वच्छ पाण्याने धुऊन घेउ, पाच सहा पाण्यातून तुकडे स्वच्छ धुऊन घेऊन पूर्णपणे चुना काढून घेऊन

  8. 8

    शेवटच्या पाण्यातून धुतांना हातावर दाबून पाणी पिळून काढून घेऊ

  9. 9

    एका पातेल्यात पाणी गरम करून कोहळ्याचे तुकडे उकळून थोडे शिजवून घेऊ
    उकडून थोडे नरम झाल्यावर तुकडे बाहेर काढून पिळून थंड करून घेऊ

  10. 10

    आता कढईत दिल्याप्रमाणे साखर टाकून कोहळ्याचे तुकडे आणि साखर मिक्स करून एक तास असेच सोडून देऊन त्यांना पाणी सुटेल

  11. 11

    आता पाणी सुटल्यानंतर कडई गॅस वर चढून पाक घट्ट होऊ पर्यंत कोहळा पाकात तयार करूनघेऊ

  12. 12

    आता पेट्यात इलायची पावडर टाकून घेऊन आणि सारखे हलवत राहू पाक पूर्ण सुकत नाही तोपर्यंत पेठा हलवत राहू

  13. 13

    साखर पूर्ण पेठेत मुरल्यावर पेठा गाळणी वर सुकून घेऊ

  14. 14

    पंख्याखाली उजेडात पेठा सुकून घेऊ सुकल्यावर वरून पांढरा आणि आतून मऊ असा पेटा तयार होतो

  15. 15

    मी दोन दिवस पेठा सुकवला आहे
    अशा प्रकारे हा आग्र्याचा पेठा तयार आहे वरून थोडा कडक आणि आतून नरम असा तयार झाला आहे रसरशीत पेठा तयार होतो

  16. 16

    तयार जत्रेत मिळणारा आग्र्याचा पेठा

  17. 17
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

टिप्पण्या (12)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
खूप सोपी रेसिपी आहे आग्राचा पेठा

Similar Recipes