आंबा भात (amba bhat recipe in marathi)

Nilima Gosavi
Nilima Gosavi @cook_27652681

मी ही रेसिपी भाग्यश्री लेले यांच्या कुक पॅड पेजवर बघितली होती ती मला खूप आवडली त्यांच्यासारखी रेसिपी बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे भात चवीला खुप छान लागत आहे.

आंबा भात (amba bhat recipe in marathi)

मी ही रेसिपी भाग्यश्री लेले यांच्या कुक पॅड पेजवर बघितली होती ती मला खूप आवडली त्यांच्यासारखी रेसिपी बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे भात चवीला खुप छान लागत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 ते 45 मिनिटे
सहा जणांना
  1. 1.5 वाटी आंबेमोहोर तांदूळ
  2. 1.5 वाटीवाटी
  3. 2 वाट्यासाखर
  4. 3 टेबलस्पूनतूप
  5. 3-4 लवंग
  6. 3-4 काळीमिरी
  7. 7-8 वेलदोडे
  8. काजू-बदामाचे काप
  9. 10-12 केशर काड्या

कुकिंग सूचना

40 ते 45 मिनिटे
  1. 1

    प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास निथळत ठेवणे.

  2. 2

    अर्ध्या तासांनी एका एक जाड बुडाच्या पातेल्यात तूप घालावे तूप गरम झाले की त्यात काळी मिरी लवंग घालून परतून घ्यावे मग त्यात भिजवलेले तांदूळ घालून परत पुन्हा एकदा परतावे. आता त्यात तीन वाटी गरम पाणी घालून काजू बदामाचे कापआणि केशर घालून पुन्हा एकदा परतावे. भात थोडासा शिजवून घ्यावा, भात पूर्ण शिजवायचा नाही.

  3. 3

    भात शिजला कि गार करण्यासाठी परातीत मोकळा करावा. आता एका पातेल्यात आंब्याचा रस आणि साखर घालून हे मिश्रण गॅसवर ठेवावे मिश्रणाला बुडबुडे आली की त्यात वेलची पावडर घालावी आणि परातीत काढून ठेवलेला भात त्याच्यात घालून व्यवस्थित मिक्स करावे, आणि झाकण ठेवून एक वाफ आणावी.

  4. 4

    अधून मधून हा भात परतून घ्या नाहीतर खाली लागायची शक्यता आहे. सुरूवातीला हे मिश्रण पातळ दिसते पण जसजसा भात शिजायला लागतो तसं घट्ट व्हायला सुरुवात होते मग गॅस बंद करावा आणि तसाच पाच दहा मिनिटे झाकून ठेवा म्हणजे त्यातील वाफ मुरली कि भात चांगला मोकळा होतो. भात झाल्यावर कडेने एक ते दोन चमचे साजूक तूप घालावे म्हणजे चव चांगली लागते.

  5. 5

    त्यावर काजू-बदामाचे काप घालून सादर करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nilima Gosavi
Nilima Gosavi @cook_27652681
रोजी

Similar Recipes