नारळी भात (narali bhat recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#रेसिपीबुक #week8 श्रावणात येणार्या नारळी पौर्णिमेच्या सणाला प्रामुख्याने नारळी भात हा पदार्थ केला जातो. या दिवशी नारळा पासून बनणारे खोबर्याच्या वड्या, ओल्या नारळाच्या करंज्या, खोबरं घालून लाडू इत्यादी विविध प्रकार बनवतात. नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा पण आवडता सण आहे. यादिवशी समुद्रात नारळ अर्पण करुन कोळी लोकं मासेमारी सुरु करण्यासाठी समुद्रात होड्या सोडतात, आणि गोडधोड पदार्थ बनवून नैवेद्य दाखवतात. मी नारळी पौर्णिमेच्या दिवशी एकदम वेगळ्याच प्रकारचा अगदी झटपट होणारा असा नारळी भात बनवला होता. याची रेसिपी देत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
४ जणांसाठी
  1. २०० ग्रॅम तांदूळ
  2. १०० ग्रॅम साखर
  3. १०० ग्रॅम गूळ
  4. 1नारळ
  5. 1 टीस्पूनवेलचीपूड
  6. 1 टीस्पूनकेशर
  7. 2 टीस्पूनकाजू
  8. 2 टीस्पूनतूप
  9. 3अख्खी वेलची
  10. 4लवंगा

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    साखर मिक्सर मधून बारीक करुन घेतली. एका नारळाच्या ओल्या खोबर्याची मिक्सर मधून ४ वाट्या पाणी घालून अगदी बारीक प्युरी करुन घेतली.

  2. 2

    गूळ बारीक चिरुन घेतला. मग कुकर मधे तूप घालून त्यात वेलची, लवंग घालून परतून त्यात काजू घालून छान खरपूस तळून घेतले.

  3. 3

    तळलेले थोडे काजू सजावटीसाठी बाजूला काढून ठेवले आणि राहिलेल्या काजूवर धुतलेले तांदूळ घालून परतले. खोबर्याच्या प्युरीमधे केशर घालून ते परतलेल्या तांदळामधे घालून त्यात थोडे पाणी घालून मिक्स केले. २ वाटी तांदळा साठी ५ वाट्या खोबर्याची प्युरी घातली.

  4. 4

    मग त्यात पिठीसाखर घालून मिक्स केले. मग त्यात चिरलेला गूळ आणि वेलचीपूड घालून ढवळले.

  5. 5

    फ्युचूरा कुकरचे झाकण लावून मी दोन मिनिटे मंद गॅसवर नारळी भात शिजवून घेतला. फ्युचूरा कुकरला शिटी होत नाही, यात वाफेवर आणि मंद गॅसवर पदार्थ खूपच कमी वेळात आणि छान शिजतो. इतर शिटी होणार्या कुकर मधे दोन शिट्यांमधे नारळीभात छान शिजतो.

  6. 6

    एका प्लेटमधे नारळी भाताची मूद घालून बाजूला खोबर्याच्या वड्या आणि तळलेले काजू् ठेवून सजवले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes