दाल मखनी (daal makhni recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#Cooksnap
#भाग्यश्री लेले याची रेसिपी cooksnap केली आहे .नेहमी मी माझी दालमखनी ची रेसिपी करते म्हटले आज भाग्यश्री लेले ची करून बघुया.खुप छान झाली भाग्यश्री आवडली आम्हाला.थोडा बदल केला म्हणजे माझ्या कडे साल वाली उडिद डाळ होती ती घेतली.

दाल मखनी (daal makhni recipe in marathi)

#Cooksnap
#भाग्यश्री लेले याची रेसिपी cooksnap केली आहे .नेहमी मी माझी दालमखनी ची रेसिपी करते म्हटले आज भाग्यश्री लेले ची करून बघुया.खुप छान झाली भाग्यश्री आवडली आम्हाला.थोडा बदल केला म्हणजे माझ्या कडे साल वाली उडिद डाळ होती ती घेतली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
2/3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपराजमा
  2. 1 कपउडीद डाळ
  3. 1 टेबलस्पूनचण्याची डाळ
  4. 1/2 कपकांदा चिरलेला
  5. 1/2 कपटोमॅटो
  6. 1 टीस्पूनआल लसुण पेस्ट
  7. 2हिरव्या मिरच्या
  8. 2 टेबलस्पूनतुप
  9. 1 टीस्पूनजीरे
  10. 1 टेबलस्पूनधणेपुड
  11. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  12. 1/2 टीस्पूनआमचूर पावडर
  13. 1 टीस्पूनगरम मसाला
  14. 1 टीस्पूनमीठ
  15. 1कसुरी मेथी
  16. 10/12आल्याचे पातळ काप
  17. 2मिरच्या चे तुकडे
  18. 2 टेबलस्पूनबटर
  19. 2 टेबलस्पूनफ्रेश क्रीम
  20. 1 टेबलस्पूनकोथिंबीर

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    उडीद डाळ व राजमा स्वच्छ धुवून 8/10 तास भिजत घालणे.

  2. 2

    कुकरमधे उडीद डाळ,राजमा व चण्याची डाळ नि त्यामधे लवंगा, दालचीनी, तमालपत्र,काळीमीरी,मोठी वेलची घाला नि चार पट पाणी घालून कुकरमधे मधे 8/10 शिट्या घेऊन शिजवून घ्या.

  3. 3

    कुकरला डाळ शिजतेय तोपर्यंत टोमॅटो,
    कांदा,हिरवी मिरची वाटून घ्या,आल लसुण पेस्ट नसेल तर तेही ह्यात टाका.तसेच खालील प्रमाणे तयारी करावी.

  4. 4

    आता कढईत तुप घाला तापले कि जीरे घाला जीरे फुलले कि केलेले वाटण घाला आललसुण पेस्ट घाला नी 5 मिनिटे परतून घ्या. नंतर त्यात लालतिखट,धणेपूड,
    आमचूर पावडर घाला नी कडेला तुप सुटेपर्यंत परता.

  5. 5

    आता त्यात शिजलेली डाळ थोडी घोटून घाला नंतर त्यात गरम मसाला, कसूरी मेथी,आले मिरची चे तुकडे घाला नि दोन कप गरम पाणी घाला नि 20 मिनीटे मध्यम आचेवर शिजवा.

  6. 6

    डाळ छान शिजली आहे त्यात बटर नि फ्रेश क्रीम घाला नि 2मिनिटे आणखीन शिजवा.दाल माखनी तयार आहे.

  7. 7

    परत थोडे फ्रेश क्रीम नि कोथिंबीरीने सजवा.भाता बरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes