खरपूस खमंग कोबीचे भानोळे (kobiche bhanole reciep in marathi)

Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252

#KS7
कोबीचे भानोळे, किंवा भानोले, अथवा भानवले...
बाहेर मस्त पाऊस पडत असताना गरमागरम कोबीचे भानोले
काय अप्रतिम लागत पडत्या पावसात चहा सोबत अगदी चविष्ट 😋😋भानोळ्याची पाककृती ही एक कला आहे.तिला कुठल्याच मापदंडाचे बंधन नाही.हाताच्या मुठीवर अंदाजाने जिन्नसांचे प्रमाण घेतले जाते. पदार्थांतील घटक, शिजवण्याची पद्धत आणि परंपरेनुसार अप्रतिम चवीचा पदार्थ तयार होतो.प्रत्येक पदार्थांची एक ओळख असते. भानोळ्याची डिग्निटी सांभाळायची, तिचा आब राखायचा तर ती पारंपरिक पद्धतीने चुलीवर बनवुनच.हो आता आपल्याला थोडी मेहनत जास्त करावी लागते पण अश्या जिभेवर रेंगाळत राहणाऱ्या चवीसाठी काहीही😋😋
हा पदार्थ अगदी गरम वाफाळता असतानाच खायचा तरच त्याची चव भन्नाट लागते. हा पदार्थ स्टीम केला जातो.त्यामुळे आरोग्यदायी आहे. कुठेही तेलाचे प्रमाण जास्त नाही. अनेक पारंपरिक पदार्थांमधे तांदळाचे व ओल्या नारळाचे प्रमाण साहाजिकच अधिक असते...मी खूप पारंपरिक पदार्थ बघते जे आधीच्या पिढीनी खूप विचारपूर्वक बनवले दिसतात ज्याचा आरोग्यावर काही दुष्परिणाम होत नाही.असे जिन्नस घेऊन की जे तुमच्या घरात नेहमी उपलब्ध असतात
कोबीचा हा एक अत्यंत खमंग असा पदार्थ आहे. भानोले, भुजणे,वाफवणे वगैरे भाजून करायचे प्रकार ही एक खासियत आहे. भानोले हा भाजून किंवा वाफवून दोन्ही प्रकारे करता येतो आणि दोन्ही प्रकारे छानच लागतो. वाफवून केला तरी त्याचे तुकडे करून शॅलो फ्राय करू शकता. हा प्रकार लंगडी पातेल्यात खालीवर निखारे ठेवून केला जातो .लंगडी पातेल्यात चारी बाजुनी छान वाफ मिळून पदार्थ मस्त शिजला जातो.भानोल्यात कोबी जास्त हवा.नारळाचे दुधाने कोबीच्या भानोळ्याची चव छान येते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
5 ते 6 servings
  1. 1मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कोबी
  2. 2 वाटीखवलेला ओला नारळ
  3. 2 वाटीनारळाचे दूध
  4. 3मोठे कांदे बारीक चिरलेले
  5. 2 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  6. 3 टेबलस्पूनआलेलसूण पेस्ट
  7. 3-4 वाटी तांदळाचे पीठ (कमी जास्त लागू शकते)
  8. 1 वाटीबेसन पीठ
  9. 3-4 पोपटी मिरच्या बारीक चिरलेल्या
  10. 1 टेबलस्पूनघरघूती मसाला
  11. 1 टीस्पूनहळद
  12. मीठ चवीनुसार
  13. 2-3 टेबलस्पूनगरम मसाला
  14. 2 टीस्पूनधने पावडर
  15. 2 टीस्पूनजीरे पावडर
  16. 2 टेबलस्पूनतेल
  17. 1 टेबलस्पूनकाश्मिरी मिरची पावडर

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    कोबी, कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून त्यात आलं लसणाचे वाटण खवलेला ओला नारळ,मिरचीचे तुकडे, चवीनुसार मीठ, मसाले, हळद, धणे पावडर, जीरे पावडर,मीठ घालून मिक्स करून घ्या...बाजूला ठेवा. 10 ते 15 मिनिटांनी पाणी सुटून मिश्रण ओलसर होईल

  2. 2

    तांदळाचे पीठ, बेसन पीठ, तेल घालून मिसळा...आपल्या अंदाजानुसार पीठांचे प्रमाण कमी जास्त करा...आवश्यकतेनुसार नारळाचे दूध घालून मिश्रण मळून घ्या.मिश्रण खूप घट्ट आणि खूप पातळ होणार नाही ह्याची काळजी घ्या.कोबी शिजताना पाणी सुटतेच.नारळाच्या दुधाऐवजी तुम्ही पाणी वापरू शकता.एक जाड बुडाचे(लंगडी भांडे) पातेले घ्या. त्याच्या बुडाला केळीची पाने ठेवा.केळीच्या पानाला हलक्या हाताने तेल पसरवा.त्यावर हे मिश्रण हलकेच थापून घ्या.खूप जाड थर नका लावू नाहीतर आतून कच्ची राहील.वरून पुन्हा केळीच पान लावा

  3. 3

    चुलीत विस्तव तयार करून घ्या.चुलीवर हे पातेले ठेवा.पातेल्यावर बसेल असे झाकण ठेवा.म्हणजे हवा आत जाणार नाही.आता झाकणावर पेटते कोळसे ठेवा. ह्याने भानोळे वरून कच्चे राहत नाही छान शिजले जाते वाफेत. उपलब्ध असल्यास सोललेल्या नारळाची सुकी साले विस्तवावर टाका त्याने छान भाजले जाते भानोळे. 30 ते 35 मिनिटांनी पातेले उपडे करून भानोळे केळीच्या पानावर काढून घ्या. खूप मस्त असा खरपूस रंग येतो.

  4. 4

    आवडत असल्यास शॅलो फ्राय करा.तुकडे पाडून गरमागरम खायला द्या.सकाळी नाश्ता म्हणून,संध्याकाळी चहासोबत Snack म्हणूनही खाऊ शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252
रोजी

Similar Recipes