जांभूळ जामुन शाॅट्स (jamun shots recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#cpm2

जांभूळ म्हटलं की आठवतं...जैत रे जैत चित्रपटातलं आशाताईंनी गायलेलं.. *जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो*...हेच गाणं..इतकी बेमालूम सांगड आहे या दोघांची..की हाच विचार येतो.. लोकसंस्कृती आणि खाद्यसंस्कृती एकमेकांचे अविभाज्य घटक आहेत हे परत एकदा प्रकर्षाने जाणवलं.. जांभूळ साधारणपणे रानावनात वाढणारे झाड.. वटपौर्णिमेच्या आसपास या जांभुळलेल्या जांभळाचा सिझन..उणापुरा 15-20दिवसांचा हा season...ही डोंगरावरची,रानावनातली संपत्ती आपल्यासाठी घेऊन येतात आदिवासी पाड्यांवरचे आदिवासी ,कातकरी लोकं.. तेही जांभळाच्या पानांतूनच‌..आणि आपण या अत्यंत गुणकारी अशा जांभळाचा स्वाद घेतो..जांभळाच्या फळांचं महत्व इतके की वटपौर्णिमेच्या दिवशी आंबा,फणस यांच्या बरोबर जांभळाचं वाण सुवासिनींना दिलं जातं.. डायबिटीस साठी जांभूळ हे वरदानच आहे..जांभळाचे इतरही अनेक उपयोग आहेत ..खरंतर निसर्गात निर्माण होणार्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला काही ना काहीतरी उपयोग होतोच असतो..किती काळजी त्या निसर्गाला आपली..मग आपणही निसर्ग संपत्तीचा आस्वाद घेताना निसर्गाचे तेवढ्याच ममतेने संरक्षण करायला हवे ..पटतंय ना..
चला तर मग या नाविन्यपूर्ण रेसिपी कडे जाऊ या..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10मिनीटे
4जणांना
  1. 250 ग्रॅम चांगली टपोरी जांभळे
  2. 2 टेबलस्पूनसाखर
  3. सैंधव मीठ चवीनुसार
  4. 7-8पुदिन्याची पाने किंवा पुदिना पावडर
  5. 1/2 कपबर्फाचे तुकडे किंवा पाणी
  6. 1/2लिंबू

कुकिंग सूचना

10मिनीटे
  1. 1

    प्रथम जांभया मधल्या बिया काढून घेणे आणि साहित्य जमा करून घ्या.

  2. 2

    मिक्सरच्या भांड्यामध्ये जांभळाचा पल्प, साखर,सैंधव मीठ, पुदिन्याची पाने मी इथे पुदिना पावडर घातलेली आहे आणि बर्फ किंवा पाणी घालून मिश्रण एकजीव होईपर्यंत फिरवून घ्या.

  3. 3

    आता शाॅट्स ग्लासेसच्या वरच्या गोलाकार कड्यावरुन लिंबू चोळून घ्या..आणि आता हा ग्लास सैंधव मीठामध्ये उलटा करून अलगद फिरवा म्हणजे edges ला मीठ लागेल..आता या ग्लसेस मध्ये जांभळाचा रस ओतून साइडला पदिना पानाने डेकोरेट करुन सर्व्ह करा मस्त चटपटीत गारेगार जामुन शाॅट्स..😋😋

  4. 4
  5. 5
  6. 6
  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes