पावसाळी भाजी (pavsali bhaji recipe in marathi)

Namita Manjrekar @Namita25manjrekar
पाऊस पडायला लागला की अनेक रानभाज्या डोकं वर काढतात, त्यातली ही तायकाळा भाजी. औषधी आहे. एखाद्याला जुलाब पडशें होत असेल तर ह्याची पाने वाटून रस पिण्यास द्यावा. गुणकारी उपाय आहे.
पावसाळी भाजी (pavsali bhaji recipe in marathi)
पाऊस पडायला लागला की अनेक रानभाज्या डोकं वर काढतात, त्यातली ही तायकाळा भाजी. औषधी आहे. एखाद्याला जुलाब पडशें होत असेल तर ह्याची पाने वाटून रस पिण्यास द्यावा. गुणकारी उपाय आहे.
कुकिंग सूचना
- 1
तायकाळाची पाने स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी
- 2
कांदा थोडा मोठा चिरावा, मिरच्यांचे तुकडे करून घ्या,डाळ धुऊन घ्या.
- 3
एका कढईत भाजी, कांदा, मिरच्या, डाळ, मीठ व पाणी घालून शिजू द्या. शिजल्यावर खोबरं घालून भाजी तयार
- 4
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कुर्डुची भाजी (kurdai bhaji recipe in marathi)
#mrs -पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या औषधी, अनेक रोगांवर गुणकारी उपाय असणार्या असतात.अशीच कुर्डूची भाजी... Shital Patil -
पातूर/ गुनगुण्याची भाजी (patur bhaji recipe in marathi)
#msr#पावसाळी_रानभाज्यापावसाचा पहिला शिडकावा झाला की, रानभाज्यांचे प्रमाण वाढू लागते. या रानभाज्या म्हणजेच मुळात कंदवर्गीय वनस्पती. चवीला रुचकर, औषधी गुणधर्म असलेल्या आणि पौष्टिक अश्या... या भाज्या खावयास मिळणे ही अस्सल खवय्यांसाठी एखादा पर्वणीहून कमी नसते. वर्षातून एकदा येणारा रानमेवा म्हणजे खऱ्या अर्थाने सेंद्रिय अन्न होय...ह्याच रानभाज्या मध्ये मिळणारी एक भाजी म्हणजे *पातुर* किंवा *गुनगुण्याची* भाजी.. ही भाजी दलदलीच्या जागी किंवा भाताच्या शेतामध्ये उगवते. नदीमध्ये देखील ही भाजी बघायला मिळते. ही भाजी तोडताना फक्त कोवळी कोवळी पाने तोडावे. या पातुर भाजी मध्ये जास्त मसाले घालू नये. जास्त मसाल्यामुळे भाजीची मूळ चव नाहीशी होते. त्यामध्ये खूप कमी मसाले वापरून ह्या रानभाज्या कराव्या म्हणजे त्याची मुळ चव तशीच राहते...पातुर ही भाजी भूक वाढीसाठी उपयुक्त असणारी, अपचन होत असेल तर किंवा पोटात गॅसेसचा त्रास होत असेल तर ही भाजी खाल्ल्याने खूप फायदा होतो....तेव्हा नक्की ट्राय करा *पातूर / गुनगुण्याची भाजी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
शेवगा पाले भाजी (sevga pale bhaji recipe in marathi)
#msr ही भाजी अनेक रोगांवर रामबाण उपाय असणारी औषधी, गुणकारी आहे.डोळयासाठी,पोट साफ होण्यासाठी जरूर खाली.पाला अगदी कोवळा असायला हवा. Shital Patil -
घेवड्याची भाजी (Ghevdyachi Bhaji Recipe In Marathi)
थंडीमध्ये खूप प्रकारचा घेवडा मिळतो.प्रत्येकाची चव थोड्याफार प्रमाणात सारखी असते.हा जो घेवडा आहे,थोडा चपटा असतो.शिजल्यावर मउ होतो.आज मॅंगलोरी प्रकारची भाजी आपण पाहूया. Anushri Pai -
टाकळ्याची भाजी (Taklyachi Bhaji Recipe In Marathi)
#रानभाज्यारानभाज्यांना रानभाज्या अस बोलण्याऐवजी वनौषधी म्हटले पाहिजे. प्रत्येक रानभाजीचे काहीना काही औषधी गुणधर्म असतात. मुळात पूर्वीच्या काळी रानभाज्यांचा औषधे म्हणूनच उपयोग होत होता. कालांतराने याचे घरगुती जेवणामध्ये रानभाज्या म्हणून वापर सुरू झाला. तर अशीच एक रानभाजी आज आपण करणार आहोत तीच नाव आहे टाकळा. टाकळ्याची भाजी त्वचारोग, वातावर खूप उपयोगी. ही भाजी मेथीच्या भाजीसारखीच असते. त्याची कोवळ्या पानांचीच भाजी बनवता येते. जून झाली की वापरत नाहीत. या भाजीच्या कोथिंबीर वड्यासारखी वडीही छान होते. Deepa Gad -
तरोट्याची भाजी / टाकळ्याची भाजी (tarotyachi bhaji recipe in marathi)
#msr#तरोटा/टाकळ्याची_भाजी या रानभाजीचे वैशिष्ट्य म्हणजे, लागवड न करता या भाज्या दरवर्षी पावसाळ्यात नित्यनेमाने उगवतात आणि त्यालाच आपण रानभाज्या असे म्हणतो. तसेच या भाजीची वाढ होण्याकरता कुठल्याही प्रकारची मेहनत घ्यावी लागत नाही, किंवा त्याच्या वाढीसाठी कुठल्याच खताचा किंवा कीटकनाशक द्रव्यांचा वापर करावा लागत नाही. म्हणजे या भाज्यांना आपण ऑरगॅनिक फूड म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आणि त्या एकदातरी खाव्यात जेणेकरून त्याचा फायदा आपल्या प्रकृतीला होईल... असे व्हायला नको कि.. "निसर्ग आहे द्यायला, पदर नाही घ्यायला"तेव्हा निसर्गाच्या या ठेवेचा नक्की आस्वाद घ्यावा... अश्या किती तरी रानभाज्या या निसर्गाने आपल्याला दिल्या आहेत" त्यातलीच एक रानभाजी म्हणजे *तरोट्याची भाजी*.. पचायला हलकी असते. त्वचारोग, पोटाचे विकार यावरती गुणकारी असणारी भाजी. ही भाजी खाल्ल्याने वातविकार दूर होतो. सांधे दुखी साठी उपयुक्त तसेच या भाजीच्या सेवनाने पोट साफ होते.तुरट चवीची असणार्या या भाजीमध्ये बरेच जण भाजी करताना ती वेगवेगळ्या प्रकारे करतात. म्हणजेच असे बघा, कुणी तिखट, हिंग, धने पावडर, जीरे पावडर, लसूण याची फोडणी देऊन करतात. कुठे कुठे या भाजीमध्ये डाळीचा वापर देखील केला जातो. पण मी मात्र ही भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने करते. म्हणजे यातलं काहीही वापरत नाही. मी फक्त मेथीच्या भाजी सारखी किंवा चवळीच्या भाजी सारखी मोकळी भाजी जशी आपण करतो त्या प्रकारे ही भाजी करते. कारण कसे आहे ना, तरोट्याच्या भाजीला स्वतःची एक चव आहे...चला करूया मग.. 💃 💕 Vasudha Gudhe -
कोरल्याची भाजी (Korlyachi Bhaji Recipe In Marathi)
#रानभाज्याआजची रानभाजी आहे कोरला. कोरल्याची भाजी थायरॉईडवर उत्तम. या भाजीची पाने चिंचेच्या पानासारखी/लाजाळूच्या पानासारखी असतात, त्या भाजीची पुढची कोवळी टोक खुडून घ्यायची. ही भाजी चिरताना बुळबुळीत लागते. काहीजण यात भेंडी घालूनही भाजी बनवतात. याची पातळ आमटी, वड्याही करतात. या भाजीत थोडा चिंचेचा कोळ घालणे. चवीला ही भाजी मला भेंडीच्या भाजीसारखीच लागली. Deepa Gad -
कोयरेलची/ कोरला भाजी (korla bhaji recipe in marathi)
#रानभाजीबऱ्याच भाज्या अशा आहेत की त्या फक्त पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळतात, करणं ह्याची लागवड होत नाही. पहिल्या पावसाचे टपोरे थेंब तृप्त झालेली धरणी आपल्या पोटात सामावून घेतलेली बिजं बाहेर अंकुरायला मुक्त करते. ओल्या मातीच्या कुशीत ती बहरतात आणि मग काही दिवसातच त्यांचं दान आपल्या पदरात पडते. अश्या ह्या रानभाज्या... वर्षातून एकदाच मिळतात, अगदी काही दिवस आणि त्या सर्व औषधी, रोगप्रतिकरकशक्ती वाढवणाऱ्या असतात. तेव्हा जर भाजी वाली कडे मिळाल्या तर नक्की करा आणि खाऊन पाहा. कोयरेल ही आपट्याच्या पानासारखी दिसणारी भाजी आहे, हीची कोवळी पाने पावसाळ्याच्या सुरवातीला मिळतात. ह्याच्या तुम्ही बेसन घालून वड्या करू शकता, किंवा कांदा व ओले खोबरे, किंवा लसूण व दाण्याचा कुट घालून भाजीही छान होते. Minal Kudu -
मुळ्याच्या पाल्याची भाजी (mulyacha palyachi bhaji recipe in marathi)
हिवाळा आला की मस्त शुभ्र मुळा मिळतो... सलाद मध्ये आपण आवर्जून खातो... पण त्याची पाने फेकून न देता भाजी सुध्दा करता येते... Shital Ingale Pardhe -
कुर्डुची भाजी (Kurduchi Bhaji Recipe In Marathi)
#रानभाज्यापावसाळ्यात अगदी रानभाज्यांची रेलचेल असते. अशीच एक औषधी गुणधर्म असणारी रानभाजी मी तुम्हाला दाखवणार आहे. कुर्डु नाव असलेली ही रानभाजी मुतखडा, मधुमेह, रक्तदाब, बद्धकोष्ठता, जुनाट खोकला, कफविकार, मासिक पाळीचा त्रास यावर खूप औषधी आहे. या भाजीची पाने हार्टच्या आकाराची असून पानांच्या कडा व देठ हे लालसर दिसतात. याची पाने व पुढचा कोवळा भाग खुडून ४-५ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. ही भाजी जास्त वाढून जून झाली की त्याला सफेद रंगाच्या तुऱ्यासारखी फुले येतात जी आपण दसऱ्याला तोरणात वापरतो. काही ठिकाणी या फुलांना कोंबडा म्हणतात व भाजीला कुरडई असेही संबोधतात. ही भाजी फक्त पावसाळ्यातच उगवते त्यामुळे इतरवेळेला मिळत नाही तेव्हा याच्या फुलांमध्ये एकदम छोट्या काळ्या रंगाच्या बिया असतात तुळशीच्या बियासारख्या त्यांचं चूर्ण करून पाण्यातून घ्यायचं. तसेच ही भाजी अतिप्रमाणात खाल्ल्याने जुलाब होतात त्यामुळे प्रमाणातच खावी. Deepa Gad -
फरसबीची तळासणी (Farasbi Chi Bhaji Recipe In Marathi)
#BR2 फरसबी ही एक अशी भाजी आहे की जी सर्वांना आवडते आणि खूप डिशमध्ये हिचा उपयोग करता येतो. व्हेज कुर्मा, पुलाव, कोशिंबीर, सुकी भाजी, कटलेट्स ,टिक्की सर्व ठिकाणी चालते .अशी ही एव्हरग्रीन भाजी आज आपण अगदी कमी साहित्यात पण तितकीच चविष्ट अशी करून बघूया. ही रेसिपी मंगलोरी आहे Anushri Pai -
पालकाची भाजी
पालक म्हटल की समोर येतं पालक पनीर, मटार पालक, पालक सूप.... असे पदार्थ भरपूर साहित्य आणि वाटाघाटी. आता सोपी सिम्पल भाजी आपण पाहणार आहोत डायरेक्ट पालक आणि त्यातील महत्त्वाची लोह खनिज तत्त्वे आपल्या शरीराला मिळतील. Veena Suki Bobhate -
लाल भोपळ्याची भाजी (lal bhopalyachi bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण स्पेशल रेसिपीश्रावण महिन्यात गणपती च्या दिवसात आवर्जून केली जाते ती लाल भोपळ्याची भाजी.नावडतीच्या भाजांमधील एक भाजी म्हणजे लाल भोपळा. अनेक ठिकाणी याला डांगर किंवा तांबडा भोपळा असं म्हणतात. ही भाजी शरीरासाठी गुणकारी असून त्याचे अनेक फायदे आहेत.म्हणून या भाजी चा आहारात नक्की समावेश करावा. Poonam Pandav -
फोडशीची भाजी (Phodshichi Bhaji Recipe In Marathi)
पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्या आवर्जून खाव्यात भरपूर औषधीयुक्त असतात. अशीच एक रानभाजी मी आज केली आहे तीच नाव आहे फोडशी. ही भाजी पावसाळ्यातच आदिवासी बायका विकायला येतात. ही फोडशीची भाजी कांद्याच्या पातीच्या भाजीप्रमाणे सुद्धा करतात, पीठ पेरून करतात, भिजवलेली चणाडाळ किंवा मुगडाळ घालून करतात. पालेभाजीप्रमाणे सुद्धा करतात. खरंतर ही भाजी मी पहिल्यांदाच आणली. रानभाज्यांच्या रेसिपी एवढ्या पाहायला मिळतात की मलाही उत्सुकता होती या भाज्यांची चव चाखायची. या फोडशीच्या भाजीत खूप माती असते त्यामुळे तो ५-६ वेळा तरी पाण्याखाली धरू धुवावी लागते, त्यांचा खाली जो सफेद मुलासारखा भाग असतो तो कापून टाकायचा तसेच पानाच्या मध्ये जर दांडी असेल तर तीसुद्धा काढून टाकावी. खरंच ही फोडशीची भाजी इतकी चविष्ट झाली की सुरुवातीला लेकीची धुसपुस चालली होती की मम्मी ही भाजी कशी लागते माहीत नाही मग तू आणलीस कश्याला म्हणून.... आणि खाऊन बघितल्याबरोबर तिची जी प्रतिक्रिया होती ती पाहूनच खूप छान वाटले.... फोटो काढेपर्यंत भाजी पोटात पण गेली मग लक्षात आलं फोटोच काढला नाही मग आमच्या ताटातलीच भाजी डिशमध्ये काढून फोटो काढला. चला तर आपण रेसिपीकडे वळु या....... Deepa Gad -
स्वादिष्ट आणि कॅल्शियम युक्त तिळाची चटणी (Tilachi chutney recipe in Marathi)
#cnतिळाची चटणी स्वादिष्ट, चटपटीत असली तरीही शरीराला पोषक असे कॅल्शिअम पुरवणारी आहे. आपल्या रोजच्या आहारात आपण तिळाच्या चटणीचा समावेश केला तर गुडघेदुखी, सांधेदुखी या अशा सगळ्या व्याधींवर हा गुणकारी उपाय ठरतो. Prajakta Vidhate -
पौष्टिक कंटोळी /कर्टुल्याची भाजी (kantoli bhaji recipe in marathi)
#msr#रानभाजी रेसिपीज.पावसाळ्याच्या दिवसात अनेक रानभाज्या बाजारात येतात. टाकळा, करटोली,कोहळू, लोथ, अशा अनेक भाज्यांचा आजकाल आपल्या आहारातून समावेश कमी होत चालला आहे. परंतू चवीला हटके आणि आरोग्यादायी आहेत. पावसाळ्यातील रानभाजीपैकी करटोली ही कारल्याच्या प्रजातीमधील भाजी असली तरीही ती तितकी कडवट नसते.कंटोळी (कर्टुल) ही अशीच शरीरावर वेगाने चांगला परिणाम करणारी भाजी आहे. कंटोळीला सर्वात ताकदवान भाजी मानले जाते. कंटोळी अनेकदा औषधी स्वरूपातही वापरली जाते. कंटोळीचे काही दिवस सेवन केल्याने शरीर तंदुरुस्त होण्यास मदत होते.चला तर मग पाहूयात , पौष्टिक कंटोळीची भाजी ...😊 Deepti Padiyar -
भरलेली करटुल्याची भाजी (bharleli kartulyachi bhaji recipe in marathi)
#msr#रान भाजीकरटोली म्हणजे हा एक कोकणातील रानमेवा आहे त्यात त्याला अनेक वेगवेगळी अशी नावे आहेत कराटे कंटुली करटोली.चवीला अत्यंत स्वादिष्ट अशी भाजी आहे यामुळे शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढते कोरोनाच्या या काळात रोगप्रतिकार शक्ती वाढलीच पाहिजे.ज्यांना दम लागतो त्यांनीही भाजी जरूर सेवन करावी हृदयरोग मधुमेहा या सारख्या रोगांवर सुद्धा ती गुणकारी आहे तसेच अनेक रोगांवर पण गुणकारी आहे व औषधी युक्त आहे.भरलेली करटुल्याची भाजी खुप चविष्ट अशी लागते 😋 Sapna Sawaji -
झुणका शेवगा पानांचा (zunka shevga panacha recipe in marathi)
सर्वांना माहीतच आहे की शेवग्याची पाने, फुले ,शेंगा अतिशय औषधी गुणधर्मांनी उपयुक्त आहेत .ह्याचे नित्य सेवन केल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते .आज बघूया आपण झुणका Bhaik Anjali -
पातुरची भाजी (paturchi bhaji recipe in marathi)
#msrपावसाळी भाज्या स्पेशल😋पावसाळ्यातील वेगवेगळ्या भाज्या तरोटा,धानभाजी,कुजरची भाजी त्यातली ही एक पातुरची भाजी ही फक्त पावसाळ्यात असते. Madhuri Watekar -
अंबाडीची पातळ भाजी (Ambadichi Patal Bhaji Recipe In Marathi)
हि भाजी पौष्टिक आहे तसेच औषधी आहे Aryashila Mhapankar -
कढिपत्ता चटणी (kadi patta chutney recipe in marathi)
#cnमुळातच कढिपत्ता रूचकर, खमंग असतो.कढिपत्ता मधे खूप औषधी गुणधर्म आहेत, तरी काहीजण तो ताटातून बाजूला काढतात,यावर खरमरीत उपाय म्हणजे पौष्टिक कढिपत्ता चटणी. Arya Paradkar -
कोरला-वाल भाजी (Korla Val Bhaaji Recipe In Marathi)
उन्हाळ्यात मिळणारी ही भाजी अतिशय चविष्ट असते.शिवाय प्रत्येक सिझनमध्ये मिळणारया रानभाज्या खाल्लयाच पाहीजेत. Anushri Pai -
मायाळु भजी (mayaloo bhaji recipe in marathi)
#फ्राईडमायाळु ही वनस्पती रानभाजी प्रकार असुन कोकणात जास्त प्रमाणात ऊपलब्ध आहे.. आता ह्या वनस्पतीचे आरोग्यवर्धक औषधी गुणांमुळे अनेकांकडून ह्याचा सेवनासाठी वापर होताना दिसतोय, तरीही बरेच जण अजुनही ह्याच्या विषयी अनभिज्ञ असल्याने मुद्दाम पाककृतिसाठी ही भाजी निवडली आहे .मायाळु वेलवर्गीय वनस्पती असुन अनेक व्याधींसाठी औषधी आहे, ह्याचे खोड सहज रूजते . ' ईंडियन स्पिनॅच ' ,'पोई' ही सुद्धा नावाने ऐळखल्या जाते , माझ्या लहानपणी माहेरी जांभळी पोईचा(मायाळु) वेल होता, आई त्याची पातळ भाजी, पानांचे भजे करत असे.चवीला अतिशय स्वादिष्ट असत, पण तेव्हा मायाळु चे महत्व माहित नव्हते . आज ह्याची भजी केलीत . Bhaik Anjali -
अंबाडीची भाजी (ambadichi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1ही भाजी माझी अत्यंत आवडती आहे. अंबाडी ही एक पालेभाजी आहे. लसणीची चुरचुरीत फोडणी देऊन बनवलेली अंबाडीची भाजी, भाजीवर कच्चे शेंगदाण्याचं तेल आणि भाकरी / पोळी हा बेत म्हणजे मेजवानीच. तांदूळ आणि चणाडाळ घालतेली ही भाजी म्हणजे पूर्णान्न आहे. अशीच खायला ही छान लागते. ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे. Sudha Kunkalienkar -
कंटोळी भाजी (Kantoli Bhaji Recipe In Marathi)
#SSRकंटोलीची भाजी कांदा ,लसूण टाकून परतून केली की अतिशय टेस्टी लागते वही फक्त पावसाळ्यात मिळते व औषधी आहे. Charusheela Prabhu -
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
नमस्कार सखीमेथीची भाजी म्हणजे प्रतेक महाराष्ट्रीयन स्त्री चा जीव की प्राण ,या शिवाय देवीचा नेवेद्य पूर्ण होत नाही .ही भाजी कितीही साधी सिंपल केली तरी चवीला अगदी चविष्ट लागते .काही स्त्रिया तर याची कच्ची पाने सुध्दा आवडीने खातात .चला तर मग आजच्या रेसिपी ला सुरुवात करुयात . Adv Kirti Sonavane -
-
फोडशीचे धपाटे (fodshiche dhapate recipe in marathi)
#msrपावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्या पैकी फोडशीची भाजी.स्त्री पुरुष दोघांच्याही बऱ्याच आजारांवर अत्यंत उपयुक्त ,औषधी भाजी आहे. तिला श्वेत मुसळी असेही म्हणतात.त्याची भाजी,भजी,वडे ,वड्याअसेही अनेक पदार्थ बनवता येतात.मी फोडशीची भाजी ,ज्वारीचं पीठ, सत्तु चं पीठ वापरून पौष्टिक आणि चविष्ट असे धपाटे बनवले आहेत.खूपच छान झाले धपाटे. Preeti V. Salvi -
कोरल्याची भाजी (korlyachi bhaji recipe in marathi)
पावसाळ्यात येणारया सर्व भाज्या शरीरासाठी खुप गुणकारक आहेत.जसं की टाकळ्याची भाजी,शेकटाच्या पानांची भाजी.ई.#msr Anushri Pai -
चिऊ ची भाजी(चिवळीची भाजी) (chivlichi bhaji recipe in marathi)
#उन्हाळी स्पेशल चिऊची भाजीआमच्या कडे ही भाजी उन्हाळ्यात मिळते.ही अतिशय छान लागते शिवाय थंड असते.आमच्याकडे ह्याची पीठ भाजी च आवडते . Rohini Deshkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15230319
टिप्पण्या