पालकाची भाजी

पालक म्हटल की समोर येतं पालक पनीर, मटार पालक, पालक सूप.... असे पदार्थ भरपूर साहित्य आणि वाटाघाटी. आता सोपी सिम्पल भाजी आपण पाहणार आहोत डायरेक्ट पालक आणि त्यातील महत्त्वाची लोह खनिज तत्त्वे आपल्या शरीराला मिळतील.

कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम आपण साहित्य घेवू डाळ भिजवून घेवू. पालक धुवून चिरून घेवू एकदम बारीक नाही. कांदा बारीक चिरून घेवू. मिरच्या उभ्या चिरून घेवू. मी लाल मिरची घेतली आहे. जेणे करून हिरव्या भाजीत समजावी.
- 2
एका कढईत तेल गरम करून त्यात लसुण ठेचून घालू. आता त्यात मिरची आणि कांदा घालून परतून त्यात भिजवलेली डाळ घालू.
- 3
आता त्यात पालक घालून शिजवून घेवू. पालेभाज्या वाफेवर शिजवून घ्याव्या. आणि पालक मध्येही पाणी जास्त प्रमाणात असते त्यामुळे पाणी अजिबात घालू नये. भाजी शिजली की त्यात मीठ घालून एकजीव करून घ्या. शेवटी वरुण खोबरेल तेल घालावे 1 टीस्पून. तयार पालक भाजी.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या