मूग डाळ खिचडी (moong dal khichdi recipe in marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#ट्रेंडिंग (trending)
#दाल खिचडी
मुगाची डाळ ही अत्यंत पौष्टिक अशी आहे
मुगाच्या डाळीची खिचडी लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसाचा पर्यंत पचायला हलकी अशीआहे त्यामुळे सर्वांनाच ही खिचडी अत्यंत उपयुक्त अशी आहे
मुग डाळ खिचडीतून मोठ्या प्रमाणात कर्बोहाइड्रेट, विटामिन, कॅल्शिअम, फायबर, मॅग्नेशियम आणि पोटेशियम आपल्या शरीराला मिळतात.बऱ्याचदा एखादी व्यक्ती आजारी पडली का त्या व्यक्तीला हमखास मूगाची खिचडी खाण्यासाठी दिली जाते. कारण अशक्यतपणा, अपचनाच्या त्रासात मूगाची खिचडी विशेष उपयोगी ठरते. परंतु, मूगाची खिचडी ही फक्त आजारी व्यक्तींसाठी नव्हे तर प्रत्येकाने आहारात याचा उपयोग केल्यास त्याचा चांगला फायदा होतो.
त्याशिवाय, पोटाच्या समस्यांवर मुगाची खिचडी दहीसोबत खाल्ल्यास तुम्हाला आराम मिळेल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमुगडाळ
  2. 1 कपतांदूळ
  3. 2-3 हिरव्या मिरच्या
  4. 1कांदा
  5. 5- 6 कडीपत्त्याची पाने
  6. थोडी शेंगदाणे
  7. 1 टेबलस्पूनमोहरी, जीरे
  8. 1 टेबलस्पूनहळद
  9. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  10. 1 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  11. चवीनुसारमीठ
  12. 2 टेबलस्पूनतेल
  13. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    प्रथम मुगाची डाळ व तांदूळ एका बाउल मध्ये घेऊन पाच मिनिट भिजत घालावे कांदा हिरवी मिरची बारीक चिरून घेणे

  2. 2

    नंतर कुकर घेऊन त्यात तेल घालावे जीरे मोहरी घालून घ्यावे तडतडली कि हिरवी मिरची कढीपत्ता घालून घ्यावा नंतर त्यात कांदा घालावा शेंगदाणे घालावे कांदा गुलाबीसर झाला कि त्यात डाळ व तांदूळ घालून घ्यावे

  3. 3

    डाळ व तांदूळ घातल्यानंतर पाच मिनिटे तेलात परतवावे नंतर त्यात सर्व मसाला घालून घ्यावे सर्व मिक्स करावे मीठ घालून घ्यावे परत सगळे मिश्रण परतून घ्यावे नंतर त्यात पाणी घालून कुकरला दोन ते तीन शिट्ट्या घ्याव्या

  4. 4

    कुकर थंड झाला की छान गरमागरम खिचडी सर्व्ह करावी

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes