रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी (dal Khichdi recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#kr
# Indian one pot meal
#रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी

रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी (dal Khichdi recipe in marathi)

#kr
# Indian one pot meal
#रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपबासमती तुकडा तांदूळ
  2. 1/2 कपमूग डाळ
  3. 2कांदे
  4. 1टोमॅटो
  5. 1 टीस्पूनगरम मसाला
  6. 1 टीस्पूनधने जीरे पूड
  7. 2 टीस्पूनलाल तिखट (आवडीप्रमाणे घेणे)
  8. 6-7कढीपत्ता पाने
  9. 2लाल तडका मिरची
  10. 1 टीस्पूनआलेलसूण पेस्ट
  11. 1 टीस्पूनमोहरी
  12. 1 टीस्पूनजीरे
  13. 1 टीस्पूनहळद
  14. 1 टीस्पूनहिंग
  15. 2 टेबलस्पूनतेल / तूप
  16. कोथिंबीर
  17. 3-4 कपपाणी(आवश्यकतेनुसार पाणी घेणे)
  18. 1-2हिरवी मिरची
  19. तडका देण्यासाठी...
  20. 1/2 टीस्पून मोहरी
  21. 1/2 टीस्पूनहिंग
  22. 1ब्याडगी मिरची
  23. 2 टीस्पूनतूप /तेल
  24. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  25. 1 टीस्पूनलसूण तुकडे

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम डाळ तांदूळ 2-3 वेळा स्वच्छ धून घेणे. कुकर मध्ये हे डाळ तांदूळ घालणे. त्या मध्ये जितके डाळ तांदूळ आहे त्याच्या तिप्पट पाणी घालणे (पाणी नेहमी पेक्षा जास्त घालणे) नंतर त्यात हळद, मीठ, हिंग घालून घेणे. झाकण लावून मध्यम आचेवर 3 शिट्टी काढून घेणे.

  2. 2

    एका प्लेट मध्ये कांदा, टोमॅटो, मिरची चिरून घेणे. वाफ गेली कि कूकरचे झाकण काढून डाळ तांदूळ शिजले का ते पाहावे. एकदम मऊ आणि पातळ शिजवून घेणे.पाणी कमी असेल तर 1-2 कप पाणी घालून ते शिजलेले डाळ तांदूळ पातळ करून घेणे.व डावाने ते एकजीव करून घेणे.

  3. 3

    आता गॅस वर कढई ठेवून त्या मध्ये आवडीनुसार तेल किंवा तूप घालावे. तेल गरम झाले कि मोहरी, जीरे, हिंग, कढीपत्ता, लाल मिरची याची खमंग फोडणी करून घेणे. आता त्या मध्ये कांदा, आले लसूण पेस्ट 2 मिनिटे परतून घेणे.

  4. 4

    आता या मध्ये हळद, टोमॅटो घालून 2 मिनिटे परतून घेणे. आता या मध्ये सगळे मसाले आवडीप्रमाणे घालून छान टोमॅटो मऊ होई पर्यंत परतून घेणे. आता या मध्ये हटून घेतलेली शिजलेली डाळ तांदूळ घालून सगळे एकजीव करून घेणे.ही खिचडी पातळच असते. तर गरज असेल तर पाणी घालावे.

  5. 5

    या मध्ये भरपूर कोथिंबीर घालून झाकण ठेवून 5 मिनिटे खिचडी शिजवून घेणे. व वरून तूप घालून गॅस बंद करावा. खिचडी सर्व्ह करताना वरून तडका घालून घेणे. त्या साठी तडका पॅन मध्ये तूप किंवा तेल घालावे. व मोहरी, जीरे, हिंग, लसूण तुकडे, मिरची, लाल तिखट याचा तडका करून घेणे.

  6. 6

    मस्त रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी तयार झाली. सोबत सॅलड, कैरी लोणचे सर्व्ह करावे. ही गरम गरम मऊ, लुसलुशीत, पातळ खिचडी खूप छान टेस्टी लागते.

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

टिप्पण्या (2)

Gopal Chavan
Gopal Chavan @Gotoyou
30 Minutes Delicious and Incredible Sambar Vada Recipe in Hindi https://www.f4food.rf.gd/sambar-vada-recipe-in-hindi/

Similar Recipes