डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)

Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP

#लंच भारतीय आहारातील अनेक लोकप्रिय पदार्थांपैकी डाळ खिचडी हा सर्वात जास्त खाल्ला जाणारा हेल्दी व टेस्टी पदार्थ आहे. डाळ आणि तांदूळ एकत्र शिजवून त्यात आपल्या आवडीनुसार साजूक तूप, भाज्या आणि मसाल्यांचा वापर केला जात असल्यामुळे ही रेसिपी अतिशय सोपी, झटपट होणारी व रुचकर असते. ऋतू बदलताच वातावरणात अनेक बदल दिसून येतात. या बदलांचा परिणाम आपल्या शरीरापासून लाईफस्टाईलपर्यंत सर्वच बाबींवर झालेला दिसून येतो.
त्यामुळे ऋतू बदलानुसार आपल्या खानपानात बदल करणंं अत्यंत आवश्यक असतं. एखादी व्यक्ती आजारी पडली की त्या व्यक्तीला हमखास मूगडाळीची खिचडी खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. कारण अशक्तपणा, अपचनाच्या त्रासात मूगाची खिचडी विशेष लाभदायी ठरते. परंतु, खिचडी ही फक्त आजारी व्यक्तींसाठी फायदेशीर नसून लहानपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वांनी याचा आहारात समावेश करणं आवश्यक असतं. पोषक तत्वांसोबतच पचण्यास हलकी असणारी व विशेष तडका देऊन बनवली जाणारी ही खिचडी खूपच रुचकर व स्वादिष्ट लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीटं
४ सर्व्हिंगज
  1. 1/2 कपतांदूळ
  2. 1/2 कपमुगाची डाळ
  3. 4-5लसूण पाकळ्या
  4. 1/2 इंचआलं
  5. 7-8कढीपत्त्याची पानं
  6. 1कांदा
  7. 1टोमॅटो
  8. 2हिरव्या मिरच्या
  9. 1 टीस्पूनगरम मसाला
  10. 1/2 टीस्पूनआमचूर पावडर
  11. 1 टीस्पूनधणे पावडर
  12. फोडणीसाठी
  13. 1 टेबलस्पूनसाजूक तुप
  14. 1 टीस्पूनजिरं
  15. 1/2 टीस्पूनहळद
  16. 1/4 टीस्पूनहिंग
  17. आवश्यकतेनुसार पाणी
  18. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

३० मिनीटं
  1. 1

    प्रथम डाळ आणि तांदूळ धुवून घ्यावेत. नंतर एका पातेल्यात पाणी घेऊन ते गॅसवर गरम करायला ठेवावे. कांदा आणि टोमॅटो चिरुन घ्यावे. आलं लसूण ठेचून घ्यावं.

  2. 2

    दुसर्‍या पातेल्यात तुप घेऊन ते गरम झाल्यावर त्यात जिरं, कढीपत्ता आणि ठेचलेलं आलं लसूण घालून परतावं. मग त्यात कांदा,हिंग,हळद आणि हिरव्या मिरच्या घालून कांदा मऊ होईपर्यंत परतावे.

  3. 3

    मग त्यात टोमॅटो घालावा आणि गरम मसाला, धणे पावडर आणि आमचूर पावडर घालून मिक्स करावं.

  4. 4

    आता त्यात धुतलेले डाळ आणि तांदूळ घालून परतून त्यात गरम केलेलं पाणी घालावं आणि मीठ घालून एक उकळी आणावी.

  5. 5

    मग मंद गॅसवर थोड्या थोड्या वेळाने ढवळत खिचडी होऊ द्यावी. आवश्यक वाटल्यास अजून पाणी घालावं. पूर्ण शिजलं कि झाली डाळखिचडी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes