सप्त धान्याचे पौष्टिक थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#cpm5
खमंग पौष्टिक थालीपीठ नक्की करून पहा.

सप्त धान्याचे पौष्टिक थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)

#cpm5
खमंग पौष्टिक थालीपीठ नक्की करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
7,8 सर्व्हिंग्ज
  1. सप्त धान्याचे पीठ
  2. 1 कपतांदूळ
  3. 1 कपबाजरी
  4. 1 कपनाचणी
  5. 1 कपज्वारी
  6. 1/4 कपराजगिरा
  7. 1/4 कपजव
  8. 1/4 कपकाळे उडिद
  9. थालीपीठ करण्यासाठी
  10. 2मोठे कांदे बारीक चिरलेले
  11. चिरलेली कोथिंबीर
  12. 2 टीस्पूनतीळ
  13. 2 टीस्पूनधणे-जीरे पावडर
  14. 1 टीस्पूनलाल तिखट
  15. 1/2 चमचाहळद
  16. मीठ चवीनुसार
  17. तेल

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    तांदूळ, बाजरी, नाचणी आणि ज्वारी प्रत्येकी एक वाटी घ्यावे. त्यात पाव वाटी राजगिरा, पाव वाटी जव आणि पाव वाटी काळे उडिद घालून सर्व एकत्र करून पीठ दळून आणा.

  2. 2

    आता एका परातीत दोन वाट्या पिठ घेऊन त्यात मीठ, धणे-जीरे पावडर, लाल तिखट, तीळ, गरम मसाला, कांदा, कोथिंबीर आणि हळद घाला.

  3. 3

    मिश्रणात आता चमचाभर दही व थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून त्याचा गोळा तयार करा. हा गोळा सहज पसरेल इतकाच घट्ट असावा. तो खूप घट्ट करू नये. पोळीसाठी जी कणीक मळतो त्यापेक्षा हा गोळा सैल असावा.

  4. 4

    पिठाचा गोळा घ्या आणि तो हलक्या हाताने पातळ फडक्यावर पसरवा. थालीपीठ थापताना मधून मधून हात पाण्याने ओले करा. जेणेकरून थापण्याची प्रक्रिया सहज होईल. थालीपिठामध्ये 4-5 भोके पाडा, जेणेकरून थालीपीठ सगळीकडून व्यवस्थित शिजेल. तवा तापत ठेवा. जेव्हा तो तापेल तेव्हा थालीपीठ काळजीपूर्वक तव्यावर उतरवा. थालीपिठावरील भोकांमध्ये थोडे थोडे तेल सोडावे.तव्यावर झाकण ठेवा आणि थालीपीठ दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या.

  5. 5

    तयार सप्त धान्याचे पौष्टिक थालीपीठ लोणचे, उसळ, दही किंवा चटणी सोबत खाण्यास द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes