कोकोनटी चाॅकलेट बिस्किट स्वीस रोल केक (coconut chocolate biscuit swiss roll cake recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#cpm6
#week6
#बिस्कीटकेक

बिस्कीट, कोकनट आणि चाॅकलेटचे काॅम्बिनेशन असलेले हे स्वीस रोल केक चवीला खूप छान लागतात ..😋😋
माझी मुलं आणि मी एकदम खूश!!😊😊
चला तर मग पाहूयात रेसिपी.

कोकोनटी चाॅकलेट बिस्किट स्वीस रोल केक (coconut chocolate biscuit swiss roll cake recipe in marathi)

#cpm6
#week6
#बिस्कीटकेक

बिस्कीट, कोकनट आणि चाॅकलेटचे काॅम्बिनेशन असलेले हे स्वीस रोल केक चवीला खूप छान लागतात ..😋😋
माझी मुलं आणि मी एकदम खूश!!😊😊
चला तर मग पाहूयात रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
४ जणांसाठी
  1. ३०० ग्रॅम पारले जी बिस्कीट
  2. 1/4 कपपिठीसाखर
  3. 3 टेबलस्पूनचाॅकलेट साॅस
  4. 1/4 कपदूध
  5. मेल्टेड तूप गरजेनुसार
  6. व्हाईट लेअर साठी
  7. १+१/२ कप मिल्क पावडर
  8. 1 कपदूध
  9. 1 टेबलस्पूनकोकोनट मिल्क पावडर (optional)
  10. बटर पेपर

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    ब्लेंडरमधे बिस्किटे बारीक वाटून घ्या.

  2. 2

    बाऊलमधे हा चूरा चाळून घ्या. नंतर त्यात चाॅकलेट साॅस, पिठीसाखर,१/४ कप दूध थोडे थोडे घालून छान मऊसूत मळून घ्या. मिश्रण हाताला जास्त चिकटत असेल तर थोडे मेल्टेड बटर लावून‌ गोळा मळून घ्या.

  3. 3
  4. 4

    व्हाईट लेअरसाठी
    पॅनमधे १ टेबलस्पून तूप वितळवून घ्या. नंतर त्यात १ कप दूध,मिल्क पावडर,कोकोनट मिल्क पावडर घालून छान मिक्स करा.

  5. 5

    मंद आचेवरच मिश्रण छान ढवळत राहा.नाहीतर तळाला लागू शकते.

  6. 6

    तयार मिश्रणाचा हळूहळू गोळा तयार होऊ लागेल. छान घट्टसर गोळा तयार झाला की मावा तयार झाला. गॅस बंद करा.

  7. 7

    बटर पेपरवर चाॅकलेटचा गोळा थापून बटर लावून लाटून घ्या.जास्त पातळ लाटून नका.

  8. 8

    नंतर त्यावर माव्याचे मिश्रण व्यवस्थित पसरवून घ्या.

  9. 9

    नंतर त्याचा रोल तयार करून बटर पेपरमधे गुंडाळून फ्रिजमध्ये २ तास सेट करा.

  10. 10

    रोल छान सेट झाला की त्याचे स्लाइस करून आपल्या कुटुंबासोबत आनंद घ्या.

  11. 11
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes