स्वीट कॉर्न मसाला (Sweet Corn Masala Recipe In Marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#cpm7 #स्वीट कॉर्न मसाला, करताना खणाऱ्याच्या तोंडाची चव पाहावी लागते.. म्हणून मी दोन प्रकार केले आहे. एक साधा स्वीट कॉर्न मसाला आणि एक पुदिना फ्लेवर..

स्वीट कॉर्न मसाला (Sweet Corn Masala Recipe In Marathi)

#cpm7 #स्वीट कॉर्न मसाला, करताना खणाऱ्याच्या तोंडाची चव पाहावी लागते.. म्हणून मी दोन प्रकार केले आहे. एक साधा स्वीट कॉर्न मसाला आणि एक पुदिना फ्लेवर..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपस्वीट कॉर्न दाणे
  2. 1 टीस्पूनबटर
  3. 1 टीस्पूनमीठ
  4. 1 टीस्पूनचाट मसाला
  5. 1/4 टीस्पूनतिखट
  6. 1/2 टीस्पूनपुदिना चटणी
  7. 1 टीस्पूनभाजलेले जीरे पावडर
  8. लिंबू
  9. कोथिंबीर

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    सुरूवातीला मक्याचे दाणे, काढून घ्यावे. दाणे कडक असतील त्यात थोडे पाणी आणि थोडे मीठ टाकून दोन मिनिट वाफवून घ्यावे. दाणे कोवळे असतील तर फक्त थोडे मीठ टाकून वाफवून घ्यावे. मी ओव्हन मध्ये दोन मिनिट गरम केले आहे. मी दोन प्रकारे मसाला स्वीट कॉर्न केले आहे.

  2. 2

    आता एका बाउल मध्ये अर्धा टी स्पून बटर टाकावे. त्यात गरम केलेले अर्धे मक्याचे दाणे घालून, त्यात1/2 टीस्पून जीरे पूड आणि चाट मसाला टाकावा. किंचित मीठ टाकावे.

  3. 3

    आता ते मिक्स करून घ्यावे. वरून थोडे लिंबू पिळावे. हा झाला साधा स्वीट कॉर्न मसाला. लहान मुलांसाठी परफेक्ट.

  4. 4

    आता पुन्हा वाटी मध्ये बटर टाकून त्यात उरलेले मक्याचे दाणे टाकावे. तिखट, मीठ, जीरे पूड, चाट मसाला आणि पुदिना चटणी टाकावी. लिंबू पिळावे. आणि छान मिक्स करून घ्यावे. हा झाला पुदिना फ्लेवर, स्वीट कॉर्न मसाला...

  5. 5

    आता सर्व्ह करताना मी कागदी द्रोण वापरले आहेत. द्रोण मध्ये कॉर्न काढून घ्यावे, वरून थोडी कोथिंबीर टाकावी आणि चटपटीत स्वीट कॉर्न मसाला सर्व्ह करण्यासाठी तयार.. शक्यतोवर गरमच सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes