कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#wdr

#कांदाभजी

वीकेंड रेसिपी स्पेशल मध्ये गरमागरम भजी एंजॉय केली पाहिजे त्यात पावसाळ्याचा वातावरण सतत पाऊस पडत असल्यामुळे भजी खाण्याची इच्छा होतेच त्यात सगळे परिवाराचे सदस्य घरात असल्यामुळे हा बेत पर्फेक्ट असतो . संध्याकाळचा चहा आणि भजी हे ठरलेले कॉम्बिनेशन आहे
पूर्वी जी भजी मी तयार करायची भजी कुरकुरीत तयार नाही व्हायची मग मी मधुरा या शेफ यांची रेसिपी बघून बऱ्याचदा कांदा भजी तयार केली तर आता माझी भजी कुरकुरीत बाहेर स्टेशनवर मिळते तशी भजी तयार होते
मधुरा यांची रेसिपी बघितल्या पासून आता अशा प्रकारची भजी तयार करते बऱ्याचदा मी माझ्या पॉटलॉग पार्टीतही भजीचे प्लॅटर तयार केलेले आहे त्यामुळे आता ही भजी खूप छान चविष्ट तयार होते अगदी बाहेर मिळते तशीच
अशा प्रकारची भजी घरातल्या सगळ्या सदस्यांबरोबर चहा आणि भजी चा आनंद काही वेगळाच आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनीट
2/3 व्यक्ति
  1. 2/3कांदे लांब कट केलेले
  2. 2/3हिरव्या मिरच्या कट केलेल्या
  3. कोथिंबीर बारीक कट केलेले
  4. 1 कपबेसन चे पीठ
  5. 1/4तांदळाचे पीठ
  6. 1/4 टीस्पूनओवा
  7. 1/2 टेबल्स्पूनलाल मिरची पावडर
  8. 1/2 टेबलस्पूनहळदी पावडर
  9. 1/2 टेबलस्पूनधना पावडर
  10. मीठ चवीनुसार
  11. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

15 मिनीट
  1. 1

    सर्वप्रथम लांब कांदा कट करून घेऊ मिरच्या कट करून कोथंबीर तयार करून घेऊ

  2. 2

    कांद्यावर मीठ टाकून ठेवून देऊ
    आता दिल्याप्रमाणे बेसन पीठ तांदळाचे पीठ त्यावर सगळे मसाले,मीठ टाकुन मिक्स करून घेऊ

  3. 3

    आता मीठ लावलेल्या कांदा पिठावर टाकून मिक्स करून घेऊ
    कांदा पिठात व्यवस्थित मिक्स करून घेऊ वाटल्यास वरून पाणी चा शिपडा मारून घ्यायचा

  4. 4

    आता तयार कांदे हाताने एकेक गरम तेलात मस्त मोकळे सोडायचे आणि कुरकुरीत तळून घ्यायचे
    सोबत हिरवी मिरची तळून घ्यायची

  5. 5

    तयार गरमागरम कांदाभजी बरोबर सोबतीला चहा हा हवाच तरच त्याची मज्जा येते

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

टिप्पण्या (15)

Similar Recipes