कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

खर तर कांदाभजी आवडत नाही असा महाराष्ट्रीय माणूस मिळणे कठिणच आहे. गेल्या आठवड्यात मस्त पाऊस पडत होता मग काय नेहमीच घरांत सर्वाना कांदा भजी खुणावतात मी केलेली ,मग केली नेहमीप्रमाणे कुरकुरीत खुमासदार झाली तुम्ही पण सांगितल्या प्रमाणे कराल तर तशीच होतील हो .बघा तर रेसीपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपकांदा उभा चिरलेला
  2. 1 कपचण्याचे पीठ
  3. 1 टीस्पूनलाल तिखट
  4. 2 टीस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  5. 1 टीस्पूनमीठ
  6. 1 टीस्पूनबारीक चिरलेली हिरवी मिरची
  7. 200-250 ग्रॅम तेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम साधारण तिन मोठे कांदे घेऊन उभे पातळ चिरून घ्यावेत व त्यास मिठ लावावे,.नंतर कढईत तेल मंद आचेवर गरम करत ठेवावे.त्यानंतर मिरच्या, कोथिंबीर चिरून घेणे.मिठ लावलेल्या कांद्यामधे मिरची,कोथिंबीर व लाल तिखट घालुन सर्व मिक्स करावे.

  2. 2

    चण्याचे पिठ नेहमी सगळे मिक्स करू नये आपण कढईत जेव्हढी भजी टाकू तेव्हढाच कांदा सगळ्या मधुन बाजुला ताटात घेऊन त्यात पीठ मिक्स करावे साधारण ह्याचे चार वेळा थोडे थोडे तळावे लागतील म्हणजे चार भाग केले तरी चालतील. ते मिश्रण हळूहळू तेलात सोडावेत.तेल नेहमीच मंद आचेवर तापवावे तळताना गॅस मिडीयम ठेवावा.

  3. 3

    ब्राऊन होईस्तो तळावेत व बाहेर काढून खायला द्यावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes