तीळगुळाच्या तिरंगी करंज्या (tilgulachya tiranga karanji recipe in marathi)

Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd

#tri
थ्री इन्ग्रेडियेंटस् रेसीपी
# Three Ingredients Recipe

तीळगुळाच्या तिरंगी करंज्या (tilgulachya tiranga karanji recipe in marathi)

#tri
थ्री इन्ग्रेडियेंटस् रेसीपी
# Three Ingredients Recipe

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
6 जणं
  1. 2 वाट्यारवा
  2. 2 वाटीतीळाचा कूट गुळ मिक्स करून
  3. तळण्यासाठी व मोहन साठी तुप
  4. केशरी व हीरवा रंग
  5. विलायची पुड व चारोळी
  6. 1 टीस्पूनकाॅर्नफ्लोअर
  7. पाणी

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम रव्यामध्ये चिमुटभर मीठ आणि कडकडीत तुपाचे मोहन घालून (रव्याचा हाताने मुटका होईल इतपत) पाण्याने घट्ट भिजवून झाकून 2 तास ठेवून द्यावा.तीळ भाजून घ्यावे व कूट करून गूळ मिक्स करून विलायची पुड व चारोळी घालून छान मिक्स करून ठेवायचे.

  2. 2

    आता रव्याचा गोळा मिक्सरमध्ये फीरवून मऊ करून घ्यावा.दोन गोळे वेगळे करून केशरी व हीरवा कलर मिक्स करून घ्यावा.एका वाटीत थोडे तुप व 1टीस्पून काॅर्नल्फोअर मिक्स करून साटा तयार करून ठेवावे.पांढर्‍या,केशरी व हिरव्या गोळ्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या.प्रथम हिरव्या पोळीला पुर्ण सगळीकडे साटा लावून त्यावर पांढरी पोळी साटा लावून ठेवावी,त्यावर केशरी पोळी साटा लावून ठेवायची.
    तीनही पोळ्यांची घट्ट वळकटी करून घ्यावी. त्याचे तुकडे म्हणजेच लाट्या करून घ्यायच्या.

  3. 3

    लाट्या पातळ लाटून तीळगूळाचे सारण भरून करंज्या भरून घ्यायच्या.

  4. 4

    तुपात तळून घ्यायच्या..

    आपल्या तीन मुख्य इंग्रेडियेंटस् पासून बनलेल्या तीन रंगी चवदार करंज्या तयार आहेत.
    आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या अनेक हार्दिक शुभकामना..

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd
रोजी

Similar Recipes