श्रावण तीज स्पेशल डाळ्याचे सातू (dalyache sattu recipe in marath

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#shr
#श्रावणस्पेशलरेसिपी
#week3

श्रावण महिन्यात भरपूर सण साजरे केले जातात
श्रावण म्हणजे आनंद, उत्साह भरलेला असतो
या महिन्यात बऱ्याच देवी देवतांची उपासना व्रत-वैकल्ये केली जातात त्यातल्याच एक व्रताविषयी मी सांगणार आहे
श्रावण कृष्ण तृतीया या दिवशी तीज मातेची पूजा करून दिवसभर उपवास ठेवून रात्री चंद्रमा चे पूजन करून मग उपवास पूर्ण होतो आणि जेवण केले जाते
यावर्षी तीज आणि चतुर्थी एकाच दिवशी आलेले होते
दोन्ही उपवास सगळ्यांनी एकत्र एकाच दिवशीच केले.
राजस्थान मधला खूप मोठा उत्सव, सण श्रावण ची 'कजरी तीज' म्हणून उत्सव साजरा केला जातो. हातावर मेंदी लावली जाते झाडाखाली झोका बांधून सगळ्या स्त्रियां मुली झोक्याचा आनंद घेतात.
निंबाच्या डाळीची पार्वती मातेच्या स्वरूपात पूजा करून सौभाग्यवती ला आपले अखंड सौभाग्य प्राप्त होते कुमारिकांना इच्छिक वर प्राप्त होते. कुमारिका आणि सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत पूर्ण करतात सौभाग्य अखंड राहते घरात सुख शांती मिळावे म्हणून हे व्रत केले जाते.
त्या दिवशी विशिष्ट असा प्रसादात तयार केला जाणारा पदार्थ म्हणजे डाळयाचे सातू हे सातू शंकराच्या पिंडीच्या आकाराचे तयार करतात आणि उपवास पूर्ण झाल्यानंतर आपल्या भाऊ, वडील किंवा पतीच्या हाताने हे सातू ग्रहण करून उपास खोलला जातो.
जवळपास सगळ्यांच्याच घरी सातू हा प्रकार तयार होतो पूजेत नैवेद्यही दाखवला जातो आणि स्वतःही हा सातु खाऊनच उपवास खोलतात

रेसिपीतून नक्कीच बघूया डाळ्याचे सातू

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीट
5/6 सर्व्हिंग्ज
  1. 500 ग्रामडाळ्या
  2. 400 ग्रामपिठीसाखर
  3. 400 ग्रामसाजूक तूप
  4. 1/2 टेबलस्पूनइलायची पावडर
  5. 1/4 टीस्पूनजायफळ पावडर
  6. केसर भिजलेली
  7. सजवण्यासाठी काजू बदाम चे काप

कुकिंग सूचना

30 मिनीट
  1. 1

    सर्वात आधी मोजमाप करून काढलेले डाळ्या आणि साखर घेऊ

  2. 2

    साखर आणि डाळ मिक्सर मधून बारीक पावडर करून घेऊ
    आता डाळयाची पावडर गाळणीतून गाळून घेऊ

  3. 3

    तूप कढईत कोमट तापून घेऊ

  4. 4

    गाळलेली डाळ्याची पावडर, साखर पावडर तूप सगळे एकत्र एका जागेवर ठेवून घेऊ

  5. 5

    मोठ्या कढईत डाळयाची पावडर आणि साखर टाकून एकत्र करून घेऊ, केसर टाकून घेउ

  6. 6

    आता हळूहळू साजूक तूप टाकत जाऊ साजूक तूप खूप गरम करून नाही घ्यायचे फक्त कोमट घ्यायचे

  7. 7

    साजूक तूप टाकत जाऊन पिठात व्यवस्थित मिक्स करून पीठ दोन्ही हाताने घासून घ्यायचे
    आता हातावर पिंडीच्या आकाराचे सातू तयार करून घ्यायचे
    अशाप्रकारे सातू आणि लाडू तयार करून घ्यायचे

  8. 8

    तयार सातु वर भिजलेली केसरने सजून घ्यायचे कुंकू ने डिझाईन करून घ्यायच्या काजू-बदामाचे काप लावून घ्यायचे वरती सुपारी पण लावायची अशाप्रकारे सातू सजून घ्यायचा

  9. 9

    तयार सातू आणि बाकीच्या पीठाचे लाडू तयार करून घ्यायची प्रत्येक सातू बरोबर एक पेढा अनेक लाडू ठेवायचे शास्त्र असते

  10. 10

    आता पूजा करताना जी चुनरी वापरतो त्या चुनरी वर ठेवून पूजेसाठी लागणारे सगळे साहित्य आजूबाजू ठेवून फोटो काढून घेतले

  11. 11

    तयार डाळ्याचे सातू

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

टिप्पण्या (6)

Similar Recipes