निनाव (ninav recipe in marathi)

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
Pune

#श्रावणक्वीन
आजपासून श्रावण महिना सुरु झाला त्यामुळे आज गोड काहीतरी करायला पाहिजे आणि गुळ खोबरे हे तर आपले पारंपारिक खाद्य म्हणून मी हे निनाव आज केले. पहिल्यांदा केले आहे पण खूप छान झाले आहे.

निनाव (ninav recipe in marathi)

#श्रावणक्वीन
आजपासून श्रावण महिना सुरु झाला त्यामुळे आज गोड काहीतरी करायला पाहिजे आणि गुळ खोबरे हे तर आपले पारंपारिक खाद्य म्हणून मी हे निनाव आज केले. पहिल्यांदा केले आहे पण खूप छान झाले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40-50 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपहरभरा डाळ
  2. 1/4 कपसांजा
  3. 1 कपनारळाचे दूध
  4. 1/2 कपकिसलेला गूळ (सेंद्रिय गूळ)
  5. 2 टेबलस्पूनसाजूक तूप
  6. 1 टिस्पून जायफळ आणि वेलची पूड
  7. 2 टेबलस्पूनकाजू बदाम पिस्ता चे काप

कुकिंग सूचना

40-50 मिनिटे
  1. 1

    सर्वात आधी हरभराडाळ एका कढईमध्ये 15 ते 20 मिनिटे चांगली भाजून घ्यायची तसेच गव्हाचा सांजा पण पंधरा मिनिटे बारीक गॅसवर भाजून घ्यायचा. माझ्याकडे गहू नव्हते म्हणून मी गव्हाचा सांजा वापरला आहे.

  2. 2

    हरभरा डाळ आणि सांजा थंड झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचा. एका पसरट कढई मध्ये स्टॅन्ड ठेवून त्यावर झाकण लावून ती प्रिहीट करायला ठेवायचे आणि एका प्लेटला तूप लावून त्यावर बटर पेपर लावून ठेवायचा.

  3. 3

    आता कढई मध्ये दोन टेबलस्पून तूप गरम करून त्यात वाटलेली हरभरा डाळ आणि सांजा घालून एक दहा मिनिटे भाजून घ्यायचे. छान खमंग भाजून झाल्यावर त्यात नारळाचे दूध हळूहळू घालून मिक्स करायचे. नारळाचे दूध पूर्ण मिक्स झाल्यानंतर त्यात गूळ घालायचा. गुळ पण चांगला मिक्स करून एक जीव होऊ द्यायचे. सगळ्यात शेवटी वेलची आणि जायफळ पूड घालून मिक्स करायचे.

  4. 4

    आता हे मिश्रण तूप लावलेल्या प्लेटमध्ये पसरवायचे आणि त्यावर काजू बदाम पिस्त्याचे काप घालून प्लेन करून घ्यायचे हे प्लेट प्रिहीट केलेल्या कढईमध्ये ठेवायची आणि किमान वीस मिनिटे झाकण लावून बेक करायचे.

  5. 5

    वीस मिनिटानंतर गॅस बंद करून प्लेट बाहेर काढायची आणि थोड्या वेळाने वड्या कापून गार झाल्यावर खायचे किंवा गरम असताना सुद्धा खाल्ले तरी चालतील.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
रोजी
Pune

टिप्पण्या (6)

Similar Recipes